विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस ठाण्यातील कामकाज!........ 👉संकटाच्या काळात पोलीस दलाशी तत्काळ संपर्क साधा ठाणेदार प्रवीण धुमाळ
विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस ठाण्यातील कामकाज!...
👉संकटाच्या काळात पोलीस दलाशी तत्काळ संपर्क साधा ठाणेदार प्रवीण धुमाळ
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून बार्शीटाकळी, पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा आणि कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील कामकाजाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी बार्शी टाकळी, पोलिसांतर्फे विद्याच्यर्थ्यांसाठी पोलिस ठाण्यांत माहिती सत्राचे आयोजन आज ता. (०२ जानेवारी) रोजी केले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यांतील विविध विभाग, वायरलेस यंत्रणा, सीसीटीएनएस यंत्रणा, पोलिस कोठडी, पासपोर्ट व्हेरिफिकेशन या सर्वांची माहिती दिली. तसेच, पोलिस ठाण्यातील विविध शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबत मोकळा संवाद साधत त्यांना पोलिसांचे कामकाज सांगण्यात आले आणि त्यांच्या शंकांचे निरसन या वेळी केले,
या प्रसंगी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ, बांनी विद्यार्थ्यांची संवाद साधतांना सांगीतले की, संकटाच्या काळात पोलीस दलाशी तात्काळ संपर्क साधावा, अफवांपासून दूर राहणे व सामाजिक सलोखा जपणे ही प्रत्येक जबाबदार नागरीकांची भुमिका आहे. विद्यार्थी समाजाचे भविष्य असल्याने त्यांनी कायद्याची जाणीव ठेवुन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महिला, बालक व जेष्ठ नागरीकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणा-या विषेश उपाय योजना, दहशतवाद विरोधातील खबरदारी, सायबर गुन्हयांपासून संरक्षण व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पोलीस दलाची भुमिका वाचाबत ही सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्रवायच्यर्थ्यांमध्ये पोलीस दलाबाबत विश्वास, आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली.
शिस्त, कर्तव्य भावना व सेवाभाव मांचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर उसचिण्वास ही भेट निधितन उपयुक्त ठरली. सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करीत या अनुभवाधारित उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे नागरीकत्व घडते असे मत व्यक्त केले.
यावेळी ठाणेदार प्रवीण धुमाळ, पोउपनिरिक्षक, व इतर पोलिस कर्मचारी, तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment