पातुर येथे जन्म मृत्यू विवाह प्रशिक्षण शिबिर संपन्न.....
पातुर येथे जन्म मृत्यू विवाह प्रशिक्षण शिबिर संपन्न.......
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जन्म मृत्यू विवाह पोर्टलवर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पातुर येथे आयोजित करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी, तथा जिल्हा निबंधक डॉ. बळीराम गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पातुर येथे यांच्या मार्गदर्शनामध्ये पातुर तालुक्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायिका, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटर, यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन इंगळे ,प्रशिक्षक कु.अंकिता गावंडे सांख्यिकी अधिकारी, श्री वसीम शेख सांख्यिकी पर्यवेक्षक, कुमारी पल्लवी भुईभार डाटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते.
तालुक्यातील लाभार्थ्यांना वेळेत जन्माचे दाखले मिळण्याकरिता सी. आर. एस पोर्टलवर एन्ट्री करण्याबाबतची सखोल माहिती प्रोजेक्टर द्वारे देण्यात आली तसेच जन्म मृत्यू नोंदणी मध्ये विलंब झाल्यास नियमानुसार करवायची प्रक्रिया बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
टी बी मुक्त ग्रामपंचायत बाबत नितीन थुटे यांनी मार्गदर्शन केले तसेच कुष्ठरोग विषयी शपथविधी संपन्न करण्यात आली तसेच प्रशिक्षणास व शपथविधीला पंचायत समिती पातुर कार्यालयाकडून आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती सुनंदाताई कासार, कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गजानन इंगळे, पातुर वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश लोखंडे, डॉ. साक्षी चव्हाण,
डॉ. खंडाळे मॅडम, सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, तालुका आरोग्य कार्यालयातील मनोहर घुगे, जुबेर उपस्थित होते.
Comments
Post a Comment