आदर्श ग्रामपंचायत तिवसा बु. कडून गावातील कर्मचाऱ्यांचा सत्कार....

आदर्श ग्रामपंचायत तिवसा बु. कडून गावातील कर्मचाऱ्यांचा सत्कार, 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- तालुक्यातील मौजे तिवसा बु. ग्रामपंचायत ला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2025 /26 मध्ये अकोला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे सरपंच महोदय यांनी ग्राम स्तरावर ग्रामस्थानी कर्मचाऱ्यांचे स्वागत कार्यक्रम केला सरपंच मंदाताई भारत बहादरे यांनी प्रथम पुरस्कार हा एकट्याच्या मेहनतीने नव्हे तर गावातील सर्व ग्रामस्थ यावरील संस्था ग्रामस्थ महिला व महिला बचत गट व आरोग्य विभाग शिक्षण विभाग अंगणवाडी यांची साथ मिळाली आणि आपण हा पुरस्कार गावासाठी खेचून आणला तरी सर्वांचे मनोबल व उत्साह वाढवण्यासाठी मंदाताई बहादरे यांनी ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक कर्मचाऱ्यांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन स्वागत केले एवढा मोठा यश मिळाल्यानंतर आता आपण थांबायचं नाही पुढे जर एकत्र येऊन आपण कार्य केले तर आपण काय कोणतेही यश खेचून आणू शकतो हे आता गावकऱ्यांना समजले आणि आता नव्याने कंबर कसून जिल्हास्तरावरील नाहीतर राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी तयारी करायची ही चर्चा करण्यात आली व पुढील वाटचालीसाठी पुन्हा नव्याने सुरुवात करायची हे सर्वानुमते मांडले आणि पुरस्काराच् आनंदा व्यक्त केला एकच ध्यास गावचा विकास ध्येय समोर ठेवून सर्वांनी कंबर कसून उत्कृष्ट कार्य करायचे
कार्य क्रमाला संबंधताई भारत बहादरे सरपंच नागनिका महेंद्र इंगोले उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामपंचायत अधिकारी वसंता डोंगरे संदीप मनोहर पोलीस पाटील ग्राम महसूल अधिकारी पुसदेकर तंटामुक्त अध्यक्ष नामदेव लुले नितेश खरात सरपंच निंबारा सुरेश पाटील देविदास नानोटे प्रशांत लुले रोजगार सेवक मनोज लुले ग्रामपंचायत कर्मचारी डॉ शारीख खान समुदाय आरोग्य अधिकारी तिवसा, आसरा भगत आरोग्य सेविका, तीवसा चंद्रशेखर जाधव आरोग्य सेवक तिवसा, आदी कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....

नवसाच्या नावाखाली महिलेवर अत्याचार.,.....आरोपींना अटक.,....