रुस्तमाबाद येथे सालाबाद प्रमाणे भागवत कथा प्रारंभ....

रुस्तमाबाद येथे सालाबाद प्रमाणे भागवत कथा प्रारंभ.... 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
 बार्शिटाकळी :- अकोला जिल्ह्यामधील बार्शीटाकळी तालुक्यामधील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदा रुस्तमाबाबत येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री जागेश्वर संस्थान येथे ह भ प विश्राम महाराज यांच्या सुमधुर वाणी मधून दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत भागवत ज्ञान कथा सप्ताहास सुरुवात झालेली असून या सप्ताहामध्ये सतत सात दिवस ह भ प ज्ञानेश्वर महाराज लाहुडकर , ह भ प गजानन महाराज गोंडचवर , ह भ प नेहा ताई ठक , ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटोंड, ह भ प मोहन महाराज मेटकर , ह भ प सुष्माताई चांभारे , ह भ प राधिका ताई डांबडे यांचे कीर्तनाचे आयोजन सायंकाळी आठ वाजता करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे काल्याची कीर्तन विश्राम महाराज पांडे यांचे कीर्तनाने भागवत कथेचा समारोप होईल. यावेळी दरवर्षीप्रमाणे 35 क्विंटल ज्वारीच्या भाकरीचा तसेच दार तसेच पाणी पिण्याकरिता मातीचे करे याचा भव्य महाप्रसादाचे आयोजन मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 ला आयोजित केलेला आहे. 
      सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता देवाधिदेव महादेव संस्थान आळंद रुस्तमाबाद , काकड आरती मंदार , जय अंबे उत्सव मंडळ , गणेश उत्सव मंडळ , गुरुदेव सेवा भजन मंडळ , माऊली न्यानेश्वर महाराज मंदिर , हरिपाठ महिला मंडळ , जागेश्वर महिला मंडळ तसेच आळंद व रुस्तमाबाद गावातील समस्त ग्रामस्थ यांचे सहकार्याने वरील कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी सदर महाप्रसाद लाभ पंचकोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कान्हेरी सरप येथे महादेव संस्थान येथे शिवपुरानास सुरुवात....

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  बार्शिटाकळी तालुक्यामधील ग्राम कान्हेरी सरप येथे दरवर्षीप्रमाणे महादेव संस्थान येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
       दरवर्षीप्रमाणे यावेळी शी सुद्धा महादेव संस्थान च्या वतीने बळीराम महाराज दौड शिवरकर यांच्या सुमधुरवाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन दिनांक 9 फेब्रुवारी 2020 ते 16 फेब्रुवारी 2020 पर्यंत आयोजित केलेले असून सदर शिवपुराण कथा मध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती दिसून येत आहे. शिवपुराण कथे दरम्यान विविध मंडळी आपला सहभाग नोंदवून कथा श्रवणाचा लाभ घेत आहेत. शिव महापुराण कथेची सांगता बळीराम महाराज दौड शिवरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी होत असून भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सदर भंडाऱ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....