डोंगरगावातील गवंडी काम व मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या मुलीची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड.!👉वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आई-वडिलांसह मुलीचा सत्कार.!

डोंगरगावातील गवंडी काम व मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या मुलीची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड.!
👉वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आई-वडिलांसह मुलीचा सत्कार.!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : अकोला तालुक्यातील डोंगरगाव येथील गवंडी व मोलमजुरीचे काम करणारे पुरणमल इंगळे यांची मुलगी प्रज्ञा पुरणमल इंगळे हिची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नुकतीच निवड झाली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रज्ञाने हे यश संपादन केले प्रज्ञाचे वडील गवंडी कामा सह मिळेल ते काम करतात तर आई मजुरीचे काम करते सुरुवातीपासूनच घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे कोणतेही ट्युशन क्लास न लावता स्वतःच्या जिद्दीवर ग्रॅज्युएशन पूर्ण करून प्रज्ञाने स्टाफ सिलेक्शन परीक्षेमध्ये यश मिळवून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (आयटीबीपी) पहिल्याच प्रयत्ना त यश संपादन केले आयटीबीपी मध्ये डोंगरगाव व आजूबाजूच्या गावातून निवड होणारी पहिली महिला प्रज्ञा इंगळे ठरली ही बातमी समजतात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी डोंगरगाव येथे जाऊन गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रज्ञा व तिचे आई-वडील यांचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सत्कार व अभिनंदन केले यावेळी गावातील मंडळीं सोबत माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य आशाबाई इंगळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा सचिव राहुल खाडे, बाबुळगाव वंचित बहुजन आघाडीचे सर्कल अध्यक्ष प्रशांत शिरसाठ, प्रदीप पळसपगार, संजय किर्तक, उमेश देवतळे, बबलू इंगळे, संदीप इंगळे, सुधाकर इंगळे ऋषिकेश इंगळे, मधुकरराव इंगळे, वकीलाजी डोंगरे, अमोल गवई, सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....