ग्राम सीसा येथे वित्तीय साक्षरता सप्ताहानिमित्त KYC व लिंकेज कॅम्प संपन्न....
ग्राम सीसा येथे वित्तीय साक्षरता सप्ताहानिमित्त KYC व लिंकेज कॅम्प संपन्न
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी -: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असलेल्या वित्तीय साक्षरता सप्ताहा निमित्त आज ग्राम सीसा, ता. अकोला येथे वित्तीय साक्षरता प्रशिक्षण व KYC लिंकेज कॅम्प यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) श्री. श्रीराम वाघमारे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी श्री. नोवेल सिंग, जिल्हा अग्रणी बँकेचे सहाय्यक प्रबंधक श्री. नितीन घोरे, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया बाबुळगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. याशिवाय ॲक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, अकोला विभागाचे एरिया मॅनेजर श्री. आकाश मेहेत्रे व अकोला केंद्र व्यवस्थापक श्री. प्रशांत कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये नागरिकांना विमा, पेन्शन, बचत व गुंतवणूक, डिजिटल बँकिंग, बँकिंग लोकपाल, आर्थिक फसवणूक प्रतिबंध तसेच KYC प्रक्रियेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
नाबार्डचे DDM श्री. वाघमारे यांनी आर्थिक नियोजन, स्वयंरोजगार संधी तसेच नाबार्डच्या विविध योजनांविषयी माहिती दिली.
जिल्हा अग्रणी बँकेचे सहाय्यक प्रबंधक श्री. नितीन घोरे यांनी KYC अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट करून सुरक्षित बँकिंग व्यवहाराविषयी मार्गदर्शन केले.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी श्री. नोवेल सिंग यांनी विविध बँकिंग योजनांची माहिती देत नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या दक्षतेविषयी मार्गदर्शन केले.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बाभुळगाव शाखेच्या शाखा व्यवस्थापक सौ. प्रियांका मस्के यांनी कर्ज योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
CFL क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. आकाश मेहेत्रे यांनी घरगुती अर्थसंकल्प व आर्थिक शिस्त याविषयी मार्गदर्शन केले. तसेच CFL अकोला केंद्र समन्वयक श्री. प्रशांत कुटे यांनी विमा, पेन्शन, बचत, गुंतवणूक, डिजिटल बँकिंग व विविध शासकीय योजनांविषयी माहिती देत नागरिकांमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण केली.
या कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील बचत गटांच्या CRP सौ. ज्योती हगवणे, सौ. संगीता मेहंगे, सौ. मुक्ता मोरे तसेच ग्रामसंघ अध्यक्ष सौ. मंगला गावंडे व सचिव सौ. विद्या बडे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत KYC अद्ययावत करणे, विमा व पेन्शन योजनांमध्ये सहभागी होणे याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.
Comments
Post a Comment