भारत-अमेरिका व्यापारी कराराची होळी; बहिरखेडमध्ये शेतकरी यल्गार समितीचे आंदोलन...तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे....
भारत-अमेरिका व्यापारी कराराची होळी; बहिरखेडमध्ये शेतकरी यल्गार समितीचे आंदोलन...
तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे....
बार्शिटाकळी : शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा भारत-अमेरिका व्यापारी करार रद्द करावा, या मागणीसाठी आज होळीच्या मुहूर्तावर शेतकरी यल्गार समितीने आक्रमक पवित्रा घेतला. बार्शिटाकळी तालुक्यातील बहिरखेड येथे या जाचक कराराच्या प्रतींची होळी करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. भारत अमेरिका व्यापारी करार हा भारतीय शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. या करारामुळे शेती व्यवसाय उद्ध्वस्त होईल आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरेल, अशी भीती यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. होळीच्या दिवशी सण साजरा करण्याऐवजी आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे चित्र बहिरखेडमध्ये पाहायला मिळाले. यावेळी केंद्र सरकारने प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापारी करार त्वरित रद्द करावा, आयात-निर्यात धोरणात बदल करून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, शेतीमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे अशा मागण्या करण्यात आल्या. या निषेध आंदोलनात शेतकरी यल्गार समितीचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये किरण पाटील ठाकरे, महादेवराव गावंडे, संतोष सोनटक्के, प्रल्हाद माळकर, मंगेश अंधारे. यांच्यासह जनार्दन ठोकळ, गणेश ताठे, सुरेश वानखडे, संजय ठाकरे, भारत चांभारे, पंडित गांजरे, समाधान ठाकरे, स्वप्नील ठाकरे, दत्ता पाटील ठाकरे, प्रकाशराव ठाकरे, किशोर ठाकरे, अनंता घुमसे, बळवंत ठाकरे, प्रमोद पाटील ठाकरे, प्रदीप घुमसे, सोपान ठाकरे, नारायण इंगोले, बंडू इंगोले, प्रशांत इंगोले, पुरुषोत्तम भगत, मोहन ठाकरे आणि शेतकरी यल्गार समितीची संपूर्ण टीम उपस्थित होती. (ता.प्र)
पाणीपुरवठा योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च झाल्यावर काजळेश्वरच्या जनतेची भटकंती
अर्धवट कामाचे देयक काढले, जिल्हा परिषदेच्या सीईओ कडे तक्रार
तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे.....
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी तालुक्यातील
काजळेश्वरच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सखोल चौकशी करून दोशीवर कारवाई करा. अशा प्रकारची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील काजळेश्वर चे उपसरपंच योगेश कोदनकार व गावकऱ्यांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम व आमदार हरीश पिंपळे, यांचेकडे दिलेल्या तक्रारीतून त्यांनी, सन २०२१ २२ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अकोला च्याअंतर्गत जल जीवन मिशन योजनेचे काम मंजूर झाल्यानंतर सदर कामाचे कंत्राट कंत्राटदार गजानन डी देशपांडे यांना देण्यात आले.
पाणीपुरवठा योजनेची कामे करताना, कंत्राटदारांनी शासकीय इस्टिमेट प्रमाणे सदर काम करणे आवश्यक व बंधनकारक होते, परंतु तसे झाले नाही.
देयकसुद्धा उचललेले आहे. सदर कामाअंतर्गत कम्पिंग मशिनरी बसविणे पाईपलाईन टाकने, आरसीसी फोर हेड टाकी उभी करणे, पाणी शुद्धीकरण यंत्रणे आणि इतर व्यवस्था योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे करणे आवश्यक बंधनकारक होते. परंतु तसे झाले नसून आजही अपूर्ण अवस्थेत काही कामे कागदोपत्रीदाखविण्यात आल्याचे व प्रत्यक्षात सदर कामे अस्तित्वात नाहीत. सदर योजनेअंतर्गत गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे गावातील जनतेला आजही पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. त्यामुळे सदर योजनेचा बड्याबोळ झाला आहे. याबाबत कंत्राटदारांना विचारणा केली असता, मी माझ्या मर्जीने काम करेल, तुम्ही माझे मालक नाही. अशा प्रकारचे उडवा उडवी चे उत्तरे देत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. शासनाचे पाणीपुरवठा योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च झाल्यानंतरही सदर योजनेचे अर्धवट काम का करण्यात आले? गावकऱ्यांना सदर योजनेचे पाणी का मिळत नाही? या सर्व गंभीर बाबीची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. याकामाची सखोल चौकशी करून दोशीवर कारवाई करावी. अशा प्रकारची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडे २७ फेब्रुवारीला योगेश कोदनकार व गावकऱ्यांनी केली आहे. (ता.प्रतिनिधी)
आमदारांनी दिले चौकशीचे निर्देश
काजळेश्वर येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी व जनतेचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांचेकडे दिनांक २ मार्चला दिलेल्या पत्रातून सदर योजनेच्या कामाची सखोल चौकशी करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचे पत्र आमदार हरीश पिंपळे यांनी दिले आहे.
Comments
Post a Comment