कृत्रिम बुद्धिमत्ता भावी शिक्षक ठरू शकत नाही - डॉ गोवर्धन बंजारा...
कृत्रिम बुद्धिमत्ता भावी शिक्षक ठरू शकत नाही - डॉ गोवर्धन बंजारा...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- स्थानिक गुलाब नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी तथा मधुकरराव पवार कला महाविद्यालय, मुर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रिसेन्ट ट्रेंड्स वर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद डॉ मधुकरराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली
उद्घाटन पर भाषणामध्ये डॉ गोवर्धन बंजारा यांनी अतिशय शास्त्र पद्धतीने मार्गदर्शन करत आज AI चा जमाना आहे या संशोधकांना घडवणारा शिक्षक आहे पण आजची कृत्रिम बुद्धिमत्ता ही उद्याचा भावी शिक्षक ठरूच शकत नाही असे उद्गार काढले या परिषदेला भारताच्या बाहेरील तथा भारताच्या विविध राज्यातुन अनेक संशोधक विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व इतरांनी यामध्ये सहाशे च्या जवळपास नोंदनी करून, तिनशे च्या वर शोधनिबंधाची नोंद करण्यात आली.सकाळी अकरा वाजता उदघाटन सोहळा पार पडला. यामध्ये अनेक मान्यवरांचा सामावेश होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ मधुकरराव पवार म्हणून, तर उदघाटक म्हणून डॉ गोवर्धन बंजारा हे उपस्थित होते. मंचकावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस खान, तथा डॉ बंडगर, उपप्राचार्य डॉ संतोष हुसे, डॉ अमीत वैराळे, प्रा आदित्य पवार, मा प्राचार्य डॉ तारेश आगाशे, डॉ माधुरी पाटील, डॉ आर डी सीकची इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा व वसंतराव नाईक यांचे पूजन व स्वागत गीताने झाली. पुढे सर्व मंचावर उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व शिलड देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्राचार्य बिस्मिल्ला खान यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तसेच महाविद्यालयाचे यश महाविद्यालयाचे स्थिती आणि दशा अशा विविध विषयांवर प्रास्ताविक मधुन त्यानी मार्गदर्शन केले . डॉ कमलकिशोर गुप्ता यांनी आपल्या संशोधनात्मक शैलीतून विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या समस्या स्पष्ट केल्या डॉग सेक्सी यांनी आपल्या भाषणातून या परिषदेला शुभेच्छा दिल्यात सर्वच उपस्थितांच्या हस्ते या परीषदचे संशोधन पुस्तिका प्रकाशित करण्यायत आली आजचा विद्यार्थी हा मोबाईल फेसबुक इंटरनेट AI च्या जाळ्यात अडकलेला आहे तो या देशाचा आधारस्तंभ आहे त्याला सुरक्षित कसं राहील याच्यासाठी अनेक संशोधनात्मक प्रयोग करून अशा विविध विचाराचा दिवसभर मंथन करावे अशा शब्दात डॉ मधुकरराव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त केले पहिल्या सत्राचे आभार प्राचार्य डॉ बंडगर यांनी तर सूत्रसंचालन डॉ वाघमारे व डॉ जैन यांनी केले. विज्ञान शाखेचे तांत्रिक सत्र 1 व 2 पार पाडले, या मध्ये, अमरावती विद्यापीठाचे डॉ नाईक, डॉ गजानन मूळे, यु एस येथील सुहास भोसले, डॉ संतोष कुटे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या सत्रामध्ये विविध संशोधक प्राध्यापकांनी आपले पेपर प्रेझेंट केले तेव्हा अनेकांनी प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांचे निरसनही केले या सत्राचे दमदार सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ दीपक चौरपगार व प्रा वैशाली सोनोने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ आर एल सरकटे यांनी केले दरम्यान संशोधन विद्यार्थ्यांचे पोस्टर सादरीकरण करण्यात आले. या साठी डॉ भोकरे, डॉ देव्हडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. शोधनिबंध सादरीकरण झाल्या नंतर त्यामधून क्रमांक काढण्यात व त्यांना समारोपीय कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी या परिषदेचे सचिव डॉ मनोज जाधव यांनी सर्वांचे आभार मानले डॉ प्रवीणकुमार राठोड प्रवीण देशमुख डॉ सुनील कोल्हे डॉ शरद इढोळे आदित्य खाडे पंजाब जाधव सुभाष जाधव यांनी या परिषदेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment