बार्शिटाकळी पाणी पुरवठा योजनेतील कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे नगरसेवक सै. जहांगीर यांची मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांच्या कडे मागणी......

बार्शिटाकळी पाणी पुरवठा योजनेतील कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे नगरसेवक सै. जहांगीर यांची मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांच्या कडे मागणी...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात मोठा विलंब झाल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नपं चे नगर सेवक सै. जहांगीर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांच्या कडे एका निवेदन द्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत बार्शीटाकळी शहरासाठी पाणी पुरवठा योजना प्रकल्पास २४ मार्च २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार बार्शीटाकळी नगरपंचायत मार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण करून अकोला येथील कंत्राटदार श्याम भगवंतराव माहोरे यांना ६ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला होता. करारानुसार हे काम १८ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये कंत्राटदाराने विहित मुदतीत काम पूर्ण केले नसल्याचे समोर आले आहे. शहरात ४ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या दोन पाणी साठवणटाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, गुरुत्वाकर्षण वाहिनी (ग्रॅव्हिटी मेन) तसेच एचडीपीई पाईपलाईन टाकण्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय पाईपलाईन टाकताना रस्ते व गल्ल्यांमध्ये करण्यात आलेले खोदकाम योग्य पद्धतीने दुरुस्त न केल्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, या कामाची अंदाजपत्रकीय किंमत २७ कोटी १ लाख २० हजार २८७ रुपये (जीएसटी वगळता) असताना कंत्राटदाराला सुमारे ७ टक्के जास्त दराने म्हणजेच अंदाजे १ कोटी ८९ लाख रुपयांनी अधिक दराने काम देण्यात आले आहे. त्यामुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस देऊन सुरक्षा अनामत रक्कम जप्त करावी, तसेच शेवटची संधी देत सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची हमी घ्यावी, तोपर्यंत कोणतेही बिल अदा करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांतही काम पूर्ण न केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशीही मागणी सुद्धा करण्यात आली आहे. तसेच बार्शिटाकळी शहरातील नागरिकांना लवकरात लवकर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगर सेवक सै. जहांगीर यांनी निवेदनातून केली आहे. या विषया वर काँट्रेक्टर श्याम माहुरे यांच्या शी संपर्क साधला असता  फंड न मिळाल्याने काम रखडल्या गेले आहे. तर फंड मिळाल्या नंतर काम सुरु करण्याचा त्यांनी सांगितले .

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....