विद्यार्थ्यांनी परमनंट मेमरी कडे वळावे - प्रकाश पोहरे

विद्यार्थ्यांनी परमनंट मेमरी कडे वळावे - प्रकाश पोहरे 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शिटाकळी येथे देशोन्नती वृत्तपत्राचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे व डॉ मधुकर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवीदान समारंभ संपन्न झाला यावेळी मंचकावर श्री प्रकाश पोहरे डॉ मधुकरराव पवार प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान उपप्राचार्य डॉ संतोष हुसे डॉ अमित वैराळे दादाराव भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते 
 कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी डॉ दीपक चौरपगार यांनी विद्यापीठ गीताचे आयोजन केले श्री प्रकाश पोहरे यांनी आपल्या भाषणात बोलत असताना विद्यार्थ्यांनी परमनंट मेमरी  कडे वळावे कारण आज चा युवक हा सोशल मीडियामध्ये गुंतलेला आहे तो स्वतःच फसत आहे देशात अनेक समस्या आहेत त्यामध्ये एक नवीन समस्या उद्भवत आहे जसे नोकरी नाही तर छोकरी नाही अनेक युवक अविवाहित राहतील युवकांनी काय करावे अशा विविध समस्यांना उजाळा देत त्यांनी मार्गदर्शन केले. या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत आहे विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रत्येक क्षेत्रामध्ये पारंगत व्हावे आज अनेक विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत त्यांच्या उज्वलमय भविष्यासाठी शुभेच्छा देत डॉ मधुकरराव पवार यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले त्याआधी प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान यांनीही विद्यार्थ्यांसमोर असलेली आव्हाने केवळ नोकरीकडेच न वळता उद्योग धंदा व्यवसाया कडे सुद्धा वळावे समाजात आपले आपल्या परिवाराचे व महाविद्यालयाचे नावलौकिक करावे अशी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले पदव्युत्तर समाजशास्त्र विभागातून कु निकिता सरकटे,रेणुका ठाकरे, रवी शेगोकार,हे प्रथम श्रेणी मध्ये आलेत तर पदव्युत्तर विज्ञान शाखेतून आकाश वानखेडे, रोशन खोटरे, बीए बीएस्सी बीकॉम या तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांना श्री प्रकाश बोहरे डॉ मधुकरराव पवार बिस्मिल्ला खान संतोष विषयी यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रा चे वितरण करण्यात आले यावेळी बक्षीस वितरणाची मोठी जबाबदारी रोहिदास आडे व डॉ मतीन यांनी सांभाळली कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ संतोष हुसे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ दीपक चौरपगार व प्रा वैशाली सोनोने यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ अमित वैराळे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला डॉ प्रवीणकुमार राठोड, डॉ मनोज जाधव, डॉ शरद इढोळे, डॉ विनोद उंडाळ , डॉ संतोष सुरडकर, डॉ मोहन बल्लाळ,  डॉ अजित पाटील , डॉ भीमराव जैवळ,  प्रा गायकवाड, डॉ कैलास काळे, प्रा युवराज काळे, डॉ प्रियंका मसतकर , डॉ दीपिका जैन, डॉ नीलिमा कंकाडे, प्रा योगिता चव्हाण, प्रा संजय चव्हाण, श्री नंदकुमार राऊत , गोकुळ भड तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंजाब जाधव,  आदित्य खाडे,  मंगेश चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. 

जिल्हा हज तरबियती शिबीराचे बार्शिटाकळी येथील फिरदौस फंक्शन हॉल मध्ये आयोजन.......
बार्शिटाकळी :-  पवित्र हज 2026 साठी जाणाऱ्या हज यात्रेला जाणारी मंडळी साठी जिल्हा तरबियती शिबीराचे आयोजन 31 मार्च 2026 रोजी बार्शिटाकळी येथील फिरदौस फंक्शन हॉल, कासम नाना चौक बाय पास येथे करण्यात येणार आहे.
सदर शिबिर मोठी मस्जिद बैद पुरा अकोला चे इमान, व खतीब मौलाना सफदर खान कासमी यांच्या नेतृत्वाखाली व जामा मस्जिद अकोला चे इमान, व खतीब मौलाना अब्दुल जब्बार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन या शिबीरा मध्ये हज कसा करणार या विषयावर मास्टर अल्हाज मिर्झा जफर बेग व मास्टर मोहम्मद शफीक अहमद सविस्तर माहिती देणार आहे. सदर शिबीरा मध्ये जिल्हा भरातील सुमारे 400 च्या आसपास हज यात्रे करू भाग घेणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

अकोला जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवपदी संगीता जाधव यांची अविरोध निवड.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
बार्शिटाकळी :- अकोला जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या अकोला र. नं. 168 
25 मार्च 2026 रोजी दुपारी ३ वा. संस्थेचे कार्यालय हर्ष संकुल दुसरा मजला राजूरकर कंपाऊंड सिव्हिल लाईन अकोला येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार या पदाची निवड सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष बार्शीटाकळी तालुक्यातील संगीता जाधव यांची सचिव पदी अविरोध निवड करण्यात आली. संगीता जाधव ह्या सतत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यासाठी लढत असतात. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप मोठे संघर्ष केलेले आहे. 
 तसेच अध्यक्ष पदासाठी पांडुरंग तेलगोटे, सचिव पदासाठी संगीता जाधव , उपाध्यक्ष पदासाठी संगीता पोरे , खजिनदार पदासाठी संजय डाबेराव, यांनी नामांकन अर्ज दाखल केला, मात्र नियोजित वेळेत विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्षपदी पांडुरंग तेलगोटे, सचिव पदी संगीता जाधव, उपाध्यक्षपदी संगीता पोरे, खजिनदार पदी संजय डाबेराव यांची अविरोध निवड करण्यात आली. अशी घोषणा करण्यात आली, यावेळी संचालक गितेश गुंजाम, संचालक राजू मोरे, संचालक सुनील मेसरे, संचालक मंगला तितुर, संचालक प्रज्ञा तायडे, यावेळी उपस्थित होते, तर निवडणूक अध्यसी अधिकारी म्हणून डी.डब्ल्यू.शिरसाट आशिष घाटोळे कनिष्ठ लिपिक यांनी काम पाहिले.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....