जमिअत उलेमा-ए-हिंद महान युनिटने आयोजित केलेले एसआयआर मॅपिंग शिबिर यशस्वीरित्या पार......
जमिअत उलेमा-ए-हिंद महान युनिटने आयोजित केलेले एसआयआर मॅपिंग शिबिर यशस्वीरित्या पार.......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी तालुका जमियत-ए-उलामा ग्राम महान युनिट तर्फे शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी जिल्हा सदस्य अलहाज मास्टर शब्बीर खान यांच्या नेतृत्वाखाली डॉ.मोहम्मद अश्रफ यांच्या संकुलात एक दिवसीय SIR मॅपिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ अनेकांनी घेतला व मॅपिंग, नाव दुरुस्ती आदी सर्व कामे करण्यात आली ज्यामध्ये महान सर्कलचे सर्व बीएलओ देखील सहभागी झाले होते.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बार्शिटाकळी तालुका जमीयत-ए-उलामा महान युनिटचे पदा अधिकारी हाफिज इनायत खान साहब, मुफ्ती मोहम्मद वसीम साहब, डॉ.मोहम्मद अशरफ, तंटा मुक्ती महान अध्यक्ष शेख रशीद, हाफिज जावेद खान, अब्दुल हक उर्फ जावेद, शेख सादिक, शेख साजिद, हरमन खान, सोहेल खान यांनी परिश्रम घेतले.यावेळी मोहम्मद आबिद, वसीम जहागीरदार सर, शेख महेमूद, नदीम जहागीरदार, एजाज खान, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment