राजनखेड येथे रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न.....बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे

राजनखेड येथे रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- स्थानीक बार्शिटाकळी येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शिटाकळी जि. अकोला, राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत सत्र २०२५-२६ चे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप राजनखेड येथे संपन्न झाला. सदर रासेयो चे निवासी श्रमसंस्कार शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बि एस खान, गावचे सरपंच ईश्वरसिंग जाधव, उपसरपंच शुभम घुगे व जि प शाळेचे मुख्याध्यापक राजेश पातोडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. शेवटच्या दिवशी महाविद्यालयाचे ऊपप्राचार्य डॉ अमीत वैराळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सत्राची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्वलन व विद्यापीठ गीताने करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत झाडांचे रोपटे देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा से यो चे कार्यक्रम धिकारी डॉ. व्हि.एस.उंडाळ यांनी केले. सात दिवसीय निवासी शिबीरात आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा व कार्यक्रमांचा लेखाजोखा सांगितल्यानंतर काही शिबीरार्थिंचे मनोगते झाली.
 यामध्ये महादेव खंदारे, सोनाक्षी भाकरे इत्यादींचा समावेश होता. नंतर मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. यामध्ये जि प शाळेचे मुख्याध्यापक राजेश पातोडे, सहायक शिक्षक गोदमळे, ढोकने, राठोड मॅडम, महाविद्यालयाचे डॉ गायकवाड, डॉ कौटोंबे मॅडम इत्यादीचा समावेश होता. शिबीरार्थिंनी गावच्या विकासासाठी केलेले काम हे अविस्मरणीय असुन याचा फायदा गावकऱ्यांना नक्कीच होईल असे त्यांनी सांगितले व सर्व शिबीरार्थिंचे अभिनंदन करुन आभार मानले. सर्वात शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ अमित वैराळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकासा संबंधित विस्तारित मुद्दे मांडले. गावामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करून त्यांनी गावकऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. सोबतच गावामध्ये निरंतर चालु असलेल्या विविध समाजपयोगी कामांचा सुद्धा समाचार घेतला व गावकऱ्यांचे अभिनंदन केले. या समारोपीय सत्राचे सुत्रसंचालन सोनाक्षी भाकरे तर आभार प्रदर्शन शितल चव्हाण हीने केले. शिबिराचे समारोपीय सत्र सुरळीत व यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी रा से यो चे कार्यक्रम अधिकारी डॉ. ऊंडाळ, डॉ कोटंबे, डॉ गायकवाड, सोबतच विद्यार्थी सविता धनगोल, प्रिया जामनीक, रूषिकेश सावळे, अंकुश मोहोड, शेख दानिश, शंकर आडे, इत्यादींनी मोलाची कामगिरी पार पडली. सर्वात शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 


Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....