बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक व इफ्तार पार्टीचे आयोजन.....शहराची शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांचे आवाहन.....बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक व इफ्तार पार्टीचे आयोजन.....
शहराची शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांचे आवाहन.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- आज बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या गुढिपाडवा, रमजान ईद, व रामनवमी सणाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांनी सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ, फोटो बनवून त्या फोटोची व व्हिडिओ ची शहानिशा न करता वाष्टअप ग्रुप वर शेअर करण्यात येतात असे फेक व्हिडिओ किंवा फोटो मुळे समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणी करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन बार्शिटाकळी शहराची शांतता होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.
तसेच रमजान महिन्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे सुद्धा आयोजन करण्यात आले..
यावेळी या सभेला प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक श्री चाठे साहेब, नव्याने रूजू झालेले उपनिरीक्षक श्री पवार साहेब, नगरसेवक श्री रमेश वाटमारे, मासुम खा, नगरसेवक शुभम ईगळे, गोबा शेठ, अनंत केदारे, गजानन वाटमारे, सुनील सिरसाट, श्रावण रामदास भातखडे, सै रियासत, प्रकाश माणिकराव, मो. सोयब, इमरान खान, महेफुज पठाण, सै अन्सार, अर्शद उल्ला खान, मो. सादिक लीडर, सै इरशाद, सै अमिन, सै असद अली, हाजी सादिक उर जमा , मो. राजीक, मो.फरहान, इत्यादी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खुपिया विभागाचे अधिकारी सावंग साहेब यांनी केले
Comments
Post a Comment