दोनदच्या आसरा मंदिरात यात्रा महोत्सव उत्साहात साजरा...बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे

दोनदच्या आसरा मंदिरात यात्रा महोत्सव उत्साहात साजरा...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळीः येथून २५किलोमीटर अंतरावर दोनद गावात आसरा मातेचे पुरातन मंदिर आहे. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. देवीच्या दर्शनाकरिता दुरून भाविक येऊन नवस बोलतात, ज्या लोकांचे नवस पूर्ण झाले ते नवस फेडण्याकरिता येतात. आसरा मातेचे मंदिर जागृत असून या देवीच्या दर्शनाकरिता अमरावती, नागपूर, यवतमाळ, परभणी, नांदेड एवढेच नव्हे तर यावेळेस दिल्लीहून भाविक लोक दर्शनाकरिता आले होते. आसरा माता देवी दर्शनाकरिता गर्दी झाली होती, या देवीच्या दर्शनाकरिता हजारोच्या संख्येने दर्शनाकरिता लाईन लागली होती. महिला पुरुष दर्शन करण्या अगोदर नदीपात्रामध्ये आंघोळ करून व त्यांचे जे काही नवस मानलेले असतात ते नवस पूर्ण करण्याकरिता आसरा मातेचे दर्शन करत . दोनद खुर्द या गावांमध्ये जिकडे आपली नजर गेली तिकडे भाविक लोकांचे रोडगे बनवने चालू होते. या गर्दीचा चोरांनी फायदा घेऊन हात साफ करू नये याकरिता पिंजरचे  ठाणेदार गंगाधर दराडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भव्य स्वरूपात यात्रा भरते. चैत्रनवरात्र उत्सव भक्ती भावाने साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....