बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न...👉विद्यार्थी मेळाव्यामुळे गाव विकासाला चालना! --समाजसेवक गजानन हरणे यांचे प्रतिपादन...
बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न...
👉विद्यार्थी मेळाव्यामुळे गाव विकासाला चालना! --समाजसेवक गजानन हरणे यांचे प्रतिपादन....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : “चला पुन्हा एकदा जगूया, बालपणाचे ते सोनेरी दिवस!” या भावनिक हाकेला प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कावसा बु. येथे शासकीय आदेशानुसार आयोजित माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध पुन्हा दृढ केले. यावेळी मेळाव्याला संबोधताना माजी विद्यार्थी ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे म्हणाले की या माजी विद्यार्थी मेळाव्यामुळे गाव विकासाला चालला मिळत असून त्यांच्या सहकारामुळे मोठा विकास, बदल होऊ शकतो. त्यामुळे अशा मेळाव्याची आज गरज आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सरलाताई टेकाडे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. मधुकररावजी सूर्यवंशी (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अकोट) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख अतिथी सरपंच डॉ. शिवदास बुटे, उपसरपंच पांडुरंग वानखडे, गजानन सावरकर (विस्तार अधिकारी), सौ. साधनाताई वाघोडे, श्री. अनंत नहाटे तसेच श्री. निशिकांत भुरे (केंद्रप्रमुख तथा गट समन्वयक)साधनाताई बापोडे,श्री. निशिकांतजी भुरे
केंद्रप्रमुख, गटसमन्वयक सुधाकर जायले माजी सरपंच, राजकुमार वानखडे, विठ्ठल दामोदर, संजय दामोदर, राम चिंचोळकर, पोलीस पाटील नीलकंठ सावरकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल तळी, ग्रामसेवक यश देशमुख, मोहन सावरकर, सुनिता दामोदर, प्रल्हाद भोयर ,उंबरकर साहेब आदी मान्यवरांसह माजी विद्यार्थी मंचावर उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, पोलीस निरीक्षक मनोहर वानखडे, अनंत खेडकर, प्रशांत शेवतकर, सौ सविता काकड , सुरेश बुटे, कविता शेगोकार, अजय घनबहादुर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला वस्तू रुपात व पैशाच्या रूपात देणगी दिल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले आदी थोर पुरुषांच्या प्रतिमेला पूजन व हारअर्पण करण्यात आले उपस्थितांचे मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांच्या भावना दाटून आल्या. बालपणीचे निरागस क्षण, वर्गातील गमतीजमती, खेळाचे मैदान, शाळेतील संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा उल्लेख करत उपस्थितांनी भूतकाळाचा जणू जिवंत अनुभव घेतला.
या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर संवाद वाढला असून शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून व्यक्तिमत्त्व घडविणारे संस्कारकेंद्र आहे, याची जाणीव उपस्थितांना या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून झाली.कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या मित्रांसोबत गप्पा, हास्यविनोद आणि आठवणींचा खजिना उलगडत वातावरण अत्यंत आनंदमय झाले. अनेकांनी अशा मेळाव्यांचे सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी संघ तसेच बजरंग बली सेवा समिती व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. त्यामध्ये मुख्याध्यापक संदीप सावरकर, पत्रकार सोनू जाधव, गोपाल सावरकर सतीश जायले, सुभाष मंडोकार, वासुदेव येलोवणे विठ्ठल दामोदर, गणेश टेकाडे , अजाबराव दामोदर, योगेश दामोदर, हरीश दामोदर, मंगेश चंदन, संदेश वानखडे, ऋषी बोंद्रे, शिवा बुटे, खुशी सावरकर , दुर्गा जाधव, मंगेश पोटे, सुगत वानखडे, गौरव बुटे, अभिषेक कावरे, पुनम पोटे, मोहन दामोदर, मधुकर मडोकार, प्रभाकर वानखडे माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे शाळेच्या प्रगतीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.बालपणीच्या निरागस क्षणांची पुनर्भेट घडवून आणणारा हा स्नेहमेळावा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी स्मरणरंजनाचा ठेवा निर्माण करून गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप सावरकर तर सूत्रसंचालन चंद्रशेखर महाजन सोनू जाधव तर आभारप्रदर्शन संतोष पवारसर यांनी केले. या कार्यक्रमाला दूर दूरन माजी विद्यार्थी उपस्थित झाले होते.
Comments
Post a Comment