बार्शिटाकळीत प्रभमच संगीतमय भीम जयंती उत्सव सोहळा...बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीत प्रभमच संगीतमय भीम जयंती उत्सव सोहळा...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी, ता. १७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त करुणाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था बार्शीटाकळी यांच्या वतीने 'समता पर्व २०२६' अंतर्गत संगीतमय भिमजन्म सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
गुरुवारी (ता.१६) पंचायत समिती समोरील भीम वाटिका येथे आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात अॅड. नीलू सराटे यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने झाली. त्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत कर्मचारी, पोलिस प्रशासन तसेच पत्रकार बांधवांचा पर्यावरणपूरक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यानंतर भीम-बुद्ध गीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभावी जागर करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,