हात मजुरी करणाऱ्या ची मुलगी बनली कर सहाय्यक अधिकारी.! 👉"ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास" 👉वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आई वडीलासह मुलीचा सत्कार.!
हात मजुरी करणाऱ्या ची मुलगी बनली कर सहाय्यक अधिकारी.!
"ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास"
वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आई वडीलासह मुलीचा सत्कार.!
प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : परिस्थिती कितीही बेताची असेल तरी मनात जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर आकाशालाही गवसनी घालता येते हे अकोला तालुक्यातील धोर्तडी येथील हात मजुरी करणाऱ्या दीपक आठवले यांची मुलगी मोनाली आठवले हीने ट्युशन न लावता एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षा पास करून सिद्ध करून दाखवले लहानपणापासूनच मोनाली ची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे वडील दीपक आठवले गावात मिळेल ते व नळ फिटींगचे मजुर म्हणून काम करतात तर आई शेतीची काम करते मोनाली चे प्राथमिक शिक्षण धोर्तडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्याशाळा अकोला येथे झाले मोनाली ने शिष्यवृत्तीच्या पैशावर एम कॉम करून उच्चशिक्षण पूर्ण केले
घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी कोणतीही ट्युशन न लावता स्वतः घरीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून एकाच वेळी समाज कल्याण विभागात लिपिक तर उच्च न्यायालयात बेलीफ आणि सेल टॅक्स विभागात टॅक्स असिस्टंट ( कर सहाय्यक) अधिकारी या तीनही स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्यात या तीन स्पर्धा परीक्षा पैकी टॅक्स असिस्टंट अधिकारी या पदावर मोनाली नियुक्ती स्वीकारणार आहे या यशाची दखल घेत वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी मोनाली च्या धोर्तडी येथील घरी जाऊन आई-वडिलांसह मोनाली चा सत्कार करून शुभेच्छा दिल्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोनाली ने मिळवलेले यश गावातीलच नव्हे तर सर्व समाजातील सर्व गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे गौरवउद्गार जिल्हा पदाधिकाऱ्यांनी यावेळी काढले या वेळी वं ब आ सांगळुद सर्कल अध्यक्ष अमित खंडारे,भारीप बहु अकोला तालुका माजी महासचिव प्रदीप पळसपगार, हिम्मत वानखडे, प्रमोद वानखडे, सुधाकर मालठाने, सुरेश गवळी,मा. उपसरपंच परेश ढवळे, राजूभाऊ बिलेवार, संजय किर्तक, उमेश वानखडे, ज्ञानेश्वर वानखडे, संजय वानखडे, राहुल वानखडे, प्रतीक आठवले, उमेश देवतळे, दीपक आठवले इत्यादी सह अनेक गावकरी उपस्थित होते यावेळी बोलताना मोनाली ने वडील दीपक आठवले हे एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सुरुवातीच्या काळापासून सक्रिय असल्यामुळे आमच्या घरात आंबेडकरी विचार रुजले व त्यामुळेच मनात जिद्द ठेवून मी हे यश संपादन करू शकले असे मत मोनाली आठवले हिने यावेळी मांडले.
Comments
Post a Comment