महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी.!👉डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासोबत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार पुढे घेऊन जावे - सुजात दादा आंबेडकर
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी.!
👉डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासोबत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार पुढे घेऊन जावे - सुजात दादा आंबेडकर
प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती वंचित बहुजन आघाडी नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय अकोला येथे उत्साहात साजरी करण्यात आली सुजात दादा आंबेडकर यांनी यावेळी विचार मांडताना मुलींना शिक्षण देण्यासाठी, स्त्री पुरुष समानतेसाठी, जातिव्यवस्थेचा अंत करण्याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारा सोबत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार पुढे घेऊन जावे असे आव्हान करून महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या व येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 189 व्या जयंतीचा कार्यक्रम अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महासचिव मिलिंद इंगळे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयात आयोजित केला होता
या वेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे युवक अध्यक्ष श्रीकांत घोगरे महिला अध्यक्ष आम्रपाली खंडारे, राजकुमार दामोदर, सिद्धार्थ देवदरीकर, निलेश देव, ज्ञानेश्वर सुलताने, प्रभाताई शिरसाट, शोभा शेळके, अनुराधा ठाकरे, पवन बुटे, किशोर जामनिक, गजानन गवई, सुनील फाटकर, मनोहर बनसोड, शेख शमशु, पराग गवई, नितीन सपकाळ, सहदेवराव भटकर, गजानन दांडगे, पवन डोंगरे, प्रदीप पळसपगार, सतीश चोपडे, आनंद डोंगरे, उमेश देवतळे, किरण पळसपगार, सिद्धार्थ शिरसाट, सुरेंद्र तेलगोटे, दीपक गवई, अन्सारभाई, सुमित नवलकर, अमित निमकर्डे, वासिमभाई, सुरेश कल्लोरे, शीलवंत शिरसाट, मंदताई शिरसाट, प्रतिभा भोजने, प्रेमराज भटकर, राजीकभाई,चिचोळकार, डॉ. मेश्राम, बबलू शिरसाट, विकास सदाशिव,रोशन ताजने, किशोर तेलगोटे, विवेक काकड, संतोष कीर्तक,सुयोग आठवले, हर्षल लोखंडे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment