दगडपारवा येथील रस्ता अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित तक्रारी करून कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा इशारा......

दगडपारवा येथील रस्ता अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित तक्रारी करून कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा इशारा
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : दगडपारवा येथील वार्ड क्रमांक २ मधील रस्ता अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या १० ते ११ महिन्यांपासून प्रलंबित असून, प्रशासकीय उदासीनतेमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने श्रीकृष्ण सूर्यभान खंडारे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण खंडारे हे घरासमोरील रस्ता त्यांच्या मोकळा करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, बार्शीटाकळी यांच्याकडून मिळालेल्या पत्रातही दगडपारवा येथील गावठाण आणि गायरान क्षेत्रातील अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे सीमांकनाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याचे सांगण्यात येत आहे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होऊन रस्ता मोकळा होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीची कोणतीही देयके (बिले) काढू नयेत, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. तसेच, दोषी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा नाइलाजास्तव कार्यालयात बसून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जर आपली तक्रार खोटी असेल, तर आपल्यावर कारवाई करावी असे त्यांनी म्हटले आहे. 

सदर जागेबाबतची मोजणी करण्यासाठी बार्शिटाकळी भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालय येथे अर्ज दिलेला आहे. त्यांनी सीमांकन करून दिल्यावर पुढील कार्यवाही करता येईल.
एन.व्ही. दिवनाले ग्रामसेवक, दगडपारवा

आम्हाला ह्याविषयी अधिकारी नसल्यामुळे , याबाबत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्र व्यवहार करून सदरची समस्या शक्य तेवढ्या लवकर निकाली काढण्याचे प्रयत्न करतो.

आर. पी. पवार गट विकास अधिकारी, बार्शिटाकळी

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,