बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३७५ रुग्णांची तपासणी...

बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३७५ रुग्णांची तपासणी......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  ग्रामीण रुग्णालय, बार्शिटाकळी येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला, विघ्नहर्ता रुग्णालय, अकोला तसेच संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
दि. २० जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या शिबिरात एकूण ३७५ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), थायरॉईड, कर्करोग (कॅन्सर), कान-नाक-घसा (ईएनटी), अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) तसेच बालरोग आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजना साठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैदकीय अधीक्षक डॉ.वृषाली खोंडे यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये शालिनी खाडे, उमा माने, चित्रा सोनवणे, मोनाली गवई, संकेत ढोके, मोहन लोणकर, आकाश गवई, संजू निधाने, राम बायस्कर, प्रभाकर तिडके, अनंत जाधव, गणेश डांगे, शितल राहणे, डॉ. निखिल देशमुख, अर्चना शर्मा, दर्शना घावट, प्रफुल्लता डोंगरे, डॉ. मनीष मेन, पंकज इंगोले, किरण बेलवाल यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला, विघ्नहर्ता रुग्णालय, अकोला आणि संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल, अकोला येथील तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी यांनी शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवत रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,