विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी महाराष्ट्र बंदला बार्शीटाकळीत उत्स्फूर्त प्रतिसाद......
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी महाराष्ट्र बंदला बार्शीटाकळीत उत्स्फूर्त प्रतिसाद....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी, दि. 23 जुलै : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 23 जुलै महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला बार्शिटाकळी शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्यापारी, नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत बंद यशस्वी केला.
या बंदद्वारे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि चौकशीनंतर कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही आणि संविधानिक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तालुक्यातील तालुका कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तसेच आजी-माजी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा बंद शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यात आला.
या आंदोलनात तालुका अध्यक्ष गोरसिंग राठोड, जेष्ठ नेते नईम भाई, ता. महासचिव अजय अरखराव, शहर अध्यक्ष अजहर पठाण, भारत निकोशे, उपनगराध्यक्ष अबरार भाई, दादाराव सुरडकर, गोपाल चव्हाण, सतीश पवार, गोबा सेठ, इमरान भाई, मा. गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ, मा. ता. अध्यक्ष अमोल जामनिक, दादाराव पवार, शुद्धोधन इंगळे, स्वप्निल आखरे, श्रीकृष्ण देवकुणबी, रोहीदास राठोड, दिनेश मानकर, विजय चव्हाण, भोरे गुरुजी, तेजराव कळंब, राजदीप वानखडे, पंकज वानखडे, सवाईराम राठोड, अन्सार भाई, नगरसेवक शेख साबीर, नगरसेवक जाफर भाई, मा. नगरसेवक श्रावण भातखडे, गौतम सिरसाट, नरेश सिरसाट, सौरभ उपरवट, सुभाष गवई, राजरतन वानखडे, दिगांबर चक्रनारायण, संतोष इंगळे, विशाल गवई, रक्षक जाधव, विशाल वानखडे, भगवान खंडारे, रणजित राठोड, सुरेश जामनिक, अनिल धुरंधर, भूषण खंडारे, चंदू वानखेडे, विरेंद्र कांबळे, मिलिंद खाडे, विजय खाडे, पवन खाडे, दिगांबर म्हैसने, विजय खाडे, सिद्धार्थ इंगळे, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बार्शिटाकळी तालुक्यातील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी हा लढा पुढेही सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
"विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!"
"विद्यार्थ्यांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही!"
Comments
Post a Comment