गुरुवर्य केवळ भारती महाराजांचे निधन.....उद्या मांगुळ येथे अंत्यसंस्कार......

गुरुवर्य केवळ भारती महाराजांचे निधन.....
उद्या मांगुळ येथे अंत्यसंस्कार......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  राज्यातील विविध भक्तांचे श्रद्धास्थान प.पु. गुरुवर्य केवळ भारतीजी महाराज गुरु चंचल भारती जी महाराज वय 101 वर्ष यांचे शनिवार दिनांक १ ऑगस्टला निधन झाले आहे. रविवार दिनांक 2 ऑगस्ट ला बार्शिटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील,दत्त मंदिर परिसरात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. 
बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी ते धाबा रोडवर मिर्जापुर फाट्या पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मांगुळ हे लहान गाव आहे. या गावात गेल्या अनेक वर्षापासून दत्त मंदिरामध्ये प.पू. गुरुवर्य वंदनीय केवळ भारतीजीगुरु चंचल भारतीजी महाराज वय 101 वर्ष हे वास्तव्यास होते. त्यांनी दत्त आनंदसांप्रदाय अंतर्गत राज्यातील विविध गावात दत्त मंदिराची निर्मिती करण्यात पुढाकार घेतला आहे. दत्त सांप्रदाय प्रमाणेच राज्यातील विविध सांप्रदायाचे अनेक साधुसंत व भक्तगण त्यांचे चाहते आहेत. त्यांनी केल्या अनेक वर्षापासून निस्वार्थपणे सांप्रदायाची प्रगती करत अनेक भक्तांचे दुःखमय संसार सुखकर केल्याचा अनेकांचा अनुभव आहे. ते जे बोलत ते खरे ठरत असे,तसेच घडत असे असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. त्यांचे शनिवार दिनांक १ ऑगस्टला दुपारी तीन वाजता चे सुमारास निधन झाले आहे. मांगुळ येथीलदत्त मंदिराच्या परिसरामध्ये त्यांचेवर रविवार दिनांक 2 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता अनेक महंत व साधुसंत, भक्त गणव चाहते यांचे उपस्थितीत शेवटचा निरोप देणार आहेत. यावेळी राज्यातील अनेक भागातून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दत्त मंदिरामध्ये यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सांप्रदायाच्या वतीने दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,