अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणीची बैठक संपन्न.....

अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणीची बैठक संपन्न.....
प्रतिनिधी श्रावण भातखडे 
अकोला :- अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आज अध्यक्ष प्रकाश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीला संपूर्ण नवीन कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी उपाध्यक्ष महासचिव सचिव कोषाध्यक्ष उपस्थित होते. महेश गणगणे महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.झीशान हुसेन उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशांत पाचडे ,सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अक्षय राऊत सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सह माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे व ज्येष्ठ नेते डॉ.अशोक बिहाडे हे या ठिकाणी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस कमिटीचे विजय देशमुख महासचिव यांनी प्रास्ताविक केले व पक्षात प्रोटोकॉल आणि स्वयंशिस्त यावी यासाठी काही अत्यावश्यक सूचना केल्याया त्यानंतर सर्वांना नियुक्तीपत्र व मीटिंग चे मिनिट्स विषय पत्रिका घेऊन तिरंग्यात पंजाच्या दुपट्ट्याने स्वागत करण्यात आला प्रदेश पदाधिकारी व माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे यांच्या हस्ते सगळ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले तर नंतर विषय निहाय चर्चा करण्यात आली त्यामध्ये खास करून जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकी संदर्भातील भूमिका ग्राम समित्या पंचायत मंडल समित्या तसेच संघटन वाढवण्यासाठीच्या काही पॉलिसीज निश्चित करण्यात आल्या व त्याची वेळापत्रक आणि वेळ सुद्धा निश्चित करण्यात आली येणाऱ्या काळात काँग्रेस संघटन मजबुतीसाठी सर्वांना अभिप्राय मागितला असता त्यामध्ये बाळासाहेब बोंद्रे ,सारंग मालांनी ,विजय भाऊ पचारे ,प्रशांत देशमुख, डॉ.प्रमोद अरबट, विनोद आंबूस्कर , कपिल डोके ,गजानन अलाट, सुधाकर शिंदे, आनंदराव सोनटक्के ,बाळापुर तालुका अध्यक्ष सत्यनारायण घाठोळे ,मुर्तीजापुर राजूभाऊ जोगदंड, तेल्हारा गजानन भाऊ वानखडे, इत्यादींनी आपले अभिप्राय व विचार व्यक्त केले त्यानंतर महेश गणगणे महासचिव महेंद्र गवई महानगर अध्यक्ष यांनी सर्व नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशांत पाचडे सचिव अक्षय राऊत सचिव यांनी या सगळ्या विषयाला घेऊन आपले मत व्यक्त केले या सर्व विषयाचे मुद्दे घेऊन एक पुढील काँग्रेस पक्षाचा नीती व कार्यक्रम निश्चित करण्यात आली अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी मीटिंगमध्ये शेवटी आपल्या भाषणात सांगितले त्यानंतर मार्गदर्शनपर भाषण ज्ञानदेवरावजी ठाकरे व ज्येष्ठ नेते डॉ अशोक बिहाडे यांचे झाले सभेचे आभार प्रदर्शन प्रवक्ता संजय आठवले यांनी ९ऑगस्ट क्रांती दिना निमित्त चले जाव आंदोलनात हुतात्म्य स्वीकारलेल्या शहिदांना दोन मिनिट फक्त उभे राहून अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तश्वर पटेल यांनी केले स्नेह भोजनानंतर कार्यक्रम संपला नवीन पद्धतीची कार्यकारणीची ही मीटिंग शिस्ती बद्दआणि साडेतीन तास संघटना ग्राम समित्या व जिल्हा परिषद निवडणुक या विषयावर चर्चा करण्यात आली 
 सगळ्यांना उत्साह होता आणि सगळेच येणारे पदाधिकारी या मीटिंग बद्दल खुश होते आणि अशा पद्धतीने संघटन वाढवणे उत्साहवर्धक ठरेल तसेच अध्यक्षांनी येणाऱ्या काळात लवकरच कार्यकारिणीचा विस्तार करून जी मंडळी संघटनेतली आहे त्यांना मनाचे स्थान देण्यात येईल अशी आश्वासत केले कार्यकारणीला तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते . आभार प्रदर्शन आणि स्नेह भोजना नंतर कार्यक्रम संपला

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,