बार्शिटाकळी पोलिसांनी दिले चार गोवंशाना जिवदान "परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे'' यांची कारवाई....

बार्शिटाकळी पोलिसांनी दिले चार गोवंशाना जिवदान 
"परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे'' यांची कारवाई....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत बार्शिटाकळी पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेल्या ४ गायींची सुटका केली. ११ ऑगस्ट रोजी रात्री खोलेश्वर मंदिर ते हालोपूरा रस्त्यावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सुमारे ८७ हजार रुपये किमतीच्या १ गाय ३ गोरे जप्त केल्या. पोलिस आपल्या मागावर असल्याची माहिती मिळताच आरोपी गुरे मागे सोडून पळून गेले. चारही गोवंशाना म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा संस्थेत संवर्धनासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नव्याने रुजू झालेले परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे यांचे मार्गदर्शनात,एएसआय फराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक अनिल येनेवार, हेडकॉन्स्टेबल ईश्वर पातोंड, अमोल हाके यांनी कारवाई केली. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,