बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला परिविक्षाधिन पोलीस अधिकारी आनंद कांदे रुजू.....

बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला परिविक्षाधिन पोलीस अधिकारी आनंद कांदे रुजू
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी: बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला परीक्षाधिन पोलीस अधिकारी आनंद कांदे रुजू झाले आहेत. बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला काही दिवसापासून पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ हे कार्यरत होते. 11 ऑगस्टला परिविक्षाधिन पोलीस अधिकारी आनंद कांदे हे रुजू झाले आहेत. तर बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांना जिल्हा कार्यालयामध्ये प्रभार देण्यात आल्याचे समजते. पोलीस अधिकारी आनंद कांदे यांना पोलीस सेवेमध्ये कार्य करण्यासाठी प्रथमच बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचा कारभार दिला आहे. कायदा सुव्यवस्था व शांतता निर्माण करत गुन्हेगारीला प्रतिबंध करत पोलीस सेवेचे कार्य करत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,