पत्रकार चौथा आधारस्तंभच नव्हे, समाजाचा दीपस्तंभ !ग्रामीण पत्रकारिता लोकशाहीचा कणा बातमीच्या वेगापेक्षा सत्यता व विश्वसनीयता महत्त्वाची सुधीर मुनगंटीवार...
पत्रकार चौथा आधारस्तंभच नव्हे, समाजाचा दीपस्तंभ !
ग्रामीण पत्रकारिता लोकशाहीचा कणा बातमीच्या वेगापेक्षा सत्यता व विश्वसनीयता महत्त्वाची सुधीर मुनगंटीवार
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी ठेवण्यात पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकार हा केवळ लोकशाहीचा बौथा आधारस्तंभनसूर, समाजाला योग्य दिशा दाखविणारा दीपस्तंभ आहे. सत्ताधारी असो वा प्रशासन, त्यांच्या कामकाजावर लोकशाहीच्या चौकटीत विभर्भीडपणे प्रश्न उपस्थित करून सामान्ना जनतेचा आवाज शासनदरबारी पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकात करीत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदत सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संधाच्या वतीने आयोजित बंद्रपूर किल्लास्तरीय पत्रकार मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संपाचे राज्याध्यक्ष गजानन बाधबारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते. यावेळी राज्य सचिव राजेश डांगटे, राज्य सहसचिव अविनाश राठोड, राज्य प्रवक्ते अनंत गावंडे, राज्य निमंत्रक गोपाल चव्हाण,
जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, जिल्हा कार्याध्यक्ष कुकु सहानी, कोकण विभाग प्रमुख प्रभाकर असचाले, रायगड जिल्हाध्यक्ष रमेश कदम, अशोक असवले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण पत्रकारिता हा पत्रकारितेचा कणा श्रीपाद अपराजित ग्रामीण भागातील पत्रकारिता ही संपूर्ण पत्रकारितेचा घडामोडींच्या तुलनेत ग्रामीण भागातील प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतात. अशा परिस्थितीत ग्रामीण समस्या, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला तसेच कणा आहे. शहरातील गावपातळीवरील प्रशासनाशी संबंधित प्रश्न सातत्याने मांडत असतात. त्यामुळे ग्रामीण पत्रकारितेचे महत्व अधिक अधोरेखित होते, असे श्रीपाद अपराजित यांनी सांगितले, डिजिटल क्रांतीमुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि डिजिटल परफॉर्ममुळे बातमी काही क्षणांत लाखो लोकांपर्यंत पोहोचते. मात्र माध्यम कोणतेही असले तरी
सत्यता, अचूकता, निष्पक्षता, जनहित आणि सामाजिक बांधिलकी ही पत्रकारितेची मूलभूत मूल्ये कधीही बदलता कामा नयेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी बापा करतारा पत्रकारांनी आपल्या लेखणीची विश्वासार्हता जपली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. का मेळावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या विविध तालुक्यांच्या अध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये बैत्यद मुमताज अली (कोच), विशाल प्रभुदास डुबेरे (बल्लारशाह), प्रविण गेडाम (सावती), अशपाक शेख (बरोरा), सुरेश हुने (चिमूर), रुपेश निमसरकर (पोंभुर्णा), श्रीकृष्ण गोरे (राजुरा), शंकर चव्हाण (जिवती) आणि नितीन बडोले (मागधीड) मांथा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाच्या गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला शैक्षणिक क्षेतील सोहम प्रकाश कातराणी, प्रियल प्रकाश हांडे, सुहानी किशोर मासकर, कु. निशिका शशिकांत कामवार, डॉ. मधुरी अनिल हेबे, क्रीडा क्षेत्रातील विहान प्रवीण जीवने, सखी पांडुरंग दोरखंडे, डॉ. ज्योती देऊळकर, तसेच सामाजिक क्षेत्रातील सी. बुलाई मनोज बैरागड आणि यांचा सत्कार करण्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे धुर्बोधन विलास घोंगडे (दै. पुण्यनगरी), गणेश अशोक लोहे (दै. देशोन्नती, नांदा फाटा-कोरषणा), प्रविण बाबूराव गेडाम (सिटी न्यूज, सावली), संदीप रानाकर बांगडे (दै. लोकमत, सिंदेवाही), महेंद्र महादेव कोवले (दै. नवजीवन, बालेरा), (उपसंपादक, दै. लोकमत), हितेश घेतले.
राजनहिरे (महाराष्ट्र न्यूज, वरोरा) आणि अगर आफताब कुरेशी (सिंदेवाही) वांचाही गौरव करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी केले. धर्मेश निकोने यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद पवासे बांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अनिल देठे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, प्रभाकर आवारी, सहसचिव, प्रसिद्धी प्रमुख चनराज कोचे, विकी गुप्ता, सी. सी. आर. टेंपरे, अशोक गुरुवाले यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी कार्यकत्यांनी परिश्रम घेतले
वेगाच्या स्पर्धेत सत्य हरवू देऊ नका ।
डिजिटल युगात सर्वप्रथम बातमी देण्याची स्पर्धा तीव्र झाली आहे. मात्र बातमी सर्वात आधी देण्यापेक्षा ती सर्वात आधी अचूक असणे अधिक महत्वाचे आहे, असे सांगत सुधीर मुनगंटीवारांनी पत्रकारांना महत्वाचा संदेश दिला. अपूर्ण माहिती अफवा किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांना बातमीचे स्वरूप देणे टाळले पाहिजे. प्रत्येक बातमीची तथ्य पडताळणी करूनच ती प्रसिद्ध करणे ही पत्रकारांची सामाजिक जबाबदारी आहे. ग्रामीण पत्रकार हा प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असुन गावखेड्तीयाल समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून ग्रामीण पत्रकार काम करीत असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.
पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा गजानन वाघमारे....
ग्रामीण पत्रकारांना संघटित करुन यांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संच सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत काम करणाच्या पत्रकारांवर होणारे हल्ले ही अत्यंत संवेदनशील आणि गंभीर चान आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवमेदिचस ऐरणीवर वेत असहारा परकार संरक्षण कायद्याची प्रभायी अंगतबजावणी होणे गरजेचे आहे. पत्रकारांवर हल्ले करणान्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि पक्कारांना निर्भय बातावरणान काम करता वाचे, यासाठी शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी राज्याध्यक्ष गजानन वाघमारे यांनी केली.
पावसाने पाठ फिरवली; आता पाण्याचा प्रत्येक थेंब जपा! भविष्यातील पाणीटंचाईचे संकट गंभीर - आमदार पिंपळे
बार्शिटाकळी, :- यंदाच्या पावसाळ्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढविली असून, समाधानकारक पाऊस न झाल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करा आणि उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून ठेवा, असे आवाहन मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी शनिवारी केले.
यंदाचा पावसाळा जणू काही उन्हाळ्यासारखाच निघून जाण्याच्या मार्गावर असून, आषाढी एकादशीच्या
सुमारास झालेल्या तुरळक पावसानंतर अकोला जिल्ह्यासह बार्शिटाकळी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतातील खरीप पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. जमिनीतील ओलावा कमी होत असून, अनेक भागात शेतजमिनींना भेगा पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांसोबतच आता भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पाऊस कमी झाल्याने विहिरी, बोअरवेल, तलाव आणि इतर जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. परिणामी भूजल पातळी खालावली तर गावागावातील बोअरवेल आणि विहिरींचे पाणी कमी होऊ शकते. सध्या उपलब्ध असलेले पाणीही सातत्याने वापरले जात राहिल्यास आगामी उन्हाळ्यात अनेक जलस्रोत कोरडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगामी काही महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. पाणीपुरवठ्याच्या विहिरींमध्ये पाणी कमी झाले तर गावांचा नियमित पाणीपुरवठा प्रभावित होऊ शकतो. अशा वेळी नागरिकांना पाण्यासाठी लांब अंतरावर जावे लागू शकते, महिलांना आणि वृद्धांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागू शकते, तसेच पाण्याच्या टँकरची मागणी वाढल्याने प्रशासनावरही मोठा ताण निर्माण होऊ शकतो.
गेल्या पन्नास वर्षांतील अभूतपूर्व संकट:
सारकिन्ही शिवारातील १,८०० एकर सोयाबीन पिकाचा सत्यानाश
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल
बार्शिटाकळी :- तालुक्यातील महान मंडळामध्ये येणाऱ्या मौजे सारकिन्ही येथील शेतशिवारात बंदा पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पाठविले आहे. गेल्या पत्रास वर्षात अशा प्रकारची भीषण परिस्थिती कधी पाहिली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, यंदाच्या खरीप हंगामाने सारकिन्ही परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक पका दिला आहे. या शिवारात तब्बल १,८०० एकर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला असून, त्यापैकी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक पावसाअभावी सुकून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सारकिन्ही हे गाव आकाराने छोटे असले तरी येथील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. यंदा शेतक-यांनी सोयाबीन पिकाला पसंती देत मोठ्या प्रमाणावर पेरा केला. मात्र पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली. अनेक शेतांमध्ये सोयाबीनची झाडे अक्षरशः माना टाकून पडली आहेत. काही झाडांना शेंगा लागल्या असल्या तरी त्यामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे डोळ्यांसमोर उभे असलेले पीक हातातून निसटताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
राजेश दामोदर गायकवाड, मंगेश जगदेव आंबेकर, सुभाष महादेव आंबेकर यांच्यासह
अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे. पिकासाठी बियाणे, खत, औषधफवारणी, निंदणी, डवरणी आणि मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. अनेक शेतकऱ्यांनी उसने बारी करून किंवा कर्ज काढून पेरणी केली. आता मात्र उत्पादन हातात येण्याआधीच पिके करपल्याने कर्ज फेडायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. आगामी काही दिवसांत बाशीटाकळी तालुक्यात जोरदार पाऊस झाला तरी सध्याची परिस्थिती पाहता सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वेळेत दमदार पाऊस झाला तर काही प्रमाणात पीक सावरण्याची शक्यता असली तरी अनेक शेतांमध्ये उत्पादन केवळ ३० टक्यांपर्यंतच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पाऊस आला तरी शेतकन्यांचे झालेले आर्थिक नुकसान पूर्णपणे भरून निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सारकिन्ही गावचे सरपंच राम पाटील आंबेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी शिवारातील सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी पिकांची झालेली दयनीय अवस्था पाहुन त्यांनी उत्पादनक्षमतेबाबत तीव्र खंत व्यक्त केली. पावसाअभावी हजारो एकर शेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शासनाने तातडीने वस्तुनिष पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या पत्रास वर्षांतील हवामान आणि शेतीच्या अनुभवाकडे पाहता यंदाची परिस्थिती अत्यंत वेगळी असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत. पावसाचे अत्यल्प प्रमाण, वाढत्या तापमानाचा परिणाम आणि जमिनीतील घटलेली ओल यामुळे सोयाबीन पिकाची अक्षरशः वाताहत झाली आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
जमीन खरेदी-विक्री व्यवहारावर निर्बंध
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या कचाट्यात बार्शिटाकळीतील १२ गावे !
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- विदर्भातील दुष्काळी परिस्थितीला कायमचा छेद देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाने आता बार्शीटाकळी तालुक्यात प्रत्यक्ष पाऊल ठेवले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तालुक्यातील तब्बल १२ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधित जमिनींच्या खरेदी आहेत. त्यामुळे या गावांतील शेतकरी आणि जमीनमालकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे. विक्री व्यवहारावर निर्बंध आणण्यात आले
प्रकल्पासाठी भूसंपादन अधिनियमातील कलम ११ अन्वये प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आल्याने संबंधित जमिनींवर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अधिसूचनेनंतर बाधित जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध येतात. मात्र, विशेष परिस्थितीत जमीनमालकाला आपली भूमिका स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याची तरतूद आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेत प्रत्येक जमीनमालकाच्या हक्कांचे संरक्षण, योग्य मोबदला आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी ठरणार आहे.
प्रकल्प विकासाचा मार्ग मोकळा करणार असला, तरी त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचा मोबदला केवळ कागदावरील आकड्यांत मोजला जाऊ नये, अशी अपेक्षा या गावांमधून व्यक्त होत आहे. भूसंपादनापूर्वी जमिनीचे बाजारमूल्य, पिकांचे नुकसान, विहिरी बोअरवेल, झाडे, बांधकामे आणि इतर मालमत्तेचे योग्य मूल्यांकन करून कायद्यानुसार न्याय्य भरपाई देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या १२ गावांवर भूसंपादनाची टांगती तलवार
बार्शिटाकळी तालुक्यातील टिटवा, सय्यदपुरा, तुळजापूर खुर्द, पद्मिनी, सकणी, पुनोती खुर्द, जुनुना, मांगुळ, राजनखेड, राजनखेड तांडा, चिंचोली रुद्रायणी आणि वाघजाळी या गावांचा पहिल्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रियेत समावेश असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी यांना प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतीचे उत्पन्न, घरांचे अस्तित्व आणि भविष्यातील उपजीविका याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
८८,५७४ कोटींचा महाप्रकल्प !
या प्रकल्पाच्या खर्चाबाबत निर्माण झालेला संभ्रमही शासन निर्णयामुळे स्पष्ट होतो. अधिकृत ऋठ मध्ये प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ८८,५७४.९२ कोटी नमूद आहे. त्यापैकी भाग-१ साठी १,२३२.०६ कोटी आणि भाग-२ साठी ८७,३४२.८६ कोटी अशी रक्कम नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या खर्चाच्या आकड्यांकडे पाहून निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी अधिकृत शासन निर्णयातील आकडाच ग्राह्य धरला जाणे आवश्यक आहे.
अकोल्यासाठी नेमका किती लाभ? हा प्रश्न महत्त्वाचा
या महाकाय प्रकल्पातून अकोला जिल्ह्याला मोठा सिंचन लाभ अपेक्षित असला, तरी अकोला जिल्ह्यात नेमके किती हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार, किती पाणी मिळणार आणि कोणत्या तालुक्यांना किती प्रत्यक्ष लाभ मिळणार, याबाबतची माहिती शेतकऱ्यांसमोर स्पष्टपणे ठेवणे आवश्यक आहे. कारण प्रकल्पाचा सर्वाधिक परिणाम ज्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर होणार आहे, त्यांनाच प्रकल्पाच्या लाभाचे स्वरूप आणि भूसंपादनाची संपूर्ण माहिती मिळणे हा पारदर्शकतेचा मूलभूत भाग आहे.
ग्रामसभा कामकाजावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा बहिष्कार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बार्शिटाकळी तहसीलदारांना संघटनेचे निवेदन
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा निषेध नोंदवत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या बार्शिटाकळी शाखेने ग्रामसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. ग्रामसभेदरम्यान अधिकाऱ्यांवर होणारा कथित दबाव व तणावामुळे निर्माण होणारी असुरक्षितता दूर करावी, अशी मागणी युनियनने केली
आहे. ग्रामसभेचे कामकाज ठप्प होऊ नये म्हणून स्थानिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांऐवजी अन्य विभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची ग्रामसभेचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात यावी, असा पर्याय संघटनेने सुचवला आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना व स्पष्ट नियमावली लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक अधिकाऱ्यांना ग्रामसभेच्या कामकाजातून सूट मिळावी, अशी भूमिका घेण्यात आली आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव राजेश बंड, सहसचिव यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या निवेदनामुळे प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment