बार्शिटाकळी तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्याकरिता सर्वपक्षीय एकवटले...👉शेतकरी, शेतमजुरांना मदत मिळावी, 24 सप्टेंबरला तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा...

बार्शिटाकळी तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्याकरिता सर्वपक्षीय एकवटले...
👉शेतकरी, शेतमजुरांना मदत मिळावी, 24 सप्टेंबरला तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा...
तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी: बार्शिटाकळी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, याकरिता बार्शिटाकळीत सर्वपक्षीय नेते तथा कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.
बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टिन शेडमध्ये शनिवार 19 सप्टेंबरला एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बार्शिटाकळी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी व मजुरांना मदत मिळावी, याकरिता 24 सप्टेंबरला कृषी उत्पन्न बाजार समिती पासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नियोजन ठरविण्यात आले. यावेळी सुनील धाबेकर, गोपाल काकड गजानन आखरे, रमेश बेटकर, प्रभाकर खांबलकर, महफूज खान, मासूम भाई, भारत बोबडे, गजानन मानतकर, गोपाल भटकर, अनंत वाघ, सचिन गालट, सचिन चांभारे, सहदेव नानोटे, जगदेव लोखंडे, गजानन काकड, संतोष सोनटक्के, भास्कर काळे, गजानन घुमसे, विवेक गावंडे, प्रकाश नंदापुरे, रमेश गोळे, महादेव साबे, सुरेश जाधव, सुनील ढाकोलकर, अनिल राऊत, राजू गलबले, डॉ. चव्हाण, अजय टापरे, सागर कावरे, नाना पाटील, अन्सारउल्ला खान, गुड्डूभाई, सै. फारुख, आलमगीर खान, भूषण गायकवाड, किरण ठाकरे, अशोक लोणाग्रे असे अनेक जण उपस्थित होते. या वेळी अनेकांनी मतव्यक्त केले. (ता.प्र.)

शेताकरी, शेतमजुरांच्या हिताच्या मागण्यांचा समावेश...

यावेळी तालुका दुष्काळग्रस्त घोषित यावा, शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळावी, शेतमजूर वर्गाला हाताला काम नसल्याने प्रति व्यक्ती दहा हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. रोजगार हमी योजनेची कामे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. शेतकरी वर्गाला सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे खते विनामूल्य देण्यात यावे. जनावरां करिता चारा छावणी उभारणी तसेच चारा विनामूल्य देण्यात यावा. पीएम किसानचे पैसे ज्या शेतकऱ्यांना सिंचन याकरिता दिवसा आठ तास वीज पुरवठा देण्यात यावा. पीएम किसान योजनेचे अनेक शेतकऱ्यांचे थांबलेले पैस

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,