पोळ्याला वाळलेल्या सोयाबीनसह शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन.....

पोळ्याला वाळलेल्या सोयाबीनसह शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी तालुक्याला दुष्काळ घोषित करण्याकरिता, पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन पीक, वाजंत्री व, बैलासह' तहसील कार्यालयासमोर सरकार विरुद्ध निषेध आंदोलन केले.
बार्शिटाकळी तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करण्यासाठी शेतातील वाळलेले सोयाबीन पीक हातात धरून गुरुवार दिनांक १० सप्टेंबरला पोळ्याच्या दिवशी बैलांना सोबत घेऊन सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी बार्शिटाकळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले
आहे. 
यावेळी महादेव गावंडे, वैभव गावंडे, विजय देशमुख, जनार्दन ठोकळ, रामेश्वर नानोटे, साहेबराव आंधळे, विनोद माळकर, अजय नानोटे, आनंद सुरडकर, सुधीर माळकर, रवींद्र खंडारे, गजानन गीते, गोपाल मानकर, सुभाष गावंडे, संतोष जाधव, विनायक पवार, सेवा पवार, किरण ठाकरे, सहदेव चव्हाण, रोहित पवार, संतोष, रोहनकार , महेंद्र इंगोले, प्रल्हाद माळकर गणेश ताठे, अशोक लोणाग्रे, रवी बिडवे, बाबाराव इंगोले, दादाराव जाधव, शिवप्रताप मेघाडे, विजय येलकर, निलेश जाधव, विनोद जाधव, उद्धव चौधरी, दीपक धूळ, भारत बोबडे, उल्हास भगत, शुभम राजुरकर उपस्थित होते. (ता.प्र.)

बार्शिटाकळी तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर......
तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले आहे. बार्शिटाकळी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये गुरुवार दिनांक १० सप्टेंबरला सभा आयोजित केली होती. यावेळी बार्शिटाकळीचे तहसीलदार राजेंद्र कापशीकर, गटविकास अधिकारी क्षितिज मोगरेकर, निवडणूक नायब तहसीलदार अक्षय नागे उपस्थित होते. यावेळी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव, तसेच नागरिकांचा व स्त्रियांचा मागास प्रवर्गासाठी कु. आर्या अनिल चहाकर वय १० वर्ष या मुलीच्या हस्ते ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून खांबोरा, चिंचोली (रुद्रायणी), जमकेश्वर, पिंपळखुटा, पिंपळगाव (हांडे), महागाव, साखरविरा, भेंडी सूत्रक, परंडा, घोटा व नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) पाराभवानी, कोथळी खु, सिंदखेड, धाबा, भेंडगाव, जलालाबाद, निंबी खु, राजनखेड, पिंजर, पुनोती बु, मांगुळ, सर्वसाधारण उमरदरी, कासारखेड, खेरडा खु, खेरडा बु, खोपडी, गोरव्हा, चोहोगाव, झोडगा, तीवसा बु, दगडपारवा, दोनद बु, धाकली, धानोरा, पिंपळगाव (चांभारे ), भेंडी महाला, राहीत, वाघा, (वस्तापूर),  विझोरा, जनुना काजळेश्वर आणि सर्वसाधारण (स्त्री) रुस्तमाबाद उजळेश्वर, जामवसु, निंभारा, साहीत, दोनद खु, जांभरुण, कोथळी बु, हातोला, सुकळी, राजंदा, मोऱ्हळ, निंबि  बु, सोनगिरी, मोझरी खु, सारकिन्ही, टेंभी,टिटवा ,वडगाव, असे आरक्षण जाहीर केले. यावेळी विशाल काटोले, कैलास  ढोरे, अविनाश खोरणे, शेखर बोर्डे, अनिल चहाकार उपस्थित होते. (ता.प्र.)

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,