शेतकरी-शेतमजूर मोर्चाला शंभू सेनेचा जाहीर पाठिंबा....

शेतकरी-शेतमजूर मोर्चाला शंभू सेनेचा जाहीर पाठिंबा..
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सहकार नेते श्री सुनील भाऊ धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी-शेतमजूर मोर्चाला शंभू सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
शंभू सेना संस्थापक अध्यक्ष अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनाखाली, शंभू सेना तालुका अध्यक्ष सचिन आगाशे यांनी मोर्चाला संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला.
बार्शीटाकळी तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकरी वर्गाला आर्थिक अनुदान देण्यात यावे, सरसकट कर्जमाफी व पीक विमा देण्यात यावा, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, रब्बी हंगामातील बियाणे विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, जनावरांसाठी चारा व चारा छावण्यांची व्यवस्था करावी तसेच सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी शंभू सेना शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांसोबत ठामपणे उभी राहणार असल्याचे सचिन आगाशे यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,