बार्शिटाकळी येथे शेतकरी संघर्ष समितीचा विराट मोर्चा 👉तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा , हजारो शेतकऱ्यांची एक मुखी मागणी....

बार्शिटाकळी येथे शेतकरी संघर्ष समितीचा विराट मोर्चा 
👉तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा , हजारो शेतकऱ्यांची एक मुखी मागणी 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी शेतकरी शेतमजूर यांचा भव्य मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती पासून तहसील कार्यालयापर्यंत जात तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
 आज रोजी संपन्न झालेल्या शेतकरी शेतमजूर यांच्या मोर्चाचे नेतृत्व सहकार नेते सुनील भाऊ धाबेकर यांचे नेतृत्वात तालुक्यातील विविध गावातील हजारो शेतकरी व शेतमजूर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी टाकळी ते मोर्चाद्वारे तहसील कार्यालयाला जाऊन तहसीलदार राजेंद्र कापशीकर यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मोर्चेकरांचे पुढील मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.    
१)यामध्ये शासनाने बार्शिटाकळी तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा, २) शेतकरी वर्गाला एकरी पन्नास हजार अनुदान देण्यात यावे, ३)शेतमजुरांना प्रतिव्यक्ती दहा हजार रुपये आर्थिक मदत देत रोजगार हमी योजनेची कामे गावागावात तत्काळ सुरुवात करण्यात यावी ,४) शेतकरी वर्गाला सरसकट कर्जमाफी देण्यात यावी , ५)शेतकरी वर्गाला सरसकट पिक विमा देण्यात यावा, रब्बी हंगामात शेतकरी वर्गाला बी बियाणे तसेच खते विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, ६)जनावरांना चारा छावनी उभारण्यात याव्यात तसेच चारा विनामूल्य देण्यात यावा, ७)चिंचण्याकरिता सलग आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा  व अन्य इतर मागण्यांचे निवेदन देत बार्शीटाकळी तालुका त्वरित दुष्काळग्रस्त घोषित करावा , अशी मागणी मोर्चेकरांनी केली. 
    सदर मोर्चास  शंभू सेना , किसान बिग्रेड, भीमशक्ती संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला. यांनी शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी दोन दोन हात करण्याची तयारी दर्शविली.
 या मोर्चाचे नेतृत्व अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे संचालक गोपाल काकड यांचे सह पंजाबराव महल्ले , देवराव हागे, गजाननराव आखरे, गजाननराव घुमसे , रमेश बेटकर , अक्षय राऊत , सचिन गालट, सचिन चांभारे यांचे सह तालुक्यातील शेतकरी राजू पाटील महल्ले , नवरतन कावरे, योगेश लाहोलकर , प्रकाश नंदापुरे , प्रभाकर खांबलकर , भारत बोबडे , महफूस खान , महादेवराव साबे , डॉ गणेश बोबडे , गजानन म्हैसणे , बाळासाहेब ठाकरे , शंभू सेनेचे अश्विन नवले , सचिन आगाशे , दीपक कळसाईत , भूषण गायकवाड , मासूम खान, किरण ठाकरे , अशोक लोणाग्रे, राजू पाटील खांबलकर , बंडा पाटील लूले , शुभम राजूरकर , अक्षय राऊत , सुनील ढाकोलकर , नाना पाटील साल्पीकर, बाळू ढोरे , तनवीर ठेकेदार, सय्यद आशिक अली, शेख अजहर , बंडू महले, गोपाल भटकर, गजानन मानतकर , अशोक इंगळे , रुद्राक्ष राठोड , अविनाश पंधरे , भास्कर काळे , रमेश गोळे , सहदेवराव नंदापुरे , भीमराव चव्हाण , गजानन आमदने, भारत बोबडे , डॉक्टर तनवीर जमाल, झाकीर हुसेन , गजानन ठोकळ, संतोष राऊत , महेंद्र गाढवे , गणेश ठोकळ, बबन भांडे , भंटाची डोंगरे , महादेव लुले , रवींद्र मानतकर , ओमकार मोरे, प्रकाश राठोड , संतोष म्हैसने, जगन्नाथ देवकुणबी , मनोज देशमुख , गोपालराव कटाळे, अनिल राठोड , श्रीधर सरप , मोहन भाकर , अन्नपूर्णा इंगळे , सुरेश जाधव , देविदास नानोटे , विनायक भाकरे , गजानन जानोरकार , साहेबराव आडोले, योगेश येवले , उल्हास पवार , किसन चोंडकर, शेख रशीद , बाबाराव अरखराव, गोरसिंग राठोड , दशरथ पारस्कर , दिलीप मोरे , प्रमोद वालके , शुभम घुगे  , विशाल इंगळे , रमेश गद्रे, संतोष उंडाळ , नारायण क्षी रसागर , गोपाल मांगुळकर , बंडू पाटील शिंदे , दत्तात्रय डीवरे , उमेश चव्हाण , बबन कवडे , प्रमोद ढोरे , त्र्यंबक बागडे , संतोष माळकर, वासुदेव पवार , बन्सीलाल घुगे , मारुती भालतीलक, त्र्यंबक काळे , हिरा पाटील , भास्कर सरोदे , मधुकर शिंदे , विनोद सोनवणे , वामन ब्राह्मणकर , बापूराव भोसले , नारायण करवते , रुपराव ठाकरे , महादेवराव काकड , रामकृष्ण खांडे , राजकुमार आंबेकर , नितीन आठवले , साहेबराव शेलकर , सुभाष शेळके , बाबाराव येवले , प्रशांत आंधळे , प्रल्हाद हिरोळे ,  सुंदराबाई डाखोरे , श्रीकृष्ण झ्याते, अनिल राठोड , शिवप्रताप मेघाडे , शिवाजी केदार , प्रदीप खांडे , गजानन घोंगे , अनंता वाघ , रामदास नवलकर , सुधाकर टापरे , वसंतराव आडे , संजय बहादरे , महादेव सोनवणे , ऋषिकेश कावरे, दादाराव गोपणारायण , दत्ता वैराळे , गोलू टापरे , देवानंद शिंदे , विलास चव्हाण , नंदकिशोर राऊत , अनिल लोखंडे , संजय लोखंडे , वासुदेवराव कुचर, महादेव मानकर , नरेंद्र मते , जाकीर हुसेन , तनवीर अहमद , शेख इनामदार , अन्सार उल्ला खान , गफार खान मास्तर, जाकीर इनामदार,  शंकर बाठे , संदीप सरप , मनोहर देशमुख , शुभम गांजरे , राजु कोहर , कुणाल लुले , सय्यद फारुक, विनोद बेटकर , गोपाल काळे , बाळकृष्ण उताने पाटील यांचे सह हजारो शेतकरी - शेतमजूर बांधव उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,