'गणपती बाप्पा मोरया' पुढल्या वर्षी लवकर या, गणेशोत्सव जल्लोषात !👉डीजेवरील बंदीचा मान राखत पारंपारिक वाद्यांच्या निनादात विसर्जन; 👉हिंदु -मुस्लीम ऐक्याची परंपरा कायम...



'गणपती बाप्पा मोरया' पुढल्या वर्षी लवकर या, गणेशोत्सव जल्लोषात !
👉डीजेवरील बंदीचा मान राखत पारंपारिक वाद्यांच्या निनादात विसर्जन; 
👉हिंदु -मुस्लीम ऐक्याची परंपरा कायम 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी: बार्शिटाकळी व तालुक्यातील विविध गावातील गणरायांचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले.
25 सप्टेंबरला पिंजर व 26 सप्टेंबरला बार्शिटाकळी शहर विविध गावातील गणेश मंडळाने, आकर्षक देखावे, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप महाराज, या वीर महापुरुषाच्या प्रतिमा, उंच उंच भगवे ध्वज, वारकरी संप्रदायाची, व ढोलाची भजने, ढोल ताशे, डफडे, सनई चौघडा अशा विविध वासांच्या जय-जयकारात गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या अशा प्रकारचा जग धोष करत गणरायांची विविध भक्ती गीते आरत्या म्हणत गणरायांना मंगलमय व भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. बार्शीटाकळी शहराला 27 सप्टेंबरला अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अकोलाचे रेडी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक मनोज यांनी मिरवणुकीला भेट देऊन मुख्य रस्त्याची पाहणी केली होती.काही दिवसांपासून बार्शिटाकळी व पिंजर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणेशोत्सव मंडळ व शांतता समितीच्या सभेत डीजे वाद्यांचा वापर करू नये. याबाबत उपविभागीय 
पोलीस अधिकारी वैशाली मुळे, बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे परीविक्षाधिन अधिकारी आनंद कांदे, पिंजर पोलीस स्टेशनचे गजानन राठोड व त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड समावेशक
यांनी डीजे वाद्य वाजविण्यासंदर्भात जनजागृती केली होती, बार्शिटाकळी व पिंजर पोलिसांनी गणेशोत्सव काळात चौखबंदोबस्त ठेवला होता. गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पडला. 


तालुक्यातील गणपती मंडळ 136 गावात 171 गणपती मंडळे तर 54 गावात एक


गणपती बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील 72 गावात 88 गणपतीची तर बिहाडमाथा, सराव, रेडवा, वाघजाळी, सुकळी, गोरवा, अजनी खुर्द, चांगेफळ, येळवण, उकळी खुर्द, महागाव, पाटखेड, टिटवन, उजळेश्वर, आळंदा, धाबा, जांभरुण, निंबी, सायखेड़ पिंपळखुटा, रुस्तमाबाद तसेच पिंजर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील 64 गावात 83 गणपतीची व टिटवा, जमकेश्वर, उमरदरी, सावरखेड, मोरळ, कासमार, कवठा, डाबकी, वाल्पी, चिचखेड, फेटरा, खोपडी, वाधा, निंभारा, पांगरी, घोटा, लखमापूर, मोझरी, भेंडी, अशा गावात एका गणपतीची स्थापना झाली होती.


Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,