बार्शिटाकळीत नगर पंचायतीचा बुलडोझर पुन्हा धडकला; 👉पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पहिल्या दिवशी जुने कोर्ट ते खडकपुरा दरम्यान अतिक्रमण निर्मूलन..

बार्शिटाकळीत नगर पंचायतीचा बुलडोझर पुन्हा धडकला;
👉पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पहिल्या दिवशी जुने कोर्ट ते खडकपुरा दरम्यान अतिक्रमण निर्मूलन..
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुलभ रहदारीसाठी नगर पंचायत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम आजपासून प्रत्यक्ष सुरू झाली आहे. या मोहीमेच्या पहिल्या दिवशी जुने न्यायालय ते खडकपुरा चौक दरम्यान घड़क कारवाई करण्यात आली. किरकोळ वाद‌विवाद वगळता पहिल्या दिवसाची ही कारवाई अत्यंत शांततेत आणि यशस्वीपणे पार पडली.
यापूर्वी १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान ही मोहीम राबवली जाणार होती. मात्र गणणेशोत्सव आणि प्रशासकीय तांत्रिक कारणांमुळे ती तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान पुन्हा मोहीम राबवण्याचे नियोजन केले होते. त्याव्रमाणे आज पहिल्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून जुने कोर्ट ते खडकपुरा दरम्यानच्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणांवर नगर पंचायतचा बुलडोझर फिरवण्यात आला.

कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडक आणि चोख बंदोबस्त तैनात केला होता. या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर आलेल्या आरसीपी (दंगल नियंत्रण पथक) जवानांनी मौलांचे सहकार्य केले.

या संपूर्ण मोहीमेदरम्यान नगर पंचायत बार्शिटाकळीचे मुख्याधिकारी राहूल कंकाळ हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी स्वतः उपस्थित होते. अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्यात आलेली असल्याने बहुतांश नागरिकांनी सहकार्य केले. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि सार्वावजनिक वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी उर्वरित टप्यातही ही मोहीम अशीच तीर्वतेने राबवली जाणार आहे.

पुढील कारवाईचे नियोजन

30 सप्टेंबर

खडकपुरा चौक ते खोलेश्वर मंदिर मार्ग व तेलीपुरा ते आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार


महत्वाचे मुद्दे...

मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोहीम

पहिल्या दिवशी जुने कोर्ट ते खडकपुरा दरम्यान कारवाई

किरकोळ वादविवाद वगळता कारवाई शांततेत व यशस्वी

पोलिसांचा कडक आणि चोख बंदोबस्त

आरसीपी जवानांचे सहकार्य

मुख्याधिकारी राहुल कंकाळ घटनास्थळी उपस्थित

उर्वरित टप्प्यांतही कारवाई सुरु राहणार

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,