बार्शिटाकळीत महाराजस्व समाधान शिबिर.... 👉३०० हून अधिक लाभार्थांना थेट शासकीय योजनांचा लाभ
बार्शिटाकळीत महाराजस्व समाधान शिबिर....
👉३०० हून अधिक लाभार्थांना थेट शासकीय योजनांचा लाभ
बार्शिटाकळी (प्रतिनिधी) श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- 'सेवा संकल्प अभियाना' अंतर्गत खोलेश्वर संस्थान, बार्शिटाकळी येथे 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात पार पडले. या शिबिरात तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येत एकाच छताखाली नागरिकांना विविध शासकीय दाखले व योजनांचा थेट लाभ दिला. शिबिरात ६० नागरिकांना सातबारा उतारे, २५ शेतकऱ्यांना फार्मर आयडी, ४३ महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे, २३ उत्पन्न दाखले, १७जात प्रमाणपत्रे, १९ एनसीएमसी कार्ड आणि १७ आयुष्मान भारत कार्डाचेवाटप करण्यात आले. तसेच आरोग्य, पुरवठा, सेतू, भूमी अभिलेख व कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर लाभदेण्यात आले. या शिबिरास उपविभागीय अधिकारी मिलिंद जगदाळे, तहसीलदार रवींद्र कापशीकर, नायब तहसीलदार अतुल सोनवणे, अक्षय नागे, तालुका कृषी अधिकारी संध्या करवा आणि मुख्याधिकारी राहुल कंकाळ उपस्थित होते. एकाच ठिकाणी सर्व कामे झाल्याने नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
भगत महाराज यात्रा महोत्सव
बार्शिटाकळी : बार्शीटाकळी तालुक्यातील
चोहोगाव जुने, कोथळी खुर्द येथील श्री क्षेत्र भगत महाराज संस्थानचा ७० वा यात्रा महोत्सव २३ पासून सुरू होत आहे. बैलांवरील द्वारका स्पर्धा हे मुख्य आकर्षण राहील. गुरुवारी आई माय देवस्थान, चोहोगाव येथून पालखीचे प्रस्थान होईल. शुक्रवारी सकाळी वासुदेव महाराज गवळी, प्रकाश महाराज गावंडे आणि रामदास महाराज शिंदे यांच्या हस्ते महापूजा होईल. सुरज संजय कोहर, नितीन ढोंबळे, नारायण लोखंडे, बाळासाहेब कोहर व सुनील इंगळे यांच्यातर्फे स्पर्धेसाठी बक्षिसे देण्यात येतील. अशोक कोहर सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देतील. शनिवारी वासुदेव महाराज गवळी यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण होईल. अमोल तायडे व सुरेश इंगळे यांच्यातर्फे पाच क्विंटल ५० किलो बुंदी व शिरा वाटप करण्यात येईल. लाभघेण्याचे आवाहन संस्थानाने केले आहे.
Comments
Post a Comment