सामाजिक दिवाळीनिमित्त कापशी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न...... 👉गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान व आदर्श महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम : नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार.....

सामाजिक दिवाळीनिमित्त कापशी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न......
👉गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान व आदर्श महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम : नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : सामाजिक बांधिलकी जपत गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला व आदर्श महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक दिवाळी उपक्रमांतर्गत ग्राम कापशी तलाव येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच श्रीमती उमाळे व श्री. विठ्ठल चतरकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदर्श ज्ञानदान बहुउद्देशीय मंडळ, अकोलाचे अध्यक्ष प्रा. विवेक डवरे, आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रक्षा डवरे, गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. रोहन बुंदेले, प्रतिष्ठानच्या सदस्य सायली गोतमारे, अनिशा कोल्हे तसेच डॉ. तन्वी डवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. दर्शन जनईकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे श्री. उदय पाथरकर, संगीता घाटोळ , बाळकृष्ण उताणे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी गावातील एकूण ७० नागरिकांची विविध आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर नागरिकांना आवश्यकतेनुसार योग्य औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
     ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत विविध ग्रामीण भागांत २१ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, ५,००० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सामाजिक दिवाळीच्या माध्यमातून केवळ सण साजरा न करता समाजातील गरजू व वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य करमसिंग राजपूत (नांदुरा), शेतकरी जागरण मंचचे श्री. प्रशांत गावंडे, डॉ. नूतन वर्षा देशमुख, श्रीमती शुभदा राठोड व प्रा. सुशीला मळसणे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी लिंक वर्कर स्कीमचे महेंद्र वानखडे, सागर पद्मने आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…. 👉हत्येच कारणही आलं समोर?