टिटवा-सावरखेड धरणात शेतकऱ्यांनी उतरून वेधले प्रशासनाचे लक्ष....👉दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन !👉नायब तहसीलदार अतुल सोनवणे यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता....

टिटवा-सावरखेड धरणात शेतकऱ्यांनी उतरून वेधले प्रशासनाचे लक्ष....
👉दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन !
👉नायब तहसीलदार अतुल सोनवणे यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यां कडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्या साठी दिवाळी सारख्या महत्वपूर्ण सणाच्या दिवशीही शेतकन्यांत आंदोलनाचे हत्यार उपसाचे धरणात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून आपल्या मागण्यां साठी जोरदार आवाज उठविला. सकाळ ९ वाजता च्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन दुपारी अंदाजे ३ वाजेपर्यंत सुरू होते.
शेतकऱ्यांच्या एल्गार समिती व सर्व शेतकरी, बार्शिटाकळी तालुका यांच्या वतीने आयोजित या आंदोलनात शेतकऱ्यांनी धरणाच्या पाण्यात उतरून शासनाचे लक्ष वेधले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ विम्याची रकम जमा करावी, शेतमजूर व इतर कामगारांना प्रति कुटुंब २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अंत्योदय रेशन कार्ड पारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो
धान्य द्यावे, दुष्काळी परिस्थितीत शेतकन्यांचे घरगुती चीज बिल माफ करावे, महिला बचत गट व मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे, बोअरवेल व विहिरीच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्या पासून ५०० मीटरच्या बाहेर असलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी पद्धतीची परवानगी शिथिल करावी, तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चान्याची तातडीने व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. सकाळ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत आंदोलन सुरु राहिल्याने प्रशारस्साचे लक्ष या आंदोलनाकडे वेपले गेले. अखेर तुमच्या मांगण्यां आम्ही सरकार पर्यंत पहोंचवु अशे आश्वासन नायब तहसीलदार अतुल सोनवणे यांनी शेतकऱ्यांना दिल्या नंतर आंदोलन कर्त्यानी आंदोलन मागे घेतले. घटना स्थळी महसुल विभाग व पिंजर पोलीस ठाण्याचे  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिवाळीच्या आनंदोत्सवाच्या दिवशीही आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलन करावे लागल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्षात कितपत पूर्तता होते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

👉बचाव पथकाची तत्परता !👇👇👇👇👇

आंदोलनादरम्यान हातात मागण्यांचे फलक घेऊन मागे सरकणारा एक शेतकरी अचानक खोल पाण्यात बुडू लागला. प्रसंगावधान राखत जीवनरक्षक दीपक सदाफळे यांनी पाण्यात उतरून त्याला पकडले. त्यानंतर रेस्क्यू बोटीतील जलतरणपटूने लाइफ रिंगच्या साहाय्याने शेतकऱ्याला पकडून सुरक्षित काठावर आणले. बचाव पथकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

👉शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या👇👇👇👇
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, थकीत पीकविमा तातडीने खात्यात जमा करणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांना कर्जमाफीचा लाभ, घरगुती वीजबिल माफी, शेतमजूर व कामगार कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य, बचत गट व मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करणे, विहीर व बोअरवेल खोदकामासाठीची ५०० मीटरची अट शिथिल करणे, पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे.


Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…. 👉हत्येच कारणही आलं समोर?