प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यावलखेडच्या पवन तायडेचे उज्ज्वल यश; 'GREF' परीक्षेत एस सी मधून देशात २४ वा क्रमांक......!👉'वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पवनचा व आईचा केला सत्कार'....

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यावलखेडच्या पवन तायडेचे उज्ज्वल यश; 'GREF' परीक्षेत एस सी मधून देशात २४ वा क्रमांक......!
👉'​वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पवनचा व आईचा केला सत्कार'....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
​बार्शिटाकळी : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत यावलखेड (ता. अकोला) येथील पवन नारायणराव तायडे या तरुणाने केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या 'जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स' (GREF) च्या परीक्षेत संपूर्ण देशातून एस सी कॅटेगिरीतून २४ वा क्रमांक (मेरिट) पटकावून आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
​पवनचे वडील अकोला शहरात बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करतात, तर आई शेतात मोलमजुरी करते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही पवनने स्वतः शहरातील ट्युशन क्लास वर काम करत आपले औद्योगिक अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केले आणि जिद्दीच्या जोरावर हे मोठे यश संपादन केले.
​पवनच्या या यशाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि अकोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी पवनच्या यावलखेड येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पवन तायडे आणि त्याच्या आईचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार व अभिनंदन करण्यात आले. घरामध्ये फुले, शाहू आंबेडकरी चळवळीचे विचार लहान असताना पासून ऐकायला मिळाल्यामुळे मनामध्ये जिद्द निर्माण होऊन यश संपादन करू शकलो असे पवन यांनी  बोलताना सांगितले
​या प्रसंगी वं ब आ बाबुळगाव सर्कलचे माजी अध्यक्ष प्रशांत शिरसाट, यावलखेड चे पोलीस पाटील हरिदास प्रधान, अक्षय खांडेकर, मिलिंद दामोधर, राहुल दामोधर, संजय कीर्तन, पंकज शिरसाट, बादल खांडेकर, प्रेम जामनिक, कार्तिक दामोधर, भावेश दामोधर, करण चक्रनारायण, विलास दामोधर, योगेश तायडे, मयूर दामोधर, गजानन सोळंके यांच्यासह गावातील मंडळी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…. 👉हत्येच कारणही आलं समोर?