नवसाच्या नावाखाली महिलेवर अत्याचार.,.....आरोपींना अटक.,....
नवसाच्या नावाखाली महिलेवर अत्याचार.,..... आरोपींना अटक.,.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २२ वर्षीय विवाहित महिलेला मूलबाळ होत नसल्याने फूस पळवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका २२ वर्षीय विवाहित महिलेने फिर्यादीत दिलेल्या बयानात इंस्टाग्रामवर दोन महिन्यापूर्वी ज्योती नागेश हिवराळे (२३) रा. बोथा काजी तालुका खामगाव यांच्याशी ओळख झाली. सदर फिर्यादी महिलेस मूलबाळहोत नसल्याने आसरा संस्थान दोनद येथे नवसाच्या नावाखाली फूस लावून चार चाकी वाहनातून सुरेश महादेव पाचपोर (२३) रा. दाथुलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा व नागेश हिवराळे (२३) रा. बोधाकाजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी नेले. सदर फिर्यादी महिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर आरोपी त्यांनी सदर महिलेला पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका लॉजवर घेऊन गेले तेथून नागेश हिवराळे व ज्योती नागेश हिवराळे तेथून निघून ...