Posts

Showing posts from December, 2025

राज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळावा आयोजन............

राज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळावा आयोजन........... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  माळी समाजसेवा बहुउद्देशीय मंडळ खडकी अकोला अंतर्गत दिनांक २८ डिसेंबर २०२५ रविवारी पुंडलिक नगर खडकी अकोला येथे संस्थापक अध्यक्ष डॉ. वामनराव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली युवक युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे सर्वप्रथम उद्घाटन प्रसंगी परिणय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात येईल पुस्तिकेमध्ये युवक 843 युवती 538 एकूण 1381 युवक युवतींची नोंदणी झालेली आहे या सर्व युवक युवतींना व्यासपीठा वरून स्वतःचा परिचय करण्याची संधी प्राप्त करून त्यांना योग्य जोडीदाराची निवड करता यावी याकरिता गेल्या 26 वर्षापासून हा उपक्रम राबविल्या जात आहे नुकत्याच नगरपरिषद नगरपंचायत मध्ये निवडून आलेले नगराध्यक्ष नगरसेवक यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केल्या जाईल करिता माळी समाजामधून निवडून आलेल्या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला २८ डिसेंबर २०२५ रोजी ठीक सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे ही विनंती या मेळाव्याच्या माध्यमातून बऱ्याचश्या युवक. युवतीचे दरवर्षी संबंध जुळून येत आहे आणि क...

एकवर्षा पुर्वीचे बार्शिटाकळी ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीस, भोपाळ येथून अकोला गुन्हे शाखेच्या टिम कडून अटक. आरोपिस २८ पर्यंत पोलीस कोठडी....

Image
एकवर्षा पुर्वीचे बार्शिटाकळी ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीस, भोपाळ येथून अकोला गुन्हे शाखेच्या टिम कडून अटक. आरोपिस २८ पर्यंत पोलीस कोठडी..! बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी :- येथे बंद पडलेल्या किसान जिनिंग येथे काही इसम अमली पदार्थ (ड्रग्स) तयार करीत असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे पथकाने त्या ठिकाणी रेड करून पाच आरोपी कडून मॅफेड्रॉन ड्रग्स अमली पदार्थ ५५४८ किलो ग्रॅम तसेच त्याकरिता लागणारे केमिकल आणि साहित्य जप्त किंमती २,३८,०००/ रुपये चे जप्त करून पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे रिपोर्ट वरून एकूण ५ आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता. तेव्हा पकडलेले आरोपी यांना अजून पर्यंत मा. न्यायालया कडून जामीन न मिळाल्याने तें आजदेखील कारागृहात मध्ये आहे हे विशेष सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक सर अकोला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून सुरू आहे. सदर गुन्हयाच्या तपासात यातील अटक आरोपी जतिन जगमोहन दोषी रा. भांडुप मुंबई याच्यासोबत संगणमत करून फरार आरोपी...

अब्दुल करीम सरांच्या प्रेरणादायी उपक्रम नगराध्यक्षा आणि सर्व १७ नगरसेवकांचा हार आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.....

Image
अब्दुल करीम सरांच्या प्रेरणादायी उपक्रम नगराध्यक्षा आणि सर्व १७ नगरसेवकांचा हार आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  येथील एक प्रतिष्ठित नागरिक अब्दुल करीम उर्फ ​​बब्बू मास्टर यांनी त्यांच्या निवासस्थानी  २०२५ मध्ये नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्षा आणि सर्व १७ नगरसेवकांचे हार आणि शाल देऊन भव्य स्वागत केले. करीम मास्टर यांच्या या सौहार्दपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमादरम्यान त्यांनी सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचे अभिनंदन केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याचा संदेश दिला. यावेळी उपस्थित असलेले शेख नइमुद्दीन  म्हणाले की, अशा कार्यक्रमांमुळे लोकशाहीची प्रतिष्ठा वाढते आणि लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील परस्पर विश्वास बळकट होतो. करीम मास्टर यांच्या या उपक्रमाला शहरातील सुसंवाद, एकता आणि सकारात्मक राजकारणाचे उदाहरण मानले जात आहे.                   शेख नईमोद्दीन 

सहकार नेते सुनील पाटील धाबेकर यांचा 62 वा जन्मदिवस साजरा....

Image
सहकार नेते सुनील पाटील धाबेकर यांचा 62 वा जन्मदिवस साजरा.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  तालुक्यामधील सहकार नेते सुनील पाटील धाबेकर यांचा 62 वा जन्मदिवस तालुक्यातील सहकार क्षेत्र मधील मान्यवरांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा केला.            तालुक्यामधील तालुका खरेदी विक्री संघ , कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व अन्य सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे तालुक्यामधील गणमान्य समाजसेवक यांनी दिनांक आज दिनांक 19 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाऊसाहेब लहाने सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दामोदर जी काकड , खवीस चे अध्यक्ष योगेश कोंडनकर, बाजार समितीचे अध्यक्ष रमेश बेटकर , पंजाबराव महल्ले , साहेबरावजी लबडे , गजाननराव आखरे , सुरेश पाटील खांबलकर आदी मान्यवरांचे उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रकाश उपाध्ये , भास्कर काळे , सुरेश शेंडे , मेहफूस खान , अन्सार उल्ला खा...

बार्शिटाकळी नगर परिषद मतमोजणी साठी पोलीस विभाग सज्ज...... 👉शहरातून काढला रूट मार्च

Image
बार्शिटाकळी नगर परिषद मतमोजणी साठी पोलीस विभाग सज्ज...... 👉शहरातून काढला रूट मार्च.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी : २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर पंचायत मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. यावेळी बार्शिटाकळी पोलिसांनी पोलीस ठाण्यापासून रूट मार्च सुरू झाला आणि आठवडी बाजार, रमेश नगर, ढोरे वेटाळ, अशोक नगर, माळीपुरा, काळा मारोती, जामा मज्जीद चौक, शिवाजी चौक, बाजार लाईन, नगरपचायत चौक, तेलीपुरा, अकोली वेस आणि जुने बस स्टँडसह शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पथसंचलन केले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस वाहने, आणि पायी पथकांनी संपूर्ण शहरात सुरक्षेचा संदेश दिला.  विभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली या रूट मार्चचे नेतृत्व बार्शिटाकळी पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ आणि पीएसआय चाटे यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस विभागातील वरिष्ठ आणि कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रूट मार्चम...

बार्शिटाकळी शेतकरी एल्गार समितीचे बार्शिटाकळी सहाय्यक निबंधक यांना निवेदन....... 👉नाफेडवर सोयाबीन, कपाशी खरेदी करताना शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे घ्यावे, किंवा फिंगर प्रिंट घेण्यात यावी....

Image
बार्शिटाकळी शेतकरी एल्गार समितीचे बार्शिटाकळी सहाय्यक निबंधक यांना निवेदन...... 👉नाफेडवर सोयाबीन, कपाशी खरेदी करताना शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे घ्यावे, किंवा फिंगर प्रिंट घेण्यात यावी.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- नाफेडवर सोयाबीन व कपाशी खरेदी करताना त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हाताच्या बोटाचे उसे घ्यावे, किंवा फिंगर प्रिंट घेण्यात यावी, आणि दुष्काळी मधून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे निवेदन बार्शिटाकळी तालुका एल्गार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, सहाय्यक निबंधक, इत्यादी ना १५ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील एल्गार समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते, बार्शिटाकळी तालुका एल्गार समितीने दिलेल्यादिलेल्या निवेदनातून म्हटले की, नाफेडवर शेतकऱ्यांनी सोयाबीन किंवा कपाशी दिल्यास, त्या संबंधित शेतकऱ्यांच्या हाताचे बोटाचे ठसे घ्यावे, किंवा त्यांच्या हाताची फिंगरप्रिंट काढावी, तसेच दुष्काळी मध्ये वंचित असलेल्या बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा त्वरित आर्थिक लाभ मिळावा, यासाठी...

आरोग्य संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन....

Image
 आरोग्य संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना र. नं. 38 81 यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगीता जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी बरदबे, जिल्हा कोषाध्यक्ष मंगला तितुर, जिल्हा सचिव नीलिमा बोंद्रे, जिल्हा सहसचिव रूपाली तुपवणे, जिल्हा सहकार्य अध्यक्ष अनिता घुले, जिल्हा सहसचिव विभा पाथरकर, जिल्हा सदस्य मंगल हाडोळे, जिल्हा सदस्य अनिता इंगळे, उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन विभाताई पाथरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन रूपालीताई तुपवने यांनी मांनले.

गोर सीकवाडी तर्फे तालुकास्तरीय 'नायकीर सोगण' हजारो बांधवांनी घेतली नायकीची शपथ....

Image
गोर सीकवाडीतर्फे तालुकास्तरीय 'नायकीर सोगण' हजारो बांधवांनी घेतली नायकीची शपथ... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  गोर सीकवाडी गोर सेनेतर्फे तालुकास्तरीय रेडवा तांड्यांमध्ये 'नायकीर सोगण' कार्यक्रम आयोजित हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नायक यांनी आज ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा दिवस गोर बंजारा समाजासाठी स्वाभिमानाचा दिवस. हेच लक्षात घेऊन रेडवा येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिवन जाधव. स ज पा .सर्कल अध्यक्ष यांनी सूत्रसंचालन केले व प्रस्तावना साजन राठोड साहित्य दळ तालुका अध्यक्ष यांनी केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोहर राठोड गोर सेना विदर्भ अध्यक्ष, अतिश राठोड समनक जनता पार्टी तालुका अध्यक्ष, सेवक राठोड गोर सेना कट्टर सोबती यांनी मार्गदर्शन केलं.      सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यातील नायक नायकण, कारभारी कारभारीन, गोर गावंळीयां,आई बहीनी आप आपल्या टिम सह गोर बंजारा संस्कृती, वहीवाट, अन् वसंतराव नायक यांचे गित गायनातून नृत्य सादर कार्यक्रमाची सोभा वाढवली.    मह...

बार्शिटाकळी नगरपंचायतसाठी ७३.०७ टक्के मतदान...

Image
बार्शिटाकळी नगरपंचायतसाठी ७३.०७ टक्के मतदान..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी २८ मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मतदानाच्या सुरुवातीला सकाळी ११:३० वाजेपर्यंत २६.५३ टक्के, दुपारी १:३० वाजेपर्यंत ४१.८३ टक्के, ३:३० वाजेपर्यंत ५८.०३ टक्के मतदान झाले. नगरपंचायतकरिता झालेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी अंतिम मतदान ७३.०७ टक्के झाले. यामध्ये ७९७८ पुरुष व ७३२७ महिला अशा एकूण १५३०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  अपर पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा मतदान प्रक्रियेदरम्यान अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी शहरातील काही मतदान केंद्रांवर जाऊन निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. डमी मतपत्रिका फलकावर न लावल्याने तक्रार येथील नगरपंचायत निवडणुकीतील मतदान केंद्र क्रमांक १० च्या बाहेर दर्शनी भागात फलकावर प्रोसिडिंग अधिकाऱ्याने डमी मतपत्रिका न लावल्याने मतदारांची तारांब...