अवैध सावकारी प्रकरणी सावरखेड येथील दोघाविरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल
अवैध सावकारी प्रकरणी सावरखेड येथील दोघाविरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल बार्शिटाकळी, (तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे ) : अवैध सावकारी प्रकरणी बार्शिटाकळी तालुक्यातील सावरखेड येथील अवैध सावकार रमेश साहेबराव देशमुख यांचे सह दोघा विरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी पिंजर पोलिसात तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार रमेश आणि आनंदा या दोघाविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे, या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते, गोरगरिबांचे रक्त पिनाऱ्या रमेश साहेबराव देशमुख आणि आनंदा मोहादे याची विरुद्ध कारवाई झाल्यामुळे बार्शिटाकळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून जल्लोष केला आहे. प्राप्त माहितीनुसार, कल्पना बबन हिवराळे राहणार सावरखेड यांनी अवैध सावकारी प्रकरणी सहायक निबंधक यांच्याकडे रमेश आणि आनंदा विरुद्ध तक्रार दाखल केली होती, रमेश देशमुख हा सावरखेड तालुका बार्शिटाकळी येथील रहिवासी असून त्याने आजपर्यंत अनेक गोरगरिबांचे रक्ताचे शोषण केले आहे, अवधू सावकारी इथून अनेकांच्या जमिनी पचविल्या आहेत, तर त्याचा दुसरा साथीदार आनंदा...