शेख अजहर शेख जमीर यांची काँग्रेसच्या बार्शिटाकळी शहर ब्लॉक कार्याध्यक्षपदी निवड...
शेख अजहर शेख जमीर यांची काँग्रेसच्या बार्शिटाकळी शहर ब्लॉक कार्याध्यक्षपदी निवड... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती चे सदस्य शेख अजहर शेख जमीर यांची नुकतेच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती पत्र देऊन बार्शिटाकळी शहर ब्लॉक कार्यअध्यक्षपदी निवड केली. या वेळी त्यांच्या सोबत माजी नगर पंचायत सदस्य सय्यद जहांगीर, सय्यद असद समाजसेवक, काँग्रेसचे प्रवक्ते मोहम्मद शोएब आदी उपस्थित होते. शेख अजहर हे काँग्रेस चे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांच्या या निवडी मुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच फायदा होईल असे लोकांचे म्हणणे आहे. सदर निवडी चे श्रेय ते प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देत आहे. पातूर नंदापूर येथे कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : पातूर नंदापूर परिसरामध्ये २५ जूनच्या रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २४ तासांच्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. २४ जूनला पातूर नंदापूर परिसरामधील ९५ टक्के पेरणी संपु...