बार्शिटाकळी पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक यांची धाडसी कारवाई....... दोन गोवंशाची कत्तल करताना मुद्देमाल व आरोपी ताब्यात......
शहरातील कसाबपु-यात गोपनीय माहितीच्या आधारे सकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी कत्तल झालेल्या गोवंशाचे मास , दोन गायी सह शेख साजिद शेख अन्नु (45 ) रा. बार्शिटाकळी कसाबपुरा या आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याविरुद्ध कलम 5 ,5 अ ,5 ब, व 9ब अंतर्गत व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 नुसार कलम 11, 1960 अधिनियमानुसार भारतीय दंड विरुद्धच्या 429 कलमानुसार याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. पहाटे पहाटे झालेल्या या धाडसी कारवाईबाबत गावात सर्वत्र चर्चा आहे या कारवाईला यशस्वी करण्यासाठी ठाणेदार संजय सोंळखे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारक यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यात नागसेन चक्रनारायण , पदमा भले, राजेश जौधारकर तर होमगार्ड नागेश ठाकरे , दिनेश सांगळे , व सागर काळे यांनी भाग घेतला होता गेल्या कित्येक दिवसापासून बाशिटाकळी शहरासह तालुक्यात गोवंशाची चोरी व त्यांची कत्तल करून अकोला शहरासह आजूबाजूच्या परिसरात विक्री केल्या जात असल्याचे समजले गोवंशाची चोरी होत असल्याने पंचक्रोशीतील शेतकरी व पशुपालन त्रस्त झालेत पोल...