Posts

अभिनेता सोनू सुद कडून सर्वेश साबेचा गौरव अमेरिकेत शिकणाऱ्या सर्वेशचा गरजूंना मदतीचा हात...

Image
अभिनेता सोनू सुद कडून सर्वेश साबेचा गौरव अमेरिकेत शिकणाऱ्या सर्वेशचा गरजूंना मदतीचा हात बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : कृषी उत्पन्न बाजार समिति बार्शिटाकळीचे संचालक महादेवराव साबे, शालिग्राम साबे यांचा नातू सर्वेश देवेन्द्र साबे (१५) हा इयत्ता ९ वी अमेरिकेमध्ये शिकत असुन त्याला सामाजिक व परोपकारी कार्याची आवड आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी 'युएस किड फॉर वॉटर ॲण्ड सेवा' या संस्थेच्या माध्यमातून भारतातील गरिव गरजू लोकांना विविध प्रकारची माइत व साहाय्य करुन प्रोत्साहन देण्यात येते. सर्वेश उपक्रम राबवितो. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अभिनेता सोनू सुद यांनी कौतूक केले. वाचनालयामध्ये पुस्तके लावणे, मुलांना वाचना करीता प्रोत्साहित करने, लहान मुलांसाठी फुड कॅम्प चालविणे, शनिवार व रविवार दोन दिवस भारतीय मुलांचे इंग्लिश क्लासेस घेणे आदी उपक्रमाद्वारे सर्वेश व त्याचे सहकारी निःस्वार्थ सेवा देतात. सामाजिक कार्यात उत्तुंग कार्य करणारे बॉलीवुड अभिनेता सोनु सूट यांनी अमेरिका दौऱ्या प्रसंगी सर्वेशला कौतुकाची थाप देऊन तोंडभरून कार्याची प्रशंसा केल...

हिंदू स्मशानभूमी वाहन स्थळ येथे वृक्षारोपण संपन्न... भाजपा पदाधिकारी यांचा पुढाकार

Image
हिंदू स्मशानभूमी वाहन स्थळ येथे वृक्षारोपण संपन्न... भाजपा पदाधिकारी यांचा पुढाकार  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  हिंदू स्मशानभूमी वाहन स्थळ येथे वृक्षारोपण आमदार हरिष भाऊ पिंपळे यांचें सहकार्यातून तसेच एस नाथन यांचे मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी येथील हिंदू स्मशान भुमी स्थळ येथे शहर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचे माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. जवळ पास 624 झाडे त्या ठिकाणी लावण्यात आली वृक्ष रक्षा बंधन दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रम घेण्यात आला झाडाला राखी बांधुन हा दिवस साजरा करण्यात आला. आमदार हरिष पिंपळे म्हणाले की मोकळ्या जागी एक झाड लावावं त्याला जपाव लहानाचं मोठं करावं फळांची अपेक्षा न करता कारण तेच झाड काही न बोलता काही न मागता अंगणभर सावली देणारं हे माञ नक्की देशभरात वृक्ष चळवळ निर्माण व्हावी कुटुंबातील एक सदस्य समजुन वृक्ष प्रति आत्मीयता राहावी बार्शीटाकळी शहरात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपणास राबवायचा आहे असे ते म्हणाले झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला एस नाथन यांचे मार्...

बार्शिटाकळीत शिवसेना (उबाठा )च्या वतीने भव्य नेत्ररोग निदान व उपचार शिबिर संपन्न ... 👉 २५६ रूग्णांनी केली तपासणी, ८७ रूग्णांवर होणार शस्त्रक्रिया.....

Image
बार्शिटाकळीत शिवसेना (उबाठा )च्या वतीने भव्य नेत्ररोग निदान व उपचार शिबिर संपन्न ... 👉  २५६ रूग्णांनी केली तपासणी, ८७ रूग्णांवर होणार शस्त्रक्रिया..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व भगवा सप्ताहाचे औचित्य साधून खासदार अरविंदजी सावंत यांच्या आदेशाने अकोला संपर्कप्रमुख प्रकाशजी शिरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन बाप्पू देशमुख, व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ भाऊ दातकर यांच्या हस्ते 20 ऑगस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ इंडिया, दमाणी हॉस्पिटल व गोपाल भटकर (मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ व जिल्हा परिषद सदस्य, अकोला) यांच्या वतीने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात तालुक्यातील 265 रुग्णांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 87 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दमाणी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ...

👉अकोला जिल्ह्यात कॉग्रेसला मोठा हादरा... 👉कॉग्रेसचे माजी जिल्हा महासचिव तथा विद्यमान जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश...

Image
👉 अकोला जिल्ह्यात कॉग्रेसला मोठा हादरा... 👉कॉग्रेसचे माजी जिल्हा महासचिव तथा विद्यमान जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश. प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला -  वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉग्रेसचे माजी जिल्हा महासचिव तथा विद्यमान जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी आपल्या समर्थकांसह यशवंत भवन अकोला येथे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींच्या पाठीशी या महाराष्ट्रत एकमेव नेता उभा राहिला. ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर. आज ओबीसींच्या आरक्षणाला टिकवण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. आम्ही ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला असल्याचे यावेळी चंद्रशेखर चिंचोळकर यांनी सांगितले. चंद्रशेखर चिंचोळकर यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात कॉग्रेसला मोठा हाद...

मुस्लिम समाजाचे ठाणेदारांना निवेदन....

Image
मुस्लिम समाजाचे ठाणेदारांना निवेदन.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करणेबाबत मुस्लिम समाजाच्या युवकांकडून बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षकांना रविवारी निवेदन देण्यात आले. रामगिरी गुरु नारायण मिरी महाराज, सरला बेट यांनी पंचाळे, ता सिनर या विकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मतीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन केले आहे याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सैय्यद मुजमिल व सैय्यद असद अली यांच्यासह मोठ्या संख्येने युवकाची उपस्थिती होती 👉 भूमि अभिलेख कार्यालय बार्शिटाकळी येथे होतात खोट्या नोंदी! 👉बेकायदेशीर फेरफार, नोंदीची कायदेशीर चौकशी करा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : भूमी अभिलेख कार्यालयात ...

👉राष्ट्रवादी काँग्रेसची यंदा रक्षाबंधन दिनी महिलांना विशेष भेट ! भाऊ येतोय, भेटीला. ■ महिलांना रक्षाबंधन निमित्त सुरक्षा कवच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती. 👉राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे व प्रदेश संघटक सचिव सम्राट डोंगरदिवे यांची बार्शिटाकळी येथे विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषद मध्ये माहिती

Image
👉राष्ट्रवादी काँग्रेसची यंदा रक्षाबंधन दिनी महिलांना विशेष भेट ! भाऊ येतोय, भेटीला ■ महिलांना रक्षाबंधन निमित्त सुरक्षा कवच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती 👉राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे व प्रदेश संघटक सचिव सम्राट डोंगरदिवे यांची बार्शिटाकळी येथे विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषद मध्ये माहिती बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटा चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून महिला भगिनींना दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा (लाल शाळा) शिवाजीनगर मुर्तिजापूर येथे भाऊ येतोय, भेटीला या विशेष उपक्रमा निमित्य आयोजित महिलांना रक्षाबंधन दिनी सुरक्षा कवच चे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गट चे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे यांनी बार्शी टाकळी येथील रेस्ट हाऊस वर आयोजित पत्रकार प...

अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली अकोला जिल्ह्यातील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट.....

Image
अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली अकोला जिल्ह्यातील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला : जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील सैन्यात महार रेजिमेंट मध्ये असलेले सैनिक प्रवीण जंजाळ यांना जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये वीरगती प्राप्त झाली होती  आज वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी शहीद प्रवीण जंजाळ यांच्या मोरगाव भाकरे येथील घरी त्यांच्या परिवाराची सांत्वन्पर भेट घेऊन प्रवीण जंजाळ यांच्या आई वडील व भावांना धीर दिला यावेळी शहीद प्रवीण जंजाळ यांचे आई वडील तसेच मोठे भाऊ व गावातील नागरिक उपस्थित होते अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पंचायत समिती उपसभापती अजय शेगावकर ,माजी समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट, गावच्या सरपंच ताई तालुका अध्यक्ष किशोर जामनिक, गजानन गवई , शरद इंगोले, मेजर सरदार, मेजर आतिश शिरसाट , सना भाई , जंजाळ गुरुजी , दीप जंजाळ , शंकरराव राजुस्कर , संजय किर्तक , प्रदीप पळसप...