Posts

निहिदा येथे विवाहित महिलेचा विनयभंग : पिंजर पोलिसात गुन्हा दाखल

Image
निहिदा येथे विवाहित महिलेचा विनयभंग : पिंजर पोलिसात गुन्हा दाखल  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे निहीदा येथील एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ऋषिकेश दादाराव हागे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे,  प्राप्त माहितीनुसार, निहिदा येथील एका महिलेचा पती देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याने सदर महिला आपल्या दोन मुलासह घरात झोपली असताना ऋषिकेश दादाराव हागे हा २३ फेब्रुवारी रोजीच्या रात्री १ वाजता सदर महिलेच्या घरात घुसला, आणि सदर महिलेचा त्याने विनयभंग केला, अशी तक्रार पिंजर पोलिसात प्राप्त झाली आहे, तेवढ्यात महिलेचे सासरे.... हे जागी झाले असता, त्या दोघांमध्ये झटापट झाली, आणि ते खाली पडले, त्यामुळे त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे, यावरून पोलिसांनी आरोपी ऋषिकेश दादाराव हागे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे, अशी माहिती पिंजर पोलिसांनी दिली आहे, सदर घटनेचा तपास ठाणेदार गंगाधर दराडे यांचे मार्गदर्शन...

गाडगेबाबांची दशसूत्री संदेश हाच खरा धर्म, हिच खरी ईश्वर भक्ती..! समाजसेवक गजानन हरणे

Image
गाडगेबाबांची दशसूत्री संदेश हाच खरा धर्म, हिच खरी ईश्वर भक्ती..! समाजसेवक गजानन हरणे प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला : दिवसा झाडूच्या माध्यमातून गाव स्वच्छ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन स्वच्छ करण्याचे काम गाडगे महाराजांनी आयुष्यभर केले असून त्यांनी दिलेली दशसूत्री हीच खरी जीवनाचां सार असून त्यांनी दिलेला संदेश भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या, गरीब मुलांना शिक्षणात मदत करा, प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या,बेघर असलेल्यांना आसरा द्या,अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा, बेरोजगारांना रोजगार द्या, पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या,गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा, दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या,हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते समाजसेवक गजानन हरणे यांनी गाडगेबाबा नगर जुने शहर अकोला येथे गाडगेबाबा जयंतीला मार्गदर्शन करताना केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेश सोळंके तर प्रमुख वक्ता म्हणून समाजसेवक गजानन हरणे हे होते तर प्रमुख उपस्थि...

माणसाला घडविण्यासाठी स्वतः जागृत होणे गरजेचे_ पूज्य भन्ते बी. संघपाल महाथेरो........................ 👉दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराची सांगता............... 👉भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम.............

Image
माणसाला घडविण्यासाठी स्वतः जागृत होणे गरजेचे_ पूज्य भन्ते बी. संघपाल महाथेरो..... 👉दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराची सांगता....   👉भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम....   बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : माणसाला घडविण्यासाठी आधी स्वतः जागृत होणे गरजेचे आहे तेव्हा कुठे आपण दुसऱ्याला घडू शकतो आणि एक आदर्श समाज निर्माण करू शकतो असं वक्तव्य दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराच्या सांगता समारोहाला पूज्य भंते बी.संघपालजी महाथेरो यांनी आपल्या धम्म देसनामध्ये सांगीतले.  नुकताच सिंदखेड मोरेश्वर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबीर, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर, समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पुज्य भन्ते श्रध्दापालजी, भारतीय बौद्ध महासभेची जिल्हाध्यक्ष आद. पी. जे.वानखडे सर, सरचिटणीस नंदकुमारजी डोंगरे, कोषाध्यक्ष विजयजी जाधव, संस्कार विभाग प्रमुख डि. एस. ननिर सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्य...

तीन हजार रूपयेची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला ACB च्या जाळ्यात..

Image
तीन हजार रूपयेची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला ACB च्या जाळ्यात बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : अँटी करप्शन ब्युरो, अमरावती पथकाने आज मोठी कारवाई करीत पातूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई पवन सुनील भाकरे  (वय 36 वर्षे, पद पोलीस शिपाई  (वर्ग-3), पो.स्टे. पातुर जि. अकोला. रा. वसंत नगर मानोरा ता. मानोरा जि. वाशिम) यास तीन हजार रूपयेची लाच घेताना रंगेहाथ पकडले. थोडक्यात हकिगत अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या विरूध्द पातुर पोलीस ठाण्यात यापुर्वी देशी दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तक्रारदार यांनी सध्या दारू विकीचा धंदा बंद केला असुन, सध्या मोलमजुरी करीत आहे. मात्र आरोपीने तक्रारदार यांना मागील गुन्हयाच्या अभिलेखावरून तडीपारीची कारवाई न करण्याकरीता पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी 20 फेब्रुवारीला  ला.प्र.वि. अकोला येथे तक्रार दिली होती.या तक्रारीवरुन 20 फेब्रुवारी रोजी कारवाई दरम्यान आरोपी भाकरे यांनी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत पाच हजार रूपये मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच रक्कमेची...

बार्शिटाकळी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲ गडलिंग, उपाध्यक्ष पदी ॲड थोरात,तर सचिवपदी ॲड हरणे यांची निवड...

Image
बार्शिटाकळी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड गडलिंग, उपाध्यक्ष पदी ॲड थोरात,तर सचिवपदी ॲड हरणे यांची निवड... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : बार्शिटाकळी येथील वकिल संघाची २५-२६ ची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार ॲड.एस.एस..गडलिंग ॲड.व्हि.एम.किर्तक यांच्या मध्ये सरळ लढत होऊन ॲड .एस.एस.गडलिंग हे विजयी झाले.तसेच उपाध्यक्ष पदासाठी ॲड.एम.एस.थोरात व ॲड.मुशरिफ यांच्या मध्ये लढत होऊन ॲड.एम.एस.थोरात विजयी झाले.सचिव पदीं ॲड.पवन हरणे यांची बिनविरोध निवड झाली..सदर निवडणूकीत  बार्शिटाकळी मधील सर्व वकील सदस्यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले. निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष ॲड.व्ही.आर.राठोड यांनी कामकाज पाहिले असुन निवडून आलेल्या अध्यक्ष ॲड गडलिंग, उपाध्यक्ष ॲड थोरात, सचिव ॲड हरणे, यांच्या वर बार्शिटाकळी तालुक्यातुन अभिनंदन होत आहे 

आरोग्य उपसंचालक यांची ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट.....

Image
आरोग्य उपसंचालक यांची ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : उपसंचालक डॉ कमलेश भंडारी सर आरोग्य सेवा अकोला यांची दि. 17.2.2025 रोजी ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे आकस्मिक भेट दिली व त्यादरम्यान संपूर्ण रूग्णालयातील विभागाची पाहणी केली व त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना रुग्णालयातील कार्यालयीन कामकाजा विषयी विचारणा करुन योग्य त्या सुचना देऊन रुग्णालयातुन थेट तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला सुध्दा भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत डॉ स्वेता वानखडे अधिक्षिका ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रविंद्र आर्या, डॉ सखाराम झळके वैद्यकीय अधिकारी, श्रीमती सुनीता बळवे, प्रिती आठवले अधिपरीचारीका, उमा माने, सुनिता गाडेकर, संकेत ढोले, शितल रहाणे, श्री डांगे, श्री पारसकर, प्रभाकर तिडके, अमिताभ तायडे, विष्णू चव्हाण, नितीन साळवे, शरद ठाकुर आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक राम बायस्कर, ओळबे मॅडम, अमोल पाचडे, लोणकर, सजु निधाने,माडेकर, अर्शद, व रूपाली मॅडम तसेच ग्रामीण ...

गुलाम नबी आझाद महाविद्यालयात शिवजयंतीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न

Image
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात शिवजयंतीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : स्थानिक प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना, द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शिटाकळी जि अकोला, येथेे राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त प्रतीमेचे पुजन करून शिवजयंतीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बि एस खान यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितत जयंती साजरी करण्यात आली. शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे, अशा थोर महापुरुषांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनीमी काव्याची तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा  मुघल...