Posts

बार्शिटाकळी पोलीसांची १० डिजे वाहनांवर धड़क कार्यवाही 👉एकुण ३ लाख ७६ हज़ार ५०० चा दंड वसुल....

Image
बार्शिटाकळी पोलीसांची १० डिजे वाहनांवर धड़क कार्यवाही 👉एकुण ३ लाख ७६ हज़ार ५०० चा दंड वसुल... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : श्रावण सोमवार निमित्त कावड़ यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी डिजे सिस्टम वर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशित केले होते त्या अनुषंगाने बार्शिटाकळी येथे २८ जुलै रोजी श्रावण सोमवार निमित्त कावड़ पालखी मिरवणुक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकी मध्ये डिजे साऊंड सिस्टम चा वापर करण्यात आला होता. मिरवणुक संपल्या नंतर सदर डिजे साऊंड सिस्टम चे दहा वाहने पोलीस स्टेशनच्या परिसरात कार्यवाही करीता लावण्यात आले होते. तसेच उप प्रदेशिक परिवहन विभागाला पत्र देऊन मोडिफाय (मुळ वाहना मध्ये बदल) केलेल्या वाहना वर कायदेशीर कार्यवाही करण्यात सहयोग करण्याची विनंती केली होती. उप प्रदेशिक परिवहन विभागाच्या टीम ने वाहनांची प्रताळणी करुण वाहन क्र. एमएच ०४ एफ पी १८१६ ला ४१ हजार ५०० शे, एमएच १९ सीएक्स या वाहनाला ३२ हजार, वाहन क्र. एमएच ४ एफ ७८४७ ला ४० हजार, एमएच ०४ डीके ५१७७ ला ३७ हजार, वाहन क्र. ...

महसूल विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन

महसूल विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : शासन निर्णयानुसार महसूल विभागाकडुन देण्यात येणा-या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभदेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दीगंत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निदेर्शान्वये व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांचे मार्गदर्शनाखाली तहसिलदार राजेश वझीरे, बार्शिटाकळी व तहसिल कार्यालय, बार्शिटाकळी येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व तालुक्यातील इतर विविध विभाग यांच्या सहकायार्ने दि.०१ ते ०७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह - २०२५ साजरा करण्यात येणार असुन पुढील प्रमाणे तारीख निहाय तसेच विविध विभागांचे अधिकारी औपचारिक उद्घाटन होणार असून आहेत. १) ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येईल तसेच व...

धाबा ते लोहगड रस्त्याचे थांबलेले काम त्वरित सुरु न केल्यास समनक जनता पार्टीचा आदोलनाचा इशारा.... 👉शाळकरी विद्यार्थी त्रस्त प्रशासन मस्त!

Image
धाबा ते लोहगड रस्त्याचे थांबलेले काम त्वरित सुरु न केल्यास समनक जनता पार्टीचा आदोलनाचा इशारा....  👉शाळकरी विद्यार्थी त्रस्त प्रशासन मस्त! बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : तालुक्यातील धाबा ते लोहगड रोड मधील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून रस्त्यावरील खड्ड्यामुळे प्रवास अक्षरशः जीवघेणा झाला आहे, रखडलेले काम सात दिवसाच्या आत सुरू न केल्यास समनक जनता पार्टी बार्शिटाकळीचे तालुका अध्यक्ष अतिश राठोड यांनी आज बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन देतांना आव्हान केले. धाबा या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे दवाखान्यात जाण्यासाठी गरोदर महीला, शाळकरी विद्यार्थी यांना येण्यासाठी कष्ट भोगावे लागत आहे, रोड आहे की गड्डे आहे ते राहलेच नाही करीता प्रतिलिपी जिल्हाधिकारी अकोला, कार्यकारी अभियंता अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना निवेदन व्दारे कळवीण्यात येत की येत्या सात दिवसात धाबा महान रोडचे काम सुरू न झाल्यास प्रा संदेश चव्हाण समनक जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, प्रा डॉ अनिल राठोड समनक जनता पार्टी महासचिव, प्रदेश अध्यक्ष कालपाड साहेबां...

द ग्रेट मराठा मित्र मंडळाने कावड महोत्सवात बजावली उल्लेखनीय कामगिरी – नाबालिक सदस्यांनी दाखवली समाजसेवेची जाणीव

Image
द ग्रेट मराठा मित्र मंडळाने कावड महोत्सवात बजावली उल्लेखनीय कामगिरी – नाबालिक सदस्यांनी दाखवली समाजसेवेची जाणीव बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी , 28 जुलै : ‘द ग्रेट मराठा मित्र मंडळ’ या तरुण नाबालिक सदस्यांनी भर कावड महोत्सवात पोलिस प्रशासनासमवेत कर्तव्यदक्षतेने काम करत एक आदर्श उभा केला आहे. बार्शीतकली येथे आयोजित कावड यात्रेदरम्यान मंडळाने ट्रॅफिक नियंत्रण, सुरक्षेचे भान, आणि विविध सामाजिक कामे पार पाडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उत्सवात त्यांनी रस्त्यावर पडलेले मोठे दगड हटवून वाहन व पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला. विशेष उल्लेखनीय म्हणजे, या तरुणांनी एका मोबाईल चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे अनेकांची मालमत्ता सुरक्षित राहिली. संपूर्ण दिवसभर त्यांनी विविध कावड मंडळांना मदत केली – पाणीपुरवठा, मार्गदर्शन, आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करत त्यांनी समाजसेवेचा संदेश दिला. विशेष बाब म्हणजे ‘द ग्रेट मराठा मित्र मंडळा’तील सर्व सदस्य हे नाबालिक असूनही त्यांनी ६ तासांत जे कर्तृत्व दाखवले, ते निश्चितच प्र...

गोरसेनेच्या वतीने बार्शिटाकळी येथे गोरबंजारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार....

Image
गोरसेनेच्या वतीने बार्शिटाकळी येथे गोरबंजारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  तालुक्यातील 10 वी 12 वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सत्कार करण्यात आले गोरसेना जनता पार्टी उपस्थित होते गोरसिक वाडी अकोला यावेळी 12 वी 10 वी विद्यार्थी जिल्ह्याच्या वतीने मार्गदर्शन म्हणून वाशिम येथील मुख्य प्रवक्ते मा प्रा गोकुळ आडे सर गोरसिकवाडी अकोला जिल्हा अध्यक्ष गोरसेना कुलदीप चव्हाण विचारपीठावर भारत भाऊ चव्हाण ,  सुनील जाधव,  ठेकेदार भूषण राठोड,  बार्शिटाकळी कृष्णा चव्हाण,  अतिष राठोड समन्वयक जनता पार्टी उपस्थित होते यावेळी १०वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांना राज्यशासनाच्या नवं नियुक्ती झालेल्या कर्मचारीवर्ग यांचा सत्कार करण्यात आला तसेच गोर सेना जिल्हा अध्यक्ष कुलदीप चव्हाण यांनी पत्रकार भारत चव्हाण यांचा शुद्धा सत्कार करण्यात आला.  प्रा गोकुळ आडे सर यांनी सिधू संस्कृती ते तांडा वसलेले गोरबंजारा समाजाच्या इतिहास मांडून प्रत्येक विद्यार्थ्यांने आई वडिलांचे घामाला जागले पाहिजे त्यासाठी अभ्यासात लक्ष द्या...

भोलेनाथाचा कावड महोत्सव! पहिल्याच सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी.. कावड़ यात्रेत आकर्षक देखावे, ढोल ताशांचा समावेश.

Image
भोलेनाथाचा कावड महोत्सव! पहिल्याच सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी कावड़ यात्रेत आकर्षक देखावे, ढोल ताशांचा समावेश.. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तालुक्यातील विविध गावातील विष मंदिरात हजारो भाकांनी वर्मानासाठी गर्दी केली होती तसेच अनेक शिवभक्तांनी कावड़ यात्रा काढून महादेवला जलाभिषेक केला आहे यावेळी आकर्षक देखाचे व ढोल तासांच्या गजरात कावधारी मंदिरात येत होते. २८ जुलैला श्रावण महिन्यातीत पहिला सोमवार असल्याने तालुक्यातील बार्शिटाकळी, महान व दोनद, शिंदखेड , या गावातील मिरवणूक रस्त्यावरून विविध नद्यांच्या जतांची कावड घेऊन हजारो शिवभकांनी विविध प्रकारचे आकर्षक देखाने, स्युिदय सम्राट तथा थोर महापुरुर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमांचा समावेश असलेल्या कावडी घेऊन डोल ताशांचा गजर अन शिवशंकराचा जयजयकार करीत मिरवणूक काढण्यात आली. या तिन्ही गावाप्रमाणेच तालुक्यातील अनेक गावातील शिवालयावर विधिवत पूजन करून हर हर बोला महादेव भोले शंकरा रे भोले शंकरा, अशा प्रकारचा जयजयकार करत जलाभिषेक करून दर्शनाचा लाभघे...

संताजी सेना शंभू सेनेच्या वतीने शिवभक्तांना सत्कार.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

Image
संताजी सेना शंभू सेनेच्या वतीने शिवभक्तांना सत्कार..... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी : पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बार्शीटाकळी शहराचे आराध्य दैवत श्री खोलेश्वर महादेव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा अनेक कावड मंडळींनी जलाभिषेक केला त्यानिमित्त शहरातील स्थानिक संताजी नगर, तेलीपुरा येथे आलेल्या सर्व कावड मंडळांचे व शिवभक्तांचे शंभू सेना व संताजी सेना तालुका अध्यक्ष सचिन आगाशे यांच्या नेतृत्वात शाल श्रीफळ आणि पवित्र धर्मग्रंथ श्रीमद् भगवद्गीता देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती संताजी सेना संस्थापक अध्यक्ष प्रमोद देंडवे, भारत बोबडे यांच्या शुभहस्ते मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी स्वीकारणारे पोलिस कर्मचारी यांचासुद्दा यावेळी सत्कार करण्यात आला.  यावेळी शेषराव राजुरकर, रामेश्वर नानोटे पाटील, अनंत केदारे, प्रकाश माणिकराव, श्याम ठक, दिपक कळसाईत, अमोल केदारे, सचिन राजुरकर, दिनेश रत्नपारखी, अमोल जमानिक, मारोती भगत, गजानन गर्दे, नितेश वाघामारे, बबन ढेंगळे, गजानन भुजाडे, लक्ष्मण वाघमारे, शु...