Posts

Showing posts from March, 2024

नाभिक समाज व सलून व्यवसायिकांशी संवाद आढावा बैठक संपन्न.....

Image
नाभिक समाज व सलून व्यवसायिकांशी संवाद आढावा बैठक संपन्न..... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- येथे नाभिक समाज व सलून व्यवसायिकांशी संवाद आढावा बैठक रविवार ३१  मार्च रोजी घेण्यात आली आहे.      यावेळी संबंधित बार्शिटाकळी शहरातील नाभिक समाज बांधव व सलून व्यवसायिक यावेळी उपस्थित होते.तसेच यावेळी सलून व्यवसाय बाबत चर्चा करण्यात आली तसेच येणाऱ्या निवडणूकी मध्ये जो उमेदवार आपल्या पाठीशी राहिल  अशा पद्धतीने निवडायचा आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड . गोविंद दळवी सर ,तसेच हरिहर पळसकर,  प्रशांत भातखडे ,श्रावण भातखडे, उत्तम झगडे, विनायक पळसकार, नागोराव भातखडे, सुनील भातखडे, पांडुरंग भातखडे, अरविंद भातखडे, प्रविण पांडे, सुनील पळसकार, राजेंद्र दाईसकर, अंकुश पळसकार , अरविंद अंबुलकर, नंदु भातखडे, शुभम मानेकर, गणेश पळसकार, गजानन इंगळे, ओम भातखडे, विशाल भातकर, अशोक दाइसकर, अरूण भातखडे, सौरभ निबोकार, अक्षय बोपुलकर, वैभव निबोकार, वंश भातखडे, कृष्णा भातखडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिसांसमक्ष दोन गटात 'फ्री स्टाइल' !

Image
पोलिसांसमक्ष दोन गटात 'फ्री स्टाइल'! बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  बार्शिटाकळी पोलिसांच्या समोर दोन गटात एकमेकाला शिवीगाळ करून काठीने मारहाण करणे तसेच लोंबाझोंबी अर्थात फ्री स्टाइल केल्याची घटना बार्शीटाकळीत शुक्रवारी घडली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात पोलिसांचा वचक संपल्यामुळेच अशा घटना घडत असल्याची चर्चा होत होती. बार्शिटाकळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मार्चला सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास अनिल भगवान चव्हाण सराळा यांनी पोलिसांना माहिती दिली, की काही व्यक्ती बार्शिटाकळी येथील सार्वजनिक बायपास चौकात भांडत आहेत. यावरून बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पोलिसां समक्ष सार्वजनिक ठिकाणी एकमेकाला शिवीगाळ करणे, थापडा बुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण करणे तसेच फ्रीस्टाइल झाली. ठाणेदार शिरीष खंडारे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. तालुक्यातील सराळा गावातील एका गटातील व्यक्ती प्रकाश व सतीश भगवान चव्हाण यांचे घराचे बांधकाम चालू असल्याने त्यांनी सार्वजनिक वाचनाल...

वर्षा कुरटवाड यांना फ्लोरेन्स नाईंटीन गेल जिल्हास्तरीयी प्रथम पुरस्काने सन्मानित.... 👉 मुर्तीजापुर तालुक्याच्या आरोग्य विभागाला एक मानाचा तुरा

Image
वर्षा कुरटवाड यांना फ्लोरेन्स नाईंटीन गेल जिल्हास्तरीयी प्रथम पुरस्काने सन्मानित.... मुर्तीजापुर तालुक्याच्या आरोग्य विभागाला एक मानाचा तुरा     बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  : अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने अकोला जिल्हा परिषद मध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना पुरस्कार देण्यात येतो तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र अंतगंत येणाऱ्या उपकेंद्रामधील आरोग्य सेविका वर्षा कुरुट वाड यांना फ्लोरेन्स नाईंटीन गेल जिल्हा स्थरीय प्रथम पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम बि वैष्णव यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालय सभागृह देण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी    डॉक्टर बळीराम गाढवे उपस्थित। सन्मानपूर्वक देण्यात आला   मूर्तिजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जामठी अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र उमरी अरब या ठिकाणी कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका वर्षा कुरुटवाड ह्या सतत नऊ ते दहा वर्षापा...

रूपालीताई तूपवने यांना "फ्लोरेन्स नाईंटीन गेल " जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित. तेल्हारा तालुक्याच्या आरोग्य विभागाला एक मानाचा तुरा,

Image
रूपालीताई तूपवने यांना "फ्लोरेन्स नाईंटीन गेल" जिल्हास्तरीय  पुरस्काराने सन्मानित.   तेल्हारा तालुक्याच्या आरोग्य विभागाला एक  मानाचा   तुरा,  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  : अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने अकोला जिल्हा परिषद मध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये  कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना  पुरस्कार  देण्यात येतो तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र   अंतगंत येणाऱ्या उपकेंद्रामधील आरोग्य सेविका  रूपाली ताई तुपवने यांना      फ्लोरेन्स नाईंटीन गेल  जिल्हा स्थरीय   तृतीय  पुरस्कार    मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम बि वैष्णव यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालय सभागृह देण्यात आला.  यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी    डॉक्टर बळीराम गाढवे उपस्थित।  सन्मानपूर्वक देण्यात आला  तेल्हारा तालुक्यातील    प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड   अंतर्गत ...

भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हयाचे वतीने भव्य सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन..

Image
भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हयाचे वतीने भव्य सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन.. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला: दि. २९ दि. बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापण केलेल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर हे बौध्दाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभर कार्य करीत असून बौध्द बांधवाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करित आहेत. त्याचसाठी सन २०२३ पासून भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा कार्यकारणीच्या पुढाकारांने आणि सामाजीक संघटनांच्या सहकायर्याने अकोला शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन केले जात आहे.यावर्षी सुब्दा १४ एप्रिल २०२४ रोजी भव्य प्रमाणात भिमजयंती साजरी केली जाणार असून ग्रामीण भागातील आणि शहरातील वार्डा-वार्डामधून भिम अनुयायांनी आणि सामाजीक संघटनांनी आपआपले ट्रक्टर, लेझीम आखाड्यासह मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. राजरत्न आंबेडकर प्रणीत भारतीय बौध्द महासभेचमहासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण, कार्याध्यक्ष देवील...

अखेर राज्य कामगार विमा योजनेशी सुर्यचंद्र हॉस्पिटल (टाय अप) संलग्नित. 👉सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा लढा यशस्वी

Image
अखेर राज्य कामगार विमा योजनेशी सुर्यचंद्र हॉस्पिटल (टाय अप) संलग्नित (सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा लढा यशस्वी) बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   अकोला - अकोला शहरात राज्य कामगार विमा योजना दवाखाना सुरू असून येथे प्राथमिक स्वरूपाचे उपचार केले जातात मोठ्या आजाराकरीता नागपूर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल ला रेफर केले जाते, एखाद्या रूग्ण जास्त सिरियस असला तर नागपूर पोहचेपर्यंत त्या रूग्णाचा मृत्यु होऊ शकतो म्हणून अकोला येथे मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल राज्य कामगार निगम योजनेशी अटॅच समाविष्ट करावे व कामगारांना होणा-या त्रासासुन सुटका करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली होती.  त्यांच्या तक्रारीची दखल घेत विमेदार रूग्णांने आकस्मिक स्वरूपात खाजगी रूग्णालयात तातडीच्या प्रसंगी आंतररूग्ण वैद्यकीय उपचार घेतल्यास त्याची वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती सि.जी.एच.एस दराप्रमाणे करण्यात येते. तसेच खाजगी हॉस्पीटल टाय अप करण्याची प्रक्रीया ही वरीष्ठ कार्यालयाकडून होत असून सद्यस्थितीत अकोला, वाशिम, बुलढाणा येथील रा. का.वि.योजना सेवा दवाखाना, अकोला येथिल संलग्णीत ...

द ग्रेट मराठा मित्र मंडळांने आयोजित केला होता सार्वजनिक होळी महोत्सव

Image
द ग्रेट मराठा मित्र मंडळांने आयोजित केला होता सार्वजनिक होळी महोत्सव बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : स्थानिक द ग्रेट मराठा मित्र मंडळ या संघटने मार्फत दिनांक 25 -3 -2024 रोजी मराठी शाळेत समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रंग उत्सव कार्यक्रमाचे आयोजन द ग्रेट मराठा मित्र मंडळ कडून आयोजित करण्यात आला होता   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत बोबडे, उपाध्यक्ष महादेवराव धाईत ,सचिव रमेश वाटमारे ,पुष्पा रत्नपारखी ,मनीषा बोबडे , धनंजय कवळकर संकेत सपकाळ,शुभम मस्के, संजय जैन, राहुल बोडखे, वीरू ठाकूर, सचिन आगाशे, दीपक कळसाई ,दिनेश  कवळकर, छोटू आखाडे, सचिन वराडे, उमेश अंधारे, आदि प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच यावेळी गावातील महिला व तरुण व समस्त द ग्रेट मराठा मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते या ठिकाणी नैसर्गिक रंगाची धुलीवंदन करून व कुठल्याही प्रकारचे व्यसनमुक्त कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन द ग्रेट मराठा मित्र मंडळ यांच्यातर्फे यावेळी शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते तसेच बार्शिटाकळी शह...

गुलाम नबी आझाद महाविद्यालयात जागतिक जल दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन....

Image
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात जागतिक जल दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : स्थानीक बार्शिटाकळी येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाब नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शिटाकळी जि. अकोला, राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत व भूगर्भशास्त्र विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने जागतिक जल दिवस 2024 साजरा करण्यात आला. या निमित्ताने पाण्याचे महत्त्व, संवर्धन व पाणी वाचविण्यासाठी भविष्यात करावयाचे नियोजन संबधित विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलन व पुजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ अमीत वैराळे तर प्रमुख मार्गदर्शक डॉ संजय देशमुख हे लाभले होते. सोबतच प्रा पाटील, प्रा सुरडकर हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा व्हि एस उंडाळ यांनी केले व प्रमुख मार्गदर्शक डॉ संजय देशमुख यांची ओळख करून दिली. पर्यावरणामधे अनेक बदलामुळे दिवसेंदिवस उन्हाळ्यात तापमानात वाढ होतांना दिसून येते, याचाच परिणाम म्हणजे भूगर्भातील पाण्याची ...

शासनाने संच मान्यता संदर्भात काढलेला अद्यादेश त्वरीत रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा राज्यउपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांचा इशारा

Image
शासनाने संच मान्यता संदर्भात काढलेला अद्यादेश त्वरीत रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा  राज्यउपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांचा इशारा  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला दि. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच १५ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमीत केला यामुळे महाराष्ट्रातील माध्यमिक शाळा मुख्याद्यापक पद धोक्यात आले असुन हा अद्यादेश त्वरीत रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्यात येइल असे उद्‌गार अखिल महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याद्यापक संघाचे राज्य मुख्याद्यापक संघ उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी कळविले आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच अद्यादेश काढून ५ ते ८ वी.च्या माध्यमिक शाळा मधील विद्यार्थी संख्या १०० ऐवजी १३५ केल्यामुळे छोटया छोटया शाळांचे मुख्याद्यापकाचे पद धोक्यात आले असुन हा अद्यादेश त्वरीत रदृद करावा अशा आशयाचे निवेदन अखिल महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक संघाचे संस्थापक रावसाहेब आवारी यांच्या नेतृत्वाखाली राज्यअध्यक्ष केरभाउ ढोमसे यांच्या मार्गदर्शनात शासनाकडे अद्यादेश रद्द करणे बाबत मागणी करण्यात आली असुन हया संदर्भात लवकरच राज्य संघटने...

*ब्रेकिंग*...... 👉विहिरीत पडलेल्या युवकाला पिंजर येथील मानव सेवा आपत्कालीन पधकाने शोधुन बाहेर काढले.... 👉पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीमची धाडसी यशस्वी पराकाष्ठा

Image
*ब्रेकिंग*......  विहिरीत पडलेल्या युवकाला पिंजर येथील मानव सेवा आपत्कालीन पधकाने शोधुन बाहेर काढले पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीमची धाडसी यशस्वी पराकाष्ठा  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  ▶️ अकोला  : येथील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मलकापूर येवता रोडवरील नजिकच्या शेतातील विहिरीत एक युवक पडला असल्याची माहीती खदान पोलीस ठाण्यात पो.नि.धनंजय सायरे साहेब यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देऊन सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयूर सळेदार, ऋषिकेश राखोंडे,छोटु ठाकरे,संकेत देशमुख आणी शोधव बचाव साहित्य घेऊन आपात्कालीन वाहणासह एका तासात घटनास्थळावर पोहचले लगेच सिन ट्रेस केला असता 50 फुट खोल आणी 15 फुट पाणी असल्याचे निष्पन्न झाले लगेचच पाच राऊंड रॅम्प टाकुन सर्च ऑपरेशन चालु केले असता मोठ्या अथक प्रयत्नाने शेवटी आज 25 मार्च रोजी रात्री अंदाजे 8...

कारला येथे शंभर वर्षाची परंपरा राखत भवानीचा उत्सव उत्साहात संपन्न...

Image
कारला येथे शंभर वर्षाची परंपरा राखत भवानीचा उत्सव उत्साहात संपन्न बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पातूर तालुक्यातील कारला गावात शंभर वर्षाची परंपरा कायम ठेवून होळीच्या पर्वावर भवानीचा उत्सव यावर्षी संपन्न होत आहे आणि होळीच्या दिवशी ठीक सात वाजता राम-लक्ष्मण यांची मिरवणूक गावातून फिरवल्या जाते आणि त्यानुसार संपूर्ण गावातून त्याची पूजा वगैरे केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भवानी प्रत्येक घरासमोर जाऊन त्या ठिकाणी पूजा केल्या जाते आणि हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून कारला गावामध्ये होते.व्यसनमुक्त , शांततेत मोठ्या उत्साहाने गावातून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा केला जातो.सनई, डफडे वाजवून तल सुरत मिरवणूक काढली जाते .गावातील नागरिकसुद्धा याला प्रतिसाद देतात. अतिशय चांगल्या वातावरणात शांततेच्या वातावरणात कारलामध्ये हा उत्सव संपन्न झाला आहे....

गोरसेनेने अडविली भाजप उमेदवाराची वाट...

Image
गोरसेनेने अडविली भाजप उमेदवाराची वाट... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : बंजारा समाजासाठी निर्मित वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्यासह विविध मागण्यासाठी गौर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांचा ताफा अडवत समाजाचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या आर्थिक विकास महामंडळाला निधी देणे, जात वैधता प्रमाणपत्र व नॉन क्रीमिलेअर अट, खोटे जात प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवल्यामुळे बंजारा समाजातील युवकांवर अन्याय झाला. त्यासंदर्भात कार्यवाही करणे व इतर प्रश्नांकडे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गौरसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीपसिंह व इतर पदाधिकाऱ्यांनी केला. होळी उत्सवानिमित्त वेगवेगळ्या तांड्यांवर - भाजपच्या उमेदवारांनी रविवारी भेट - दिली. यावेळी गौरसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीपसिंह चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी बार्शिटाकळी तालुक्यात भाजपचे लोकसभेचे उमेदवार व त्यांचा ताफा अडवून त्यांच्यापुढे भाजपचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरीश पिंपळे यांच्या...

तिवसा तांडा येथे होलिकोत्सवाला सुरुवात...

Image
तिवसा तांडा येथे होलिकोत्सवाला सुरुवात बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी : तालुक्यातील तिवसा( तांडा ) येथे गोर बंजारा समाजातील सर्वांनी एकत्रित येवून होलिकोत्सवाला , होळी पूजनाने सुरुवात केली. यावेळी तांड्यातील बाल गोपालासह युवक व जेष्ठ मंडळीचा सहभाग होता. वाजतगाजत होळी पूजन करून होळी पेटवण्यात आली. उपस्थित सर्वांनी या नयनरम्य सोहळ्याचा आनंद घेतला. बंजारा होळी बद्दल !! आपल्या अनोख्या परंपरेमुळे वेगळी आणि रंजक वाटणाऱ्या बंजारा होळीची लोकप्रियता आधुनिक काळातही कायम आहे. कधी काळी तांड्या वस्तीवर गुजराण करणारा बंजारा समाज सध्या आधुनिक प्रवाहात आला आहे. मात्र, आधुनिकता आणि तंत्रज्ञानात सुधारणा झाली असली तरी या समाजातील उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. बंजारा समाजाच्या सर्व उत्सवांमध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा सण म्हणजे होळी. तीन दिवसांपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवशी अनोखी परंपरा पाळली जाते. मुळात सामान्य होळीच्या दुसऱ्या दिवशी बंजारा समाजात होळी पेटवली जाते आणि त्यानंतरच्या दिवशी रंगतो अनोख्या रंगपंचमीचा महोत्सव. हा महोत्सव पाहण्यासा...

5 वर्षांच्या लहान अनायजा फातेमा व हूरिया फातेमा यांनी पहिला रोजा ठेवला

Image
5 वर्षांच्या लहान अनायजा फातेमा व हूरिया फातेमा यांनी पहिला रोजा ठेवला बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  येथील स्थानिक रहिवासी डॉ गुफरान खान यांची मुलगी 5 वर्षीय अनायजा फातेमा गुफरान अहमद खान हिने तसेच हुरिया फातेमा सलमान अहमद खान वय वर्ष 7 या दोघींनी आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) केला. भूक आणि तहानची तीव्रता सहन करत त्यांनी सकाळच्या सेहरीपासून संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत पाच वेळा नमाज अदा केली. या दिवसांत, रमजानचा पवित्र महिना सुरू होतो आणि प्रत्येक मुस्लिम स्त्री-पुरुष महिनाभर उपवास (रोजा) ठेवतात आणि उपासनेत मग्न राहतात. या महिन्यात उपवास (रोजा) आणि अल्लाहची उपासना करण्याचा विचार मुलांच्या मनातही असतो. याअंतर्गत हुरीया फातेमा तसेच अनायजा फातेमा यांनी यंदाच्या रमजानच्या नववा महिनात आणि आयुष्यातील पहिला उपवास(रोजा) करण्याचा मान मिळवला आहे. 14 तासांहून अधिक काळ भूक आणि तहानची तीव्रता सहन करून त्यांनी उपवास करून अल्लाहची उपासना केली.तसेच इफ्तारपूर्वी त्यांनी शहरातील सुख-शांतीसाठी प्रार्थना केली.उपवास केल्याबद्दल त्यांच्या जवळच्या नातेवाईक आणि शेजा...

पाण्याचा अपव्यय...

Image
पाण्याचा अपव्यय  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : एकीकडे जागतिक जलदिनानिमित्त पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यात येत आहे तर दुसरीकडे हजारो लीटर शुद्ध पाण्याचा अपव्यय होत असल्याचे विरोधाभासी चित्र पहावयास मिळत आहे. २२ मार्चला अकोला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइनचा व्हॉल्व्ह लिकेज झाला होता. 

बार्शिटाकळी शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ मुख्याध्यापक शफीक अहमद खान यांची दुचाकी घरा समोरून अज्ञात चोरट्याने केली लंपास

बार्शिटाकळी शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ मुख्याध्यापक शफीक अहमद खान यांची दुचाकी घरा समोरून अज्ञात चोरट्याने केली लंपास    बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : शहरात सध्या अज्ञात चोरटे घरासमोर उभे असलेल्या दुचाकी वहाना वर आपले हाथ साफ करित आहे शहरातील मुख्य बाजार लाईन मधील महान केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शफिक अहमद खान मेहबूब खान यांच्या घरा समोर रात्रि त्यांचा मुलगा सज्जाद अहमद यानी आपली युनिकॉन MH 30 AM 1875 क्रमानकाची दुचाकी वाहन उभे केले होते रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी सदर बाईकवर आपले हात साफ केले याबाबत त्यांनी बार्शिटाकळी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दिली अस्ता बार्शिटाकळी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला चोरी झालेल्या मोटर सायकल ची किम्मत 40 हजार रुपये दाखविन्यात आली आहे, शहरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य असते सदर चोरटे अंधाराचा फायदा घेऊन आपले हाथ साफ करित आहे नुकताच इंद्रानगर येथील सुध्दा एका दुचाकी वाहनांवर चोरट्यांनी आपले हात साफ केले आहे हे विशेष