Posts

हातोला येथे एफएमसी कंपनी तर्फे सोयाबीन चे उगवनी पूर्व तणनाशकाची कार्यशाळा संपन्न

Image
*हातोला येथे एफएमसी कंपनी तर्फे सोयाबीन चे उगवनी पूर्व तणनाशकाची कार्यशाळा संपन्न* बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी. बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम हातोला येथे सोयाबीन चे उगवनी पूर्व तणनाशकाची कार्यशाळा हातोला येथे आयोजित करण्यात आली होती. याकार्यशाळेमध्ये किमान २०० पेक्षा जास्त शेतकरी बंधू उपस्थितीत होते. संध्याकाळच्या वेळेला ही कार्यशाळा घेण्यात आली. याकार्यशाळे मध्ये सोयाबीन मधील अथॉरिटी नेक्स्ट सोयाबीन उगवनी पूर्व तणनाशक पिकाचे तनासोबत होणारी स्पर्धा कशी थांबवते यावर संपूर्ण माहिती एफएमसी कंपनीचे अथॉरिटी नेक्स्ट उत्पादन व्यवस्थापक संघर्ष खाडे यांनी दिली, सोबतच विदर्भ प्रमुख हिरामण मंडळ हे अकोल्यातील जिल्हा प्रमुख शत्रुघ्न उपरवट सर, प्रगतिशील शेतकरी गजानन हातोलकर व अकोल्यातील सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेला आयोजित करण्यासाठी बर्शिटाकळी येथील प्रतिनिधी सुमित मोहोड यांनी खूप मेहनत घेतली. 

नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शिटाकळी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Image
नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शिटाकळी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न  बार्शिटाकळी दि. ०५ जून २०२२ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त व अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी डॉक्टर्स सेल च्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन के बी मेमोरियल क्लीनिक बार्शीटाकळी येथे करण्यात आले.           सदर कार्यक्रम श्री अशोक अमानकर साहेब अध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस कमेटी तसेच श्री सुनील भाऊ धाबेकर साहेब अकोला जिल्हा परिषद सदस्य व सहकार नेता, यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले.           अकोला येथील सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ. गजानन भगत यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली व एकूण 150 पेक्षा जास्त नेत्र रोग तपासणी व उपचार करण्यात आले.                         डॉ. तन्वीर जमाल सहाचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी अकोला यांनी शिबिराचे आयोजन केले, यावेळी शहरातले नगर अध्यक्ष महफ़ूज़ खान, डॉ मिलींद पवार, सैय्यद मीर साहेब,सैय्यद...

माननीय आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर व मा.आ. हरीषभाऊ पिंपळे यांच्या पाठपुराव्याला यश मुर्तिजापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला

Image
*माननीय आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर व मा.आ. हरीषभाऊ पिंपळे यांच्या पाठपुराव्याला यश मुर्तिजापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला* मतदारांच्या समस्या सतत निराकरणासाठी भाजपा लोकप्रतिनिधी कार्यतत्पर असतात त्याचा प्रत्यय आज पुन्हा आला. मुर्तीजापूर शहर तसेच खारपाण पट्ट्यातील ६४ खेड्यांना सतत भेडसावणाऱ्या पाणी टंचाई पासून कायमस्वरूपी मुक्त करून खांबोरा पाणी पुरवठा पाईप लाईन द्वारे सुरु करण्याच्या कामाची पाहणी माननीय आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला श्री रणधीर सावरकर व माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआपप्पा पिंपळे यांनी संयुक्त रित्या आज केली.   काटेपूर्णा धरणातून खांबोरा येथे नदी द्वारे पाणी होत त्यामुळे उन्हाळ्यात या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता तसेच पाण्याचा अपव्यय होत होता. *या साठी माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी तत्कालीन मुख्यमत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी करून पाणी टंचाई योजनेंतर्गत १९.९१ कोटी रुपये मंजूर करून आणले.*      मुर्तीजापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा तसेच खारपाण पट्ट्यातील ६४ गावांना अखंडित व नियमित काटेपुर्णा धरणातून पाण...

हक्काचे पाणी मिळण्यासाठी जमाते इस्लामी हिंद च्या वतीने नगर अध्यक्ष बार्शिटाकळी यांना निवेदन

Image
हक्काचे पाणी मिळण्यासाठी जमाते इस्लामी हिंद च्या वतीने नगर अध्यक्ष बार्शिटाकळी यांना निवेदन     बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी       प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार आहे की त्याला सुरक्षीत , निर्धोक , सुलभ व स्वच्छ पिण्याचे पाणी वैयक्तिक आणि घरगुती वापरासाठी मिळावे . गेल्या कित्येक वर्षापासून बार्शीटाकळीवासी आपले हक्काने पाणी मिळण्यापासून वंचीत आहेत . बार्शीटाकळी शहरातील पाणी पुरवठा योजनेकरीता शासनाने नगर पंचायतला २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . उन्हाळा आणि त्यातही आर्द्रता अशा परिस्थितीत पाणीटंचाई तसेच बऱ्याच ठिकाणी प्रदुषित पाणी असून बार्शीटाकळी शहरामध्ये सार्वजनिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे . महोदय , एकीकडे पाणी पुरवठा योजना मंजूर झाली मात्र तिचे कार्यान्वयन का होत नाही ? यामध्ये कमालीची दिरंगाई का ? हा सर्व शहरवासियांना प्रश्न पडला आहे . तरी आपण सर्वांनी मिळून ह्याबाबत लवकारात लवकर काय तो निर्णय घेऊन आम्हा बार्शीटाकळी शहरवासियांना आम्हाला आमचे हक्काचे स्वच्छ पाणी मिळवून द्यावे व आपली जबाबदारी पूर्ण करावी ही नम्र विनंती असे निवेदन ज...

अकोला पॅटर्नने दिला सेना - राष्ट्रवादी- प्रहार, भाजप आणि काँग्रेसला हादरा, हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी

Image
अकोला पॅटर्नने दिला सेना - राष्ट्रवादी- प्रहार, भाजप आणि काँग्रेसला हादरा, हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी. एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखाली हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी झाल्या आहेत.  ह्या साठी राबलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मागील निवडणूक मध्ये सेनेने ९८ मतांनी जिंकलेली ही जागा विक्रमी मतांनी खेचून आणली.विशेष म्हणजे अनुसूचित जाती साठी राखीव ह्या मतदार संघात शिवसेना राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता.भाजपने हिंदू कार्ड म्हणून मातंग समाजाच्या उमेदवार दिला होता.एकंदरीत भाजपा विजयी व्हावी असेच सेटिंग होती.पाच पक्ष विरुद्ध वंचित अशी लढत होती. वंचितला पराभूत करण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार ह्या पाच पक्षांनी छुपी युती करून सेना आणि नाही जमले तर भाजप कडे मते वळवून वंचितच्या उमेदवार पराभूत करायचा घाट घातला होता.मात्र ह्या वेळी बाळासाहेब अतिशय ...

बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयात भव्य महिला रोग निदान शिबीर संपन्न

Image
बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयात भव्य महिला रोग निदान शिबीर संपन्न प्रतिनिघी , बार्शिटाकळी , बार्शिटाकळी शहरात ग्रामीण रुग्णालयात दि , ४ , जून २ ०२ २ शनिवारी रोजी महिला यांचे विविध प्रकारा चे आरोग्य संबधी तपासणी व त्याचे निदान बद'ल महिला आरोग्य तपासणी शिबीर चे गार्मिण रुग्णालय अधीक्षक डॉ , महेश राठोड यांचा मार्गदर्शनात शिबीर चे आयोजन करण्यात आले होते , जिल्ह्यातील महिला ची आरोग्य सद्रुढ रहावे त्या प्राश्वभुमीवर अकोला जिल्हा चे पालक मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चु कंडू यांचा संकल्पनेतून बार्शिटाकळी स्थानिक ग्रार्मिण रुग्णालयात दि , ४ जून २ ०२२ शनिवारीं रोजी महिला रोग निदान भव्य  निदान शिबीर चे आयोजन करण्यात आले . त्या महिला आरोग्य निदान शिबीरात स्त्री तपासणी विभाग,मानसिक त्वचा विभाग, सर्जरी विभाग , अस्थि रोग तज्ञ विभाग , दत रोग विभाग , कान नाक घसा , मेडीसीन विभाग , नेत्र तपासणी , बालरोग तपासणी, रक्त तपासणी , एक्सरे विभाग , या तज्ञ डॉ. महिलांची  रोग निदान शिबीरांत तपासणि केली. त्या शिबीरात  महिंला ने संकाळ आठ वाजता पासून रांगा लावून रोग निदान तपासणी साठी   ग...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शिटाकळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Image
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शिटाकळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न बार्शीटाकळी प्रतिनिधी आज दिनांक पाच जून रविवारी बार्शी टाकळी येथील प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय गंगानगर बार्शिटाकळी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ते मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करून वृक्षारोपण करण्यात येते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल हे होते यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय बार्शीटाकळी ची प्रमुख अरुणा दिदि यांनी उपस्थितांना वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच आजच्या काळात वृक्षांची महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले वाढत्या तापमानात एकमेव वृक्ष हे आपल्यासाठी सोयीचे आहे ते तर इतर सर्वांनी कमीत कमी आपल्या आयुष्यात एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्था चे उप अध्येक्ष शाहिद एकबाल खान हे होते या वेळी त्यांनी ही वृक्षांची महत्व पर्यावरण बाबत मार्गदर...