Posts

बार्शिटाकळीत सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी... जिल्हा पोलीस अधीक्षक

Image
बार्शिटाकळीत सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी... जिल्हा पोलीस अधीक्षक  बार्शिटाकळी प्रतिनिधी...श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : बार्शीटाकळी येते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा कारणावरून नगरपंचायतने ठराव नामंजूर केल्यामुळे शहरात शांतता पुर्व  तनावाचे वातावरण होऊ नये , यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत २८ एप्रिल रोजी शनिवारी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत त त्यांनी सर्व समाजातील नागरिकांना आपल्या गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी व दोन्ही गटाच्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन त्यावर चर्चा करावी आणि योग्य निर्णय घ्यावा बार्शिटाकळी शहरात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत त्यासाठी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि शहराच्या हिताचा निर्णय घ्यावा असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शांतता समितीच्या प्रसंगी केले . यावेळी बार्शिटाकळी शहरातील सर्व हिंदू मुस्लिम समाजातील बांधव , लोकप्रतिनिधी , नगरपंचायतचे नगराध्यक्ष , महिला पदाधिकारी , पत्रकार मंडळ...

बावनकुळे यांच्या विरोधात `वंचित ' ची पोलिसांत तक्रार....

Image
बावनकुळे यांच्या विरोधात `वंचित ' ची पोलिसांत तक्रार.... बार्शीटाकळी येथे दिनांक 26 4 2023 च्या नगरपंचायतच्या मासिक सभेमध्ये बार्शीटाकळी येथील पंचायत समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा याकरिता ठराव घेण्यात आला या ठरावाला नऊ नगरसेवकांनी विरोध केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेतू पुरस्कर पणे विरोध करणाऱ्या सदस्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीन सदस्य होते हे विधान सर्व मीडियासमोर दिले त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा मलिन झाली तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बार्शीटाकळी पंचायत समिती आवारात बसवण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पंचायत समिती सदस्य व नेते दादाराव पवार यांनी 22 02 2022 ला ठराव मांडून तत्कालीन सभापती प्रकाश वाहूरवाघ यांनी मंजूर केला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलेले वंचित बहुजन आघाडीचे विरोध करणारे तीन नगरसेवक वंचित बहुजन आघाडीला काही वर्षा अगोदरच सोडून गेले त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे बार्शीटाकळी नगरपंचायत उपाध्यक्ष यांना अविश्वास आणून न...

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांची वंचित बहुजन आघाडी ने केली पाहणी......

Image
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांची वंचित बहुजन आघाडी ने केली पाहणी...... बार्शीटाकळी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. यामध्ये कांदा, काकडी,टरबूज,भूईमूग यासारख्या बऱ्याच पिकांचं नुकसान दिसून येत आहे. तालुक्यातील जांब या गावांमध्ये वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी  टीम गेली असता. गणेश कनीराम चव्हाण यांचे दोन एकर टरबूज, आणि माणिक कनीराम चव्हाण यांचे दोन एकर काकडी या पिकांचे प्रचंड नुकसान दिसून आले. यावेळी दोन्हीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चौकशी केली असता. त्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान दिसून आले. वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा  तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आद. प्रतिभाताई अवचार  यांनी तहसीलदारांशी चर्चा करून त्या भागातील पटवार्‍यांना चौकशीसाठी पाठवून देऊ व शासनाच्या वतीने जो काही मोबदला मिळेल  मोबदला मिळून देऊ अशी आश्वासन देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय प्रतिभाताई अ...

तालुका क्रिडा संकुल बार्शीटाकळी येथे माननीय आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक संपन्‍न......

Image
तालुका क्रिडा संकुल बार्शीटाकळी येथे माननीय आमदार हरिषभाऊ  पिंपळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक संपन्‍न...... आज दिनांक 28 एप्रिल रोजी तालुका क्रिडा संकुल बार्शीटाकळी येथे माननीय आमदार हरिषभाऊ मारोतीआप्‍पा पिंपळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पहिली मासिक सभा पार पडली तसेच नवीन समिती च्या सदस्यांची नियुक्ती झाल्या बद्दल समितीचे अध्यक्ष तथा मा. आमदार हरीषभाऊ पिंपळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कामाचे नियोजन करण्यात आले.  यावेळी सदर सभेचे अध्‍यक्ष माननीय आमदार हरिषभाऊ मारोतीआप्‍पा पिंपळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट, तहसीलदार श्री दीपक बाजड, तालुका क्रीडा अधिकारी ठाकरे मॅडम, नगर पंचायत शाखा अभियंता श्री जावेद तसेच समिती सदस्य श्री पप्पु चव्हाण, श्री गणेश काकड, श्री शुभम चौधरी यांची उपस्थिती होती.

आकोट बाजार समितीमध्ये सोसायटी मतदारसंघात ९७.६७ प्रतिशत, ग्रामपंचायत मध्ये ९५.८८ प्रतिशत तर हमाल मापारी मध्ये ९८ प्रतिशत मतदान... उद्या मतमोजणीनंतर उधळणार निळ गुलाल...

आकोट बाजार समितीमध्ये सोसायटी मतदारसंघात ९७.६७ प्रतिशत, ग्रामपंचायत मध्ये ९५.८८ प्रतिशत तर हमाल मापारी मध्ये ९८ प्रतिशत मतदान... उद्या मतमोजणीनंतर उधळणार निळ गुलाल... आकोट- प्रतिनिधी  आकोट बाजार समिती पंचवार्षिक संचालक निवडणुकीत एकूण १९११ मतदारांपैकी १८५५  मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून त्यामध्ये सेवा सहकारी सोसायटीचे ९७.६७  प्रतिशत, ग्रामपंचायतचे ९५.८८  प्रतिशत तर हमाल मापारी यांचे ९८ प्रतिशत मतदान नोंदविण्यात आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी उद्या दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पासून नगरपरिषद शाळा क्रमांक ७ येथे होणार आहे.                   आकोट तालुका बाजार समिती निवडणुकीच्या इतिहासात यावेळी प्रथमच चार पॅनल्स निवडणूक रिंगणात उतरले होते. कधी नव्हे ती यावेळी ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून पहिल्यांदाच या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. वाढलेल्या या टक्केवारीनेच या निवडणुकीतील सुरस निदर्शनास आली आहे. मतदानात वाढ झालेल्या टक्केवारीने काही लोकांच्या आशा पल्लवीत ...

ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मांतग समाजाची संघर्ष यात्रा.....

Image
ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मांतग समाजाची संघर्ष यात्रा..... श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी सप्ताह निमित्य - जिल्हा भर मातंग समाज संघर्ष यात्रा रोजी या यात्रेचे  सुरुवात प्रसंगी उद्घाटन झाले. ही रथयात्रा जिल्हाभर फिरणार आहे व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त याचे समापन होणार आहे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक अकोला रेल्वे स्टेशन येथून मातंग समाज संघर्ष रथयात्रेला सुरुवात . मातंग समाजाच्या विविध मागण्या घेऊन मातंग समाज संघर्ष रथ यात्रेला आज दिनांक 27 4 2023 गुरुवार रोजी सुरुवात करण्यात आली , उद्घाटन प्रसंगी वंचितच्या मोठे नेत्यांनी हजेरी लावली , माननीय श्री बालमुकुंजी भिरड , शंकरराव इंगळे वंदनाताई वासनिक , सुरेश जी पाटकर , रंजीत वाघ , मनोहर बनसोड , संतोष गवई, शरद इंगोले,  मातंग समाज नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन भाऊ दांडगे , गजानन भाऊ तायडे, सौ सुनंदाताई चांदणे , संजय भाऊ बोदडे , प्रभाकर बोरकर ,गंगाधर सावळे , नारायण मानवतकर, गणेश झिंगुर्डे , रवी तायडे, भूपेंद्र अंभोरे, विठ्ठल मानकर, संतोष बांगर, गोपाल अंज...

दगडपारवा (उपसरपंच) श्री साहिल यशवंतराव गवई "समता पर्व पुरस्कार २०२३" पुरस्काराने सन्मानित....

Image
दगडपारवा (उपसरपंच) श्री साहिल यशवंतराव गवई "समता पर्व पुरस्कार २०२३" पुरस्काराने सन्मानित...... मूर्तिजापूर येथे आज घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले, भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने भारतीय संविधानाच्या समता , न्याय, बंधुता, या मुल्याच्या जपवणूक करून राष्ट्र पुरुषांच्या विचारांचा प्रचार करणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, इंजिनिअर, औद्योगिक व शैक्षणीक क्षेत्रातील नाविन्यपूर्व काम करणाऱ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, सत्कार आज अकोला जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, त्यामधे माझ्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याची दखल अकोला जिल्हा ग्रंथालय संघाने घेऊन, आज माझा मूर्तिजापूर येथे, सत्कार करण्यात आला, व हा सत्कार सुध्दा मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे म्हणून झाला हा सत्कार माझ्यासाठी खूप मोठा व माझ्या जीवनातलं हा सत्कार अविस्मरणीय क्षण राहील, सर्व आयोजकांचे खूप खुप आभार.. आपण माझ्या कामाची दखल घेतली दगडपारवा येथील उपसरपंच साहील गवई यांनी सांगितले