Posts

तीन कोटी पंचवीस लाखाच्या रस्त्याची वंचित बहूजन युवा आघाडीची शोध मोहीम.....

Image
तीन कोटी पंचवीस लाखाच्या रस्त्याची वंचित बहूजन युवा आघाडीची शोध मोहीम.....  कुठल्याही प्रकारचे उद्घाटन झालेले नसताना सिंदखेड ते बार्शीटाकळी ह्या मागील वर्षी तयार केलेल्या रस्त्यावर साईट भराव टाकून सव्वातीन कोटींचा बनावट काम सुरू असून बुलढाणा मधील आंबेटाकळी पासून कापशी ते बार्शीटाकळी ह्या एक वर्षापूर्वी झालेल्या रस्त्यावर साइट भरून तीन कोटी पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याने वंचित बहूजन युवा आघाडी ने आज शोध मोहीम राबविली. उद्घाटनाची तारीख न टाकता उदघाटन जाहीर करणाऱ्या भाजप जनप्रतिनिधी च्या रस्ताकामातील भ्रष्टाचार बाबत वंचित बहूजन युवा आघाडी कडून पोलखोल करीत काही दिवसांपूर्वी झालेल्या वृक्ष रोपीत झाडे देखील कंत्राटदार कडून काढून घेण्याचा संतापजनक प्रकार उघडकिस आला आहे.वनविभागाने हे वृक्ष लावले होते, परंतु त्यांना ह्या घटनेची जाणीव असताना वन विभाग मूग गिळून गप्प बसून आहे.आंबेटाकळी हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव असून भरतपूर ते वाडेगाव दिंडी मार्ग तयार झाला आहे, सोबतच कापशी भरतपूर रस्ता काम सुरू आहे.कापशी मार्गे सिंदखेड हा रस्ता अगदी वर्षे भरा आधी झालेला असून...

∆बार्शिटाकळीचा वादग्रस्त पेट्रोल पंप संचालकावर गुन्हा दाखल..... ∆हलगर्जी पणा भोवला.....

Image
∆बार्शिटाकळीचा वादग्रस्त पेट्रोल पंप संचालकावर गुन्हा दाखल..... ∆हलगर्जी पणा भोवला.....   बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी बायपास टि पाईंट वरील इंडीयन आईलचे डिझेल आणी पेट्रोल पंप आहे त्यांचे संचालक नवीन प्रकाश परमसिंह ठाकुर हे असुन या पेट्रोल पंप वर दिनांक 29/5/2023 रोजी रात्री अंदाजे 8.30 वाजता पेट्रोल पंपा वर पेट्रोल भरण्यासाठी आपली मोटार सायकल घेवून गेले व पंपा वरील मजुर महेश राठोड़ याला 100 रुपयांचे पेट्रोल मागीतले व तेथील मजुराने मोटार सायकल मध्ये पेट्रोल भरत असतांना पेट्रोल पंपाचे नोझल मधून नोझल लिकेच असतांना आणी त्याला कापड बांधलेल्या अवस्थेत असतांना मोटार सायकल मध्ये पेट्रोल भरत असतांना लिकेच नोझल मधून पेट्रोल उडवून मोटार सायकलचे समोर बसलेल्या 3 वर्षीय मुलांचे अंगावर , तोंडावर, डोळ्यात, नाकात पेट्रोल गेला त्याला लगेच रुगणालयात नेले या बाबत बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे बिट जमादार राजेश रामराव जोंधरकर यांचे फिर्यादी वरून पोलीस स्टेशन बार्शिटाकळी मध्ये कलम २८५ भारतीय दंड संहिता प्रमाणे व इतर विविध कलमां नूसार पेट्रोल पंप संचालक नवीन प्रकाश परमस...

आंळदा ग्रामदान मंडळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.....

Image
आंळदा ग्रामदान मंडळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.....   बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी: आज दि.31/05/2023 रोजी शासन निर्णय नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्राम दान मंडळ आळंदा येथे सामाजिक तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या कर्तबगार ,अशा महिला की त्यांनी गावात बचत गटामार्फत गावात वेगवेगळे कार्यक्रम राबविले असतील जसे महिलांचे जास्तीत जास्त उद्योग स्थापन करणे. महिला सक्षमीकरण बाबत वेगवेगळे कार्यक्रम राबविने आरोग्य शिबीर राबविणे. परसबाग यावर काम करीत असलेल्या महिलांना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ग्रामदान मंडळ मार्फत दोन महीलांची निवड करण्यात आली आहे. करीता या कार्यक्रमात मा.दत्ता भाऊ ढोरे अध्यक्ष ग्राम दानमंडळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विश्वनाथ जानोरकार उपसरपंच, स्वाती ऊंबरकार ग्राम सचीव , तसेच महादेव मोहोड, सुकेशनी प्रवीण मोहोड, आशा वर्कर, विणा मोहोड सहयोगीनी माविम,सिमा सोनोने आय सी आर पि, सागर दिलीप मोहोड, अन...

बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी पदभार स्वीकारला....

Image
बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी पदभार स्वीकारला.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : नुकतेच आज बार्शिटाकळी कृषी बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली, त्यात सभापती पदासाठी शेतकरी संघर्ष समिती पॅनलचे राजू काकड पाटील तर उपसभापती पदासाठी सतीश गावंडे यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आज सोमवार 29 मे रोजी दुपारी अकोला ते महान रोड स्थित बार्शिटाकळी बाजार समिती कार्यालयात पदग्रहण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते उपाध्याय साहेब, आमदार हरीश भाऊ पिंपळे, बार्शीटाकळी नगर पंचायतचे नगराध्यक्ष हाजी महेफुज खान रसुल खान, विशाल भाऊ गावंडे, रमेश आप्पा खोबरे, रमेश बेटकर, गजानन मानतकर, संदीप चौधरी, रमेश वाटमारे, व पुष्पा ताई रत्नपारखी उपस्थित होते.या वेळी उपस्थितांनी राजू काकड पाटील व नवनियुक्त उपसभापती सतीश गावंडे यांचया भावी वाटचालीसाठी अभिनंदन केले.यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी मोहम्मद सादिक लिडर, गोपााल वाटमारे, रा...

मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक न केल्यास जन आंदोलन करण्याचा वंचित बहूजन युवा आघाडीचा इशारा.....

Image
मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक न केल्यास जन आंदोलन करण्याचा वंचित बहूजन युवा आघाडीचा इशारा..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  काल वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वार्ड अध्यक्ष गौतम हराळ ह्यांचेवर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला असून युवा आघाडी बार्शिटाकळी जिल्हा अकोला ह्याचे वतीने पोलीस स्टेशन बार्शिटाकळी मार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे. २७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडी च्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचित चे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष श्री. परमेश्वर रणशुर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चोपरने जीवघेणा हल्ला केला आहे.वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या...

बाबासाहेब धाबेकर विद्यालयाची विधार्थीनी असना महेक शेख नईमोद्दीन ने पटकावला प्रथम क्रमांक.....

Image
बाबासाहेब धाबेकर विद्यालयाची विधार्थीनी असना महेक शेख नईमोद्दीन ने पटकावला प्रथम क्रमांक..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी येथील वंचित बहुजन आघाडी चे वरिष्ठ नेते तथा समाज सेवक शेख नईमोद्दीन शेख अलीमोद्दीन यांची कन्या असना महेक ही बार्शिटाकळीच्या बाबासाहेब धाबेकर विद्यालया मध्ये कला शाखेची विधार्थीनी होती व  तिने बाबासाहेब धाबेकर विद्यालया मधुन 76.83 गुण घेवुन पहिला क्रमांक पटकावला त्या मुळे असना महेक शेख नईमोद्दीन  हिचे बार्शिटाकळी शहरात कौतुक होत आहे ती आपल्या यशाचे श्रेय वडील शेख नईमोद्दीन आपल्या आई आणी गुरु जणांना देत आहे.

बार्शिटाकळी न.पा.कार्यालयात कर्मचारी,अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे....

Image
बार्शिटाकळी न.पा.कार्यालयात कर्मचारी,अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  मंगळवार, 23 मे रोजी बार्शीटाकळी येथील नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी हजर नसल्यामुळे कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या कार्यालयाची शोभा वाढवत आहेत.  बार्शिटाकळी येथील मुख्याधिकारी यांच्याकडे दोन ठिकाणी चे पदभार असल्यानेयाचा गंभीर परिणाम नागरिकांना भेडसावत आहे. ग्रापंचायतींची नगर पंचायत झाली तेव्हा पासूनच शहराच्या न.प.ला कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची गरज आहे, मात्र शहराच्या न.प.मध्ये वारंवार होणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे गावाचा विकास जैसे थे झाला आहे. याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. शहरातील शासकीय व खासगी कामांसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अनेक वेळा नगर पंचायत चया चकरा मारायला भाग पडत आहे. या कडक उन्हात आलेल्या नागरिकांना अधिकार्‍यांना न भेटताच परत जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्याचे लक्ष वेधून कायमस्वरूपी मुख्याधिका...