जी.प.शाळा वाघा वस्तापुरात वृक्षारोपण...
जी.प.शाळा वाघा वस्तापुरात वृक्षारोपण... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी, शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत येत असलेली महान केंद्रातील जिल्हा परिषद शाळा वाघा वस्तापुर येथे महान केंद्राचे केंद्रप्रमुख शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना बालपणापासून पर्यावरणाचे धडे मिळावे , विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे व विद्यार्थी आपल्या भावी जीवनात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे सदर हेतू समोर ठेवून शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला कोरोना काळात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणून होता आपल्याला स्वच्छ नैसर्गिक वातावरण मिळावे याकरिता वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे सदर बाब ओळखून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे असे आवाहन महानचे केंद्रप्रमुख शाहिद इकबाल खान यांनी केले आहे यावेळी सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शिवशंकर आस्वार यांनी केले होते यावेळी मान्यवरांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात...