Posts

Showing posts from February, 2026

बार्शिटाकळी येथे शासकीय तूर खरेदीला प्रारंभ.......

Image
बार्शिटाकळी येथे शासकीय तूर खरेदीला प्रारंभ..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-   बार्शिटाकळी तालुका खरेदी विक्री संस्था बार्शीटाकळी येथे हंगाम 2025 26 मधील नाफेड अंतर्गत तुर खरेदीस प्रारंभ झाला. शासनाने शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा , त्याची परवळ होऊ नये म्हणून हा हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत तुरीला हमीभाव 8000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्याचे धोरणानुसार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार रोजी बार्शिटाकळी तालुका खरेदी विक्री संस्था बार्शिटाकळी च्या प्रांगणामध्ये प्रगतशील शेतकरी विनोद गावंडे खांबोरा यांच्या हस्ते काटा पूजन करत शेतकरी नवरतन कावरे यांचे तुर प्रथम दिनी खरेदी करत खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेद्वारे संस्थेचे संचालक तसेच पत्रकार गजाननराव आखरे यांचे हस्ते सदर शेतकऱ्याचे शाल व श्रीफळ देऊन शेतकरी नवरतन कावरे यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील कोदनकर यांचे असते श्रीफळ फोडून तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी उपाध्यक्ष योगेश लाहोळकर, संचालक राजू ...

डोंगरगावातील गवंडी काम व मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या मुलीची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड.!👉वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आई-वडिलांसह मुलीचा सत्कार.!

Image
डोंगरगावातील गवंडी काम व मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या मुलीची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड.! 👉वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आई-वडिलांसह मुलीचा सत्कार.! बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : अकोला तालुक्यातील डोंगरगाव येथील गवंडी व मोलमजुरीचे काम करणारे पुरणमल इंगळे यांची मुलगी प्रज्ञा पुरणमल इंगळे हिची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नुकतीच निवड झाली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रज्ञाने हे यश संपादन केले प्रज्ञाचे वडील गवंडी कामा सह मिळेल ते काम करतात तर आई मजुरीचे काम करते सुरुवातीपासूनच घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे कोणतेही ट्युशन क्लास न लावता स्वतःच्या जिद्दीवर ग्रॅज्युएशन पूर्ण करून प्रज्ञाने स्टाफ सिलेक्शन परीक्षेमध्ये यश मिळवून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (आयटीबीपी) पहिल्याच प्रयत्ना त यश संपादन केले आयटीबीपी मध्ये डोंगरगाव व आजूबाजूच्या गावातून निवड होणारी पहिली महिला प्रज्ञा इंगळे ठरली ही बातमी समजतात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी डोंगरगाव येथे जाऊन गावकऱ्यांच्या उपस्...

क्रीडा शिक्षक सुनील जाधव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न .......

Image
  क्रीडा शिक्षक सुनील जाधव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न .......   बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ अकोला यांच्या उपस्थित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय झोडगा येथील क्रीडा शिक्षक श्री सुनील भीमराव जाधव यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद वानखडे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र काळे, जिल्हा सचिव राजेंद्र जळमकर , बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष नामदेव जाधव, क्रीडा अधिकारी राजेश गावंडे यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुल दगडपारवा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाला सर्व मान्यवरांनी सुनील जाधव सरांनी केलेल्या आपल्या 31 वर्षाच्या कार्यकाळातील कार्याची प्रशंसा केली नियोजित कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक सुधाकर वाघ , मोहन देशमुख, अनिसखान , तौकीरउल्लाखान , बी.जे राठोड , एल बी राठोड, उल्हास देशमुख, क्रीडा कार्यालयाचे प्र...

बी ए सेकण्ड इअर अभ्यासक्रमात तुळशीराम बोबडे यांचीं कविता....

Image
बी ए सेकण्ड इअर अभ्यासक्रमात तुळशीराम बोबडे यांचीं कविता.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :-  पिंजर व बार्शिटाकळीचे सेवानिवृत्त पोस्टमास्टर तथा गुरूदेव सेवा मंडळ बार्शिटाकळीचे मार्गदर्शक अंकुर साहित्य संघांचे माजी केंद्रीय अध्यक्ष, पोस्टल पंशनर्स चे प्रदेश सदस्य व ज़िल्ल्हा अध्यक्ष गुरूदेव सेवक, पाच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिक, कवी, समीक्षक, देशोन्नती मधील शेकडो लेखाचे स्तम्भ लेखक नामांकित दिवाळी अंकाचे मानकरी अनेक पुरस्कार विजेते तुळशीराम बोबडे यांच्या वराडी कवितेचा समावेश अमरावती विदयापीठाच्या बी ए भाग दोन च्या अभ्यासक्रम पाठयपुस्तकात झाला असूनत्यामुळे ती कविता अभ्यासली जाईल माय बापाचं मोठेपण अधोरेखित करणारी ही कविता संस्कृती व परंपरेचे जतन करण्यास मदत करेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला व त्यामुळे सर्वचस्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

तलाठ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकरी हैराण 👉सोनगिरी येथील शेतकऱ्याची पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार....

Image
तलाठ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकरी हैराण सोनगिरी येथील शेतकऱ्याची पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी  : तालुक्यातील महसूल विभागाच्या संथ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोनगिरी येथील एका प्रलंबित प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्रस्त शेतकरी गोपाल विश्वंभर ढोरे यांनी थेट जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, सोनगिरी येथील तलाठी दीर्घकाळ रजेवर असल्याने शेतजमिनीच्या नोंदी आणि वारसा हक्काची कामे रखडली आहेत. तलाठी कार्यालयात उपलब्ध नसल्याने अर्ज धूळ खात पडले असून, शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. तक्रारदाराने वरिष्ठ कार्यालयांतील समन्वयाबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. विविध कार्यालयांशी संपर्क साधला असता, अधिकारी अधिकारक्षेत्राचे कारण पुढे करत जबाबदारी टाळत असल्याचा आरोप ढोरे यांनी केला आहे. धक्कादायक म्हण...

मंदिरातील पूजेचे साहित्य चोरणाऱ्या अटक.... 👉६०५० रुपयांचे चोरी केलेले साहित्य आरोपीकडे आढळले!‌

Image
मंदिरातील पूजेचे साहित्य चोरणाऱ्या अटक 👉६०५० रुपयांचे चोरी केलेले साहित्य आरोपीकडे आढळले! बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका मंदिरात पूजेचे साहित्य चोरून नेणाऱ्या आरोपीस काही नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांनी पकडून अटक केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली. फिर्यादी शिक्षण व गृहरक्षक विभागातील सेवानिवृत्त अधिकारी नरेंद्र पोटेकर यांनी बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या लेखी जबाबानुसार काळा मारुती चौकातील गोपालकृष्ण मंदिरातून एक अनोळखी इसम पूजेचे साहित्य पिशवीत चोरून नेताना गोपाल जाधव यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला पकडले व बार्शिटाकळी पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीची झडती घेतली असता महादेवाच्या मंदिरातील नंदादीप व गोपाळकृष्ण मंदिरातील तांबे पितळीचे पूजेचे साहित्य, घंटा आदी ६०५० रुपयांचे चोरीचे साहित्य आढळून पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याचे नाव राजू सीताराम पेनुरकर (रा. परळी, जि. बीड) येथील रहिवासी असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीकडील चोरीचे साहित्य हस्तगत केले असू...

रुस्तमाबाद येथे सालाबाद प्रमाणे भागवत कथा प्रारंभ....

Image
रुस्तमाबाद येथे सालाबाद प्रमाणे भागवत कथा प्रारंभ....  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी :- अकोला जिल्ह्यामधील बार्शीटाकळी तालुक्यामधील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदा रुस्तमाबाबत येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री जागेश्वर संस्थान येथे ह भ प विश्राम महाराज यांच्या सुमधुर वाणी मधून दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत भागवत ज्ञान कथा सप्ताहास सुरुवात झालेली असून या सप्ताहामध्ये सतत सात दिवस ह भ प ज्ञानेश्वर महाराज लाहुडकर , ह भ प गजानन महाराज गोंडचवर , ह भ प नेहा ताई ठक , ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटोंड, ह भ प मोहन महाराज मेटकर , ह भ प सुष्माताई चांभारे , ह भ प राधिका ताई डांबडे यांचे कीर्तनाचे आयोजन सायंकाळी आठ वाजता करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे काल्याची कीर्तन विश्राम महाराज पांडे यांचे कीर्तनाने भागवत कथेचा समारोप होईल. यावेळी दरवर्षीप्रमाणे 35 क्विंटल ज्वारीच्या भाकरीचा तसेच दार तसेच पाणी पिण्याकरिता मातीचे करे याचा भव्य महाप्रसादाचे आयोजन मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 ला आयोजित केलेला आहे....

ग्राम सीसा येथे वित्तीय साक्षरता सप्ताहानिमित्त KYC व लिंकेज कॅम्प संपन्न....

Image
ग्राम सीसा येथे वित्तीय साक्षरता सप्ताहानिमित्त KYC व लिंकेज कॅम्प संपन्न बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी -: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असलेल्या वित्तीय साक्षरता सप्ताहा निमित्त आज ग्राम सीसा, ता. अकोला येथे वित्तीय साक्षरता प्रशिक्षण व KYC लिंकेज कॅम्प यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) श्री. श्रीराम वाघमारे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी श्री. नोवेल सिंग, जिल्हा अग्रणी बँकेचे सहाय्यक प्रबंधक श्री. नितीन घोरे, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया बाबुळगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. याशिवाय ॲक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, अकोला विभागाचे एरिया मॅनेजर श्री. आकाश मेहेत्रे व अकोला केंद्र व्यवस्थापक श्री. प्रशांत कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये नागरिकांना विमा, पेन्शन, बचत व गुंतवणूक, डिजिटल बँकिंग, बँकिंग लोकपाल, आर्थिक फसवणूक प्रतिबंध तसेच KYC प्रक्रियेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नाबार्डचे DDM श्री. वाघमारे यांनी...

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातपातूरच्या टीमने पटकावला समूह डान्समध्ये प्रथम क्रमांक

Image
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात पातूरच्या टीमने पटकावला समूह डान्समध्ये प्रथम क्रमांक बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  अकोला जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी/ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव दि. 8, फेब्रुवारी 9, 10, 2026 रोजी वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे आयोजित करण्यात आले होते. या सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमांमध्ये समूह नृत्य या प्रकारात  पातुर तालुक्याचे टीमने  प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम श्रीमती अनिता मेश्राम यांनी जाहीर केला.  या नृत्य प्रकारात योगिता बोचरे, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष संगीता जाधव, छाया नेमाडे, दिपाली आयस्कर, माधुरी हामंड, वनमाला शेगोकार, या कर्मचाऱ्यांनी नृत्य मध्ये भाग घेतला होता तर बंटी गावंडे यांनी शिवाजी महाराजांची भूमिका पार पाडली,

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक👉कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाईजिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा...

Image
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक 👉कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी  : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १० फेब्रुवारीपासून बारावी, तर २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षा अकोला जिल्ह्यात पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे, शिक्षणाधिकारी योजना संजयकुमार झापे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ.रत्नमाला खडके, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रमोद टेकाडे,सुभाष भालेराव,प्राथमिक उपशिक्षणाधिकारी ज...

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

Image
बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज...... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा 10 फेब्रुवारी पर्यंत समाप्त होत असून त्यामध्ये प्रामुख्याने कान्हेरी सरप , पिंजर, सिंदखेड मोरेश्वर, राजंदा, धाबा , महान या प्रामुख्याने जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 8 व 10 फेब्रुवारीला संपत असून या ठिकाणी शासन प्रशासक नेमण्याची शक्यता वाढली आहे. बार्शिटाकळी तालुक्यामध्ये एकूण 84 ग्रामपंचायती असून त्यामध्ये प्रत्येक पाच वर्षात दोन टप्प्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असतात. यामध्ये 26 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा संपत असल्यामुळे या ठिकाणी शासन स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत काम सुरळीत राहण्याकरिता प्रशासक नेमण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात येत आहे.    बार्शिटाकळी तालुक्यातील सुकळी , दोनद बुद्रुक , राहीत , वडगाव , मोरगाव काकड, हातोला , कातखेड , साहित , खेर्डा बुद्रुक , महान , रुस्तम्माबाद , झोडगा , कान्हेरी सरप , राजं...

आदर्श ग्रामपंचायत तिवसा बु. कडून गावातील कर्मचाऱ्यांचा सत्कार....

Image
आदर्श ग्रामपंचायत तिवसा बु. कडून गावातील कर्मचाऱ्यांचा सत्कार,  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :- तालुक्यातील मौजे तिवसा बु. ग्रामपंचायत ला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2025 /26 मध्ये अकोला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे सरपंच महोदय यांनी ग्राम स्तरावर ग्रामस्थानी कर्मचाऱ्यांचे स्वागत कार्यक्रम केला सरपंच मंदाताई भारत बहादरे यांनी प्रथम पुरस्कार हा एकट्याच्या मेहनतीने नव्हे तर गावातील सर्व ग्रामस्थ यावरील संस्था ग्रामस्थ महिला व महिला बचत गट व आरोग्य विभाग शिक्षण विभाग अंगणवाडी यांची साथ मिळाली आणि आपण हा पुरस्कार गावासाठी खेचून आणला तरी सर्वांचे मनोबल व उत्साह वाढवण्यासाठी मंदाताई बहादरे यांनी ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक कर्मचाऱ्यांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन स्वागत केले एवढा मोठा यश मिळाल्यानंतर आता आपण थांबायचं नाही पुढे जर एकत्र येऊन आपण कार्य केले तर आपण काय कोणतेही यश खेचून आणू शकतो हे आता गावकऱ्यांना समजले आणि आता नव्याने कंबर कसून जिल्हास्तरावरील नाहीतर राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी तयारी करायची ही चर्चा कर...

पातुर येथे जन्म मृत्यू विवाह प्रशिक्षण शिबिर संपन्न.....

Image
पातुर येथे जन्म मृत्यू विवाह प्रशिक्षण शिबिर संपन्न....... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :- जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जन्म मृत्यू विवाह पोर्टलवर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पातुर येथे आयोजित करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी, तथा जिल्हा निबंधक डॉ. बळीराम गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पातुर येथे यांच्या मार्गदर्शनामध्ये पातुर तालुक्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायिका, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटर, यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन इंगळे ,प्रशिक्षक कु.अंकिता गावंडे सांख्यिकी अधिकारी, श्री वसीम शेख सांख्यिकी पर्यवेक्षक, कुमारी पल्लवी भुईभार डाटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते.  तालुक्यातील लाभार्थ्यांना वेळेत जन्माचे दाखले मिळण्याकरिता सी. आर. एस पोर्टलवर एन्ट्री करण्याबाबतची सखोल माहिती प्रोजेक्टर द्वारे देण्यात आली तसेच जन्म मृत्यू नोंदण...